Ishan Kishan Century : दुलीप ट्रॉफीत ईशान किशनचं धमाकेदार शतक, या विकेटकीपर फलंदाजाच्या अडचणी वाढवल्या-ishan kishan century in duleep trophy 2024 highlights ind b vs ind ind c scorecard duleep trophy ,क्रिकेट बातम्या
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  Ishan Kishan Century : दुलीप ट्रॉफीत ईशान किशनचं धमाकेदार शतक, या विकेटकीपर फलंदाजाच्या अडचणी वाढवल्या

Ishan Kishan Century : दुलीप ट्रॉफीत ईशान किशनचं धमाकेदार शतक, या विकेटकीपर फलंदाजाच्या अडचणी वाढवल्या

Sep 12, 2024 05:07 PM IST

दुलीप ट्रॉफीच्या पहिल्या सामन्यात श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली इशान किशन टीम डी मध्ये होता. मात्र, त्या सामन्याच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये त्याचा समावेश होऊ शकला नाही. यामागे दुखापत की आणखी काही कारण हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पण पहिल्या सामन्यानंतरच इशान किशनचा संघ बदलला गेला.

Ishan Kishan Century : दुलीप ट्रॉफीत ईशान किशनचं धमाकेदार शतक, या विकेटकीपर फलंदाजाच्या अडचणी वाढवल्या
Ishan Kishan Century : दुलीप ट्रॉफीत ईशान किशनचं धमाकेदार शतक, या विकेटकीपर फलंदाजाच्या अडचणी वाढवल्या (HT_PRINT)

भारत आणि बांगलादेश कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यासाठी बीसीसीआयने टीम इंडियाची निवड केली. यात विशेष बाब म्हणजे इशान किशन याचे नाव संघात समाविष्ट नाही. ऋषभ पंत आणि ध्रुव जुरेल यष्टिरक्षक फलंदाज म्हणून संघात आहेत.

या दरम्यान, आत इशान किशनने दुलीप ट्रॉफीच्या सामन्यात उत्कृष्ट शतक झळकावले आहे. यासह, त्याने केवळ आपला संघ मजबूत केला नाही तर भारतीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करण्याचा दावाही मजबूतीने ठोकला आहे. आता बीसीसीआय त्याच्या या दाव्याला किती भक्कम मानते हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

दुलीप ट्रॉफीमध्ये इशान किशनचा संघ बदलला

दुलीप ट्रॉफीच्या पहिल्या सामन्यात श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली इशान किशन टीम डी मध्ये होता. मात्र, त्या सामन्याच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये त्याचा समावेश होऊ शकला नाही. यामागे दुखापत की आणखी काही कारण हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पण पहिल्या सामन्यानंतरच इशान किशनचा संघ बदलला गेला.

आता तो इंडिया सी टीमकडून खेळत आहे. या संघाचा कर्णधार ऋतुराज गायकवाड आहे. यावेळी इशान किशनला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळण्याची संधी मिळाली.

इशान किशनने अप्रतिम शतक केले

इंडिया सी टीमकडून चौथ्या क्रमांकावर इशान किशन फलंदाजीला आला. येताच त्याने आपल्या शैलीत चौकार आणि षटकार मारण्यास सुरुवात केली. समोरचा फलंदाज सावधपणे खेळत असताना इशान किशनने आक्रमण सुरूच ठेवले. त्याने आपले शतकही पूर्ण केले. त्याने १२१ चेंडूत शतक पूर्ण केले.

या डावात त्याच्या बॅटमधून १४ चौकार आणि २ षटकार आले. ज्या संघाने एकेकाळी १०० धावांच्या आत २ विकेट गमावल्या होत्या, इशान किशन आणि बाबा इंद्रजीत यांनी मिळून ३०० च्या जवळ नेले. इशान किशन १२६ चेंडूत १११ धावा करून बाद झाला. त्याला मुकेश कुमारने बोल्ड केले. किशनने आपल्या खेळीत १४ चौकर आणि ३ षटकार मारले.

ध्रुव जुरेलसाठी इशान किशन अडचणीचा ठरू शकतो

भारत आणि बांगलादेश कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्यात इशान किशन पुनरागमन करेल की नाही हा नंतरचा विषय आहे, परंतु त्याने ध्रुव जुरेलसाठी निश्चितच अडचण निर्माण केली आहे. दुलीप ट्रॉफीचा पहिला सामना खेळल्यानंतर ध्रुव जुरेलचीही नुकतीच टीम इंडियात निवड झाली आहे. मात्र, पहिल्या सामन्यात त्याची कामगिरी काही खास नव्हती.

पहिल्या डावात त्याला २ धावा करता आल्या, तर दुसऱ्या डावात त्याला खातेही उघडता आले नाही. अशा स्थितीत ऋषभ पंतच्या जागी त्याला बांगलादेश कसोटीत संधी दिली जाण्याची शक्यता फारच कमी आहे. अशा स्थितीत तो तेथे खेळू शकणार नाही आणि दुलीप ट्रॉफीचे सामनेही त्याच्या हातून गमवावे लागले आहेत. 

अशा परिस्थितीत आता दुसऱ्या कसोटीसाठी संघाची निवड केव्हा होणार, त्यात इशान किशन असेल का, हा मोठा प्रश्न आहे.

Whats_app_banner