इशान किशनसाठी गेले काही महिने चांगले खूपच संघर्षाचे राहिले आहेत. त्याने टीम इंडियासाठी शेवटचा सामना नोव्हेंबर २०२३ मध्ये खेळला होता. यानंतर दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर यष्टीरक्षक फलंदाजा किशनची पुन्हा संघात निवड करण्यात आली होती, मात्र ईशानने वैयक्तिक कारणांमुळे क्रिकेटमधून ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला होता.
यानंतर ईशानने रणजी क्रिकेट खेळण्यासही नकार दिल्याने त्याला केंद्रीय करार गमवावा लागला होता. आता ईशानने सर्व घटनांवर मौन सोडले आहे.
भारताचे तत्कालीन मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी म्हटले होते की, जर इशान किशनला पुनरागमन करायचे असेल तर त्याला देशांतर्गत क्रिकेट खेळावे लागेल आणि त्यात कामगिरी करावी लागेल. आता एका वृत्तपत्राशी बोलताना ईशान म्हणाला की रणजी ट्रॉफी खेळण्यासाठी तो योग्य मानसिक स्थितीत नव्हता.
ईशान म्हणाला, "मी ब्रेक घेतला आणि मला वाटले की ही साधी गोष्ट आहे. जर तुम्हाला पुनरागमन करायचे असेल तर तुम्हाला देशांतर्गत क्रिकेटमध्ये कामगिरी करावी लागेल असा नियम आहे. आता देशांतर्गत क्रिकेट खेळणे माझ्यासाठी खूप वेगळे होते कारण याचा काही अर्थ नव्हता, मी खेळण्यासाठी योग्य मानसिक स्थितीत नव्हतो आणि म्हणूनच मी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून ब्रेक घेतला होता'.
तुम्ही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून ब्रेक घेऊन देशांतर्गत क्रिकेट खेळायला जाण्यात काही अर्थ नाही. मग आंतरराष्ट्रीय संघासोबतच राहण्यात काय वाईट होतं."
ईशानने आपली नाराजी पुढे व्यक्त केली आणि म्हणाला, “हे निराशाजनक होते. आज सर्व काही ठीक आहे असे मला म्हणायचे नाही. हे माझ्यासाठी अजिबात सोपे नव्हते. मी खूप काही सहन केले आहे. मी विचार करत होतो की काय होईल कसे होईल. मी परफॉर्म करत असताना या सर्व गोष्टी माझ्यासोबत का घडल्या?”.s
संबंधित बातम्या