IPL Income : आयपीएलवर टॅक्स लागतो का? भारत सरकारला किती कोटी रुपयांचा फायदा होतो? सर्वच जाणून घ्या-is ipl tax free how much money bcci pay tax for ipl revenue know every ,क्रिकेट बातम्या
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  IPL Income : आयपीएलवर टॅक्स लागतो का? भारत सरकारला किती कोटी रुपयांचा फायदा होतो? सर्वच जाणून घ्या

IPL Income : आयपीएलवर टॅक्स लागतो का? भारत सरकारला किती कोटी रुपयांचा फायदा होतो? सर्वच जाणून घ्या

Aug 21, 2024 03:46 PM IST

आयपीएलच्या अनेक हजार कोटींच्या उत्पन्नावर बीसीसीआयला कोणताही कर भरावा लागत नाही.

IPL Income : आयपीएलवर टॅक्स लागतो का? भारत सरकारला किती कोटी रुपयांचा फायदा होतो? सर्वच जाणून घ्या
IPL Income : आयपीएलवर टॅक्स लागतो का? भारत सरकारला किती कोटी रुपयांचा फायदा होतो? सर्वच जाणून घ्या

इंडियन प्रीमियर लीग (IPL) बीसीसीआयला दरवर्षी भरपूर पैसे कमावून देते. प्रायोजकत्व, ब्रॉडकास्टिंग आणि लाइव्ह स्ट्रिमिंग अधिकारांसह आयपीएलमध्ये कमाईचे इतर अनेक स्त्रोत आहेत.

अलीकडेच एक आकडा समोर आला आहे. यातून बीसीसीआयला २०२३ च्या आयपीएल हंगामात ५ हजार कोटींहून अधिक नफा झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

अनेक हजार कोटींची कमाई करणारी ही लीग जगातील सर्वात श्रीमंत क्रीडा लीग बनली आहे. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की आयपीएलवर टॅक्स लागतो का? या लीगवर कर आहे की नाही?

आयपीएलवर टॅक्स लागतो का?

आयपीएलच्या अनेक हजार कोटींच्या उत्पन्नावर बीसीसीआयला कोणताही कर भरावा लागत नाही. २०२१ मध्ये, बीसीसीआयने आपल्या अपीलमध्ये मागणी केली होती की आयपीएलद्वारे भरपूर पैसे कमावले जात असले तरी क्रिकेटला प्रोत्साहन देण्याचा त्यांचा उद्देश कायम आहे, त्यामुळे ही लीग करमुक्त घोषित करावी. हे अपील प्राप्तिकर अपील न्यायाधिकरणाने (ITAT) कायम ठेवले.

त्यामुळे जोपर्यंत बीसीसीआय आयपीएलमधील नफा क्रिकेटला प्रोत्साहन देण्यासाठी वापरत आहे, तोपर्यंत इंडियन प्रीमियर लीग कायद्याने करमुक्त राहील. पण आयपीएलमधून खेळाडूंच्या कमाईचा प्रश्न आहे, त्यावर कर आहे.

आयपीएलवर कर का नाही?

२०१६-२०१७ मध्ये महसूल विभागाने बीसीसीआयला तीन कारणे दाखवा नोटीस पाठवली होती. या नोटीसमध्ये बीसीसीआयला विचारण्यात आले की आयपीएलच्या कमाईवर आयकर कायदा १२A अंतर्गत कर का भरू नये? या संदर्भात भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ITAT च्या मुंबई खंडपीठाकडे धाव घेतली होती. त्यावेळच्या अहवालानुसार, आयटीएटीने महसूल विभागाचा अर्ज फेटाळून बीसीसीआयच्या बाजूने निकाल दिला होता.

बीसीसीआयच्या कमाईत ११६ टक्के अधिक वाढ

बीसीसीआयने आयपीएल २०२३ मधून ५१२० कोटी रुपये अतिरिक्त कमावले आहेत.

आयपीएल २०२२ च्या तुलनेत ही कमाई ११६ टक्के अधिक आहे.

बीसीसीआयने आयपीएल २०२२ मधून २३६७ कोटी रुपये कमावले होते.

तर IPL २०२३ पासून भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे एकूण उत्पन्न ११७६९ कोटी रुपये होते.

या काळात बीसीसीआयच्या खर्चातही वाढ झाली आहे.

बीसीसीआयच्या २०२२-२३ च्या वार्षिक अहवालानुसार, खर्च देखील ६६ टक्क्यांनी वाढून ६६४८ कोटी रुपये झाला आहे.

बीसीसीआयच्या कमाईत वाढ होण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे नवीन मीडिया हक्क आणि प्रायोजकत्व करार.

टायटल राइट्समधून २५०० कोटी रुपये कमावले

बोर्डाने २०२३-२७ सायकलसाठी नवीन मीडिया अधिकारांमधून ४८,३९० कोटी रुपये कमावले आहेत. त्याची सुरुवात आयपीएल २०२३ पासून झाली. आयपीएलचे टीव्ही हक्क डिस्ने स्टारने २०२१ मध्ये २३,५७५ कोटी रुपयांना (२०२३-२७ साठी) विकत घेतले होते.

Jio Cinema ला २३,७५८ कोटी रुपयांचे डिजिटल अधिकार मिळाले आहेत. आयपीएलचे विजेतेपदाचे हक्क टाटा सन्सला २५०० कोटी रुपयांना विकले गेले. एवढेच नाही तर मंडळाने एंजेल वन, सीएट, माय सर्कल ११ आणि रुपे यांना सहयोगी प्रायोजकत्व विकून १,४८५ कोटी रुपये कमावले आहेत.