मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  Watch : इरफान पठाणचा रोमँटिक अंदाज, पत्नीसाठी गायलं हे गोड गाणं, एकदा पाहाच!

Watch : इरफान पठाणचा रोमँटिक अंदाज, पत्नीसाठी गायलं हे गोड गाणं, एकदा पाहाच!

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Feb 29, 2024 05:14 PM IST

Irfan Pathan Wife : इरफान पठाणने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. यात तो त्याची पत्नी सफा बेगसाठी गाणं गाताना दिसत आहे. त्याचा हा रोमँटिक व्हिडिओ व्हायरल होत आहे.

Irfan Pathan Singing For His Wife
Irfan Pathan Singing For His Wife

Irfan Pathan Singing For His Wife : भारताचा माजी क्रिकेटपटू इरफान पठाण नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणांनी चर्चेत राहतो. क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर तो आता हिदी कॉमेंट्री करताना दिसतो. तसेच, सोशल मीडियावरदेखील इरफान पठाण बराच सक्रीय असतो. अशातच इरफान पठाणचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.

या व्हिडीओत इरफान पठाण गाणं गाताना दिसतो. इरफानने त्याची पत्नी सफा बेगसाठी एक रोमँटिक गाणं गायले आहे. इरफान आणि सफा बेगचा हा रोमँटिक व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे.

इरफानने सफा बेगच्या वाढदिवसानिमित्त हे गाणं गायले. इरफान त्याच्या पत्नीसाठी 'जब कोई बात बिगड़ जाए, जब कोई मुश्किल पड़ जाए' हे गाणं गायले. व्हिडिओमध्ये दिसत आहे की, इरफान माईकवर गाणं म्हणत आहे आणि दुसरीकडे त्याची पत्नी हातात फुलांचा गुच्छ पकडून उभी आहे.

कॅमेरा सफा बेगकडे वळताच तिच्या चेहऱ्यावरील आनंद स्पष्टपणे दिसत आहे. मग इरफान जाऊन बायकोला मिठी मारतो. हा व्हिडीओ शेअर करत इरफानने सुंदर कॅप्शनही दिलं आहे.

इरफान काही दिवसांपूर्वीच ट्रोल झाला होता

काही दिवसांपूर्वी इरफान पठाणने त्याच्या लग्नाच्या आठव्या वाढदिवसानिमित्त पत्नीसोबतचा एक फोटो शेअर केला होता. पत्नीचा फोटो शेअर केल्याने त्याला ट्रोलिंगला सामोरे जावे लागले होते. वास्तविक, इरफानने शेअर केलेल्या फोटोमध्ये त्याच्या पत्नीने हिजाब घातलेला नव्हता. तसेच, त्याने पहिल्यांदाच असा फोटो शेअर केला होता.

IPL_Entry_Point