टीम इंडियाचा माजी क्रिकेटर इरफान पठाण अचानक सोशल मीडियावर ट्रेंड करू लागला आहे. याचे कारण म्हणजे इरफानने नुकताच त्याच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त एक फोटो शेअर केला आहे. इरफानने पत्नी सफा बेगसोबतचा फोटो शेअर केला.
विशेष म्हणजे, इरफानने पहिल्यांदाच आपल्या पत्नीचा चेहरा जगाला दाखवला आहे. आतापर्यंत तो प्रत्येक वेळी आपल्या पत्नीचा बुरख्यातील फोटो शेअर करत असे.
वास्तविक, टीम इंडियाचा माजी खेळाडू इरफान पठाण आज (४ फेब्रुवारी) त्याच्या लग्नाचा आठवा वाढदिवस साजरा करत आहे. या खास प्रसंगी त्याने पत्नीसोबतचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे इरफान पठाणच्या पत्नीने यावेळी कोणताही निकाब परिधान केले नव्हता.
दरम्यान, इरफान पठाणने शेअर केलेला हा फोटो आता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पण काही लोकांना ते आवडले नाही, त्यामुळेच इरफान पठाणच्या पोस्टखाली अनेक अश्लील कमेंट्स करण्यात आल्या आहेत आणि तो फोटो हटवण्यास सांगितले. पण अनेक चाहत्यांनी इरफानच्या पत्नीच्या सौंदर्याचे कौतुकदेखील केले आहे.
इरफान पठाणच्या पत्नीचे नाव सफा बेग आहे. लग्नानंतर इरफान पठाणने पत्नीसोबतचे अनेक फोटो शेअर केले आहेत. मात्र, प्रत्येक फोटोत त्याची पत्नी कधी नकाब घालून तर कधी तोंडावर हात ठेवून चेहरा लपवत असे.
इरफान पठाण आणि सफा बेग यांचे २०१६ मध्ये लग्न झाले होते, सफा बेग हैदराबादची आहे आणि ती एक मॉडेल आहे. दोघांचे लग्न मक्केत झाले होते, आता दोघांना दोन मुले आहेत. इरफान पठाण क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर टीव्ही कॉमेंट्री करतो आणि त्याचे अनेक रील सोशल मीडियावर व्हायरलही होतात.