IRE vs PAK : प्रेक्षकांमधील चाहत्याची शाहीन आफ्रिदीला शिवीगाळ, मैदानातलं वातावरण तापलं, पाहा
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  IRE vs PAK : प्रेक्षकांमधील चाहत्याची शाहीन आफ्रिदीला शिवीगाळ, मैदानातलं वातावरण तापलं, पाहा

IRE vs PAK : प्रेक्षकांमधील चाहत्याची शाहीन आफ्रिदीला शिवीगाळ, मैदानातलं वातावरण तापलं, पाहा

May 13, 2024 11:07 PM IST

Ire vs Pak T20 Series : आयर्लंड आणि पाकिस्तान यांच्यातील दुसऱ्या सामन्यादरम्यान एका चाहत्याने वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदीसोबत गैरवर्तन केले. त्याने शाहीनला शिवीगाळ केली.

IRE vs PAK : प्रेक्षकांमधील चाहत्याची शाहीन आफ्रिदीला शिवीगाळ, मैदानातलं वातावरण तापलं, पाहा
IRE vs PAK : प्रेक्षकांमधील चाहत्याची शाहीन आफ्रिदीला शिवीगाळ, मैदानातलं वातावरण तापलं, पाहा

Fan Misbehave With Shaheen Afridi : पाकिस्तान क्रिकेट संघ सध्या आयर्लंड दौऱ्यावर आहे. येथे पाकिस्तानने T20 मालिकेतील पहिला सामना गमावला होता, पण रविवारी (१२ मे) त्यांनी जबरदस्त पुनरागमन करत दुसऱ्या T20 सामन्यात आयर्लंडचा ७ गडी राखून पराभव केला. हा सामना डब्लिनमध्ये खेळला गेला.

पाकिस्तानच्या या विजयासह मालिकेचा निर्णय आता शेवटच्या सामन्यात होणार आहे. याआधी शुक्रवारी खेळल्या गेलेल्या पहिल्या टी-20 सामन्यात आयर्लंडने पाकिस्तानचा ५ विकेट्सने पराभव करून मोठा अपसेट निर्माण केला होता. हा आयर्लंडचा पाकिस्तानविरुद्धचा पहिला टी-20 विजय होता.

शाहीन आफ्रिदीला शिवीगाळ

दरम्यान, आयर्लंड आणि पाकिस्तान यांच्यातील दुसऱ्या सामन्यादरम्यान एका चाहत्याने वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदीसोबत गैरवर्तन केले. त्याने शाहीनला शिवीगाळ केली.

जिओ न्यूजच्या रिपोर्टनुसार, तो चाहता अफगाणिस्तान क्रिकेट संघाचा होता. शाहीन ड्रेसिंग रूममधून मैदानात जात असताना ही घटना घडली. शाहीनने त्या व्यक्तीच्या अपमानास्पद शब्दांकडे दुर्लक्ष केले आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांना माहिती दिली. सुरक्षा कर्मचाऱ्यांनी तातडीने कारवाई करत त्या व्यक्तीला मैदानाबाहेर हाकलून दिले.

रिझवान आणि फखर जमानची शानदार खेळी

पहिल्या टी-20 मधील दारुण पराभवानंतर पाकिस्तानने दुसऱ्या सामन्यात दमदार पुनरागमन केले. या सामन्यातही आयर्लंडने शानदार फलंदाजी करत १९३ धावा केल्या होत्या. पण पाकिस्तानचे फलंदाज बदला घेण्याच्या मन:स्थितीत होते. त्यांनी १७ व्या षटकातच लक्ष्य गाठले.

मोहम्मद रिझवानने ४६ चेंडूत ७५ धावांची नाबाद खेळी खेळली. तर फखर जमानने अवघ्या ४० चेंडूत ७८ धावा केल्या. मात्र, पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम आपले खातेही उघडू शकला नाही. मालिकेतील तिसरा आणि निर्णायक सामना १४ मे रोजी होणार आहे.

पाकिस्तानला तिसरा सामना जिंकून आपली प्रतिष्ठा राखायची आहे, तर आयर्लंडला मालिका जिंकून इतिहास रचण्याची संधी आहे.

Whats_app_banner