Irani Cup 2024 : भारतानं दोन दिवसात कानपूर कसोटी जिंकली, तर तिकडं लखनौमध्ये अजिंक्य रहाणेनं केली कमाल-irani cup 2024 ajinkya rahane shreyas iyer sarfaraz khan half century mumbai vs rest of india day 1 scorecard highlight ,क्रिकेट बातम्या
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  Irani Cup 2024 : भारतानं दोन दिवसात कानपूर कसोटी जिंकली, तर तिकडं लखनौमध्ये अजिंक्य रहाणेनं केली कमाल

Irani Cup 2024 : भारतानं दोन दिवसात कानपूर कसोटी जिंकली, तर तिकडं लखनौमध्ये अजिंक्य रहाणेनं केली कमाल

Oct 01, 2024 08:27 PM IST

mumbai vs rest of india day 1 scorecard : मुंबईचा कर्णधार अजिंक्य रहाणे यीने पहिल्या दिवशी शानदार फलंदाजी केली. त्याला श्रेयस अय्यर आणि सरफराज खान यांचीही पूर्ण साथ मिळाली. पहिल्या दिवशी तिन्ही फलंदाजांनी अर्धशतके झळकावली. अजिंक्य रहाणे हळूहळू त्याच्या शतकाकडे वाटचाल करत आहे.

Irani Cup 2024 : भारतानं दोन दिवसात कानपूर कसोटी जिंकली, तर तिकडं लखनौमध्ये अजिंक्य रहाणेनं केली कमाल
Irani Cup 2024 : भारतानं दोन दिवसात कानपूर कसोटी जिंकली, तर तिकडं लखनौमध्ये अजिंक्य रहाणेनं केली कमाल (X)

irani cup 2024 mumbai vs rest of india day 1 scorecard  : इराणी चषक २०२४ मध्ये रणजी विजेत्या मुंबईचा सामना शेष भारताशी होत आहे. लखनौच्या एकना स्टेडियमवर आज सोमवारपासून (१ ऑक्टोबर) हा सामना खेळला जात आहे. पाऊस आणि खराब प्रकाशामुळे पहिल्या दिवशी केवळ ६८ षटके खेळली गेली.

मुंबईचा कर्णधार अजिंक्य रहाणे यीने पहिल्या दिवशी शानदार फलंदाजी केली. त्याला श्रेयस अय्यर आणि सरफराज खान यांचीही पूर्ण साथ मिळाली. पहिल्या दिवशी तिन्ही फलंदाजांनी अर्धशतके झळकावली. अजिंक्य रहाणे हळूहळू त्याच्या शतकाकडे वाटचाल करत आहे.

मुंबईची खराब झाली सुरुवात

सामन्याबद्दल बोलायचे झाल्यास, शेष भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या मुंबईने पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत ४ गडी गमावून २३७ धावा केल्या होत्या.

मुंबईची सुरुवात खूपच खराब झाली. संघाला पहिला झटका ६ धावांवर बसला.

मुकेश कुमारने पृथ्वी शॉची शिकार केली. त्याने ७ चेंडूत ४ धावा केल्या.

श्रेयस अय्यरने अर्धशतक केले

तिसऱ्या षटकातच मुंबईची दुसरी विकेट पडली. हार्दिक तामोरेचे खातेही उघडले नाही. यानंतर कर्णधार अजिंक्य रहाणेसह आयुष म्हात्रेने डावाची धुरा सांभाळली. दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी ३१ धावा जोडल्या.

आयुषने ३५ चेंडूत १९ धावा केल्या. रहाणे आणि श्रेयस अय्यर यांनी चौथ्या विकेटसाठी १०२ धावांची भागीदारी केली. ४०व्या षटकात अय्यर झेलबाद झाला. त्याने ८४ चेंडूत ५७ धावा केल्या. यादरम्यान अय्यरने ६ चौकार आणि २ षटकार मारले. रहाणे १९७ चेंडूत ८६ धावा करून नाबाद असून सर्फराज खान ८८ चेंडूत ५४ धावांवर नाबाद आहे.

Whats_app_banner
विभाग