Ira Jadhav : १४ वर्षांच्या इरा जाधवनं वनडेत ठोकल्या ३४६ धावा, एकटीनं ४२ चौकार १६ षटकारांचा पाऊस पाडला
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  Ira Jadhav : १४ वर्षांच्या इरा जाधवनं वनडेत ठोकल्या ३४६ धावा, एकटीनं ४२ चौकार १६ षटकारांचा पाऊस पाडला

Ira Jadhav : १४ वर्षांच्या इरा जाधवनं वनडेत ठोकल्या ३४६ धावा, एकटीनं ४२ चौकार १६ षटकारांचा पाऊस पाडला

Jan 12, 2025 02:32 PM IST

Ira Jadhav 346 Runs : मुंबईच्या इरा जाधवने इतिहास रचला आहे. तिने वनडेत ३४६ धावा ठोकल्या आहेत. इराने १५७ चेंडूत ४२ चेंडूत १६ षटकार ठोकले.

Ira Jadhav : १४ वर्षांच्या इरा जाधवनं वनडेत ठोकल्या ३४६ धावा, एकटीनं ४२ चौकार १६ षटकारांचा पाऊस पाडला
Ira Jadhav : १४ वर्षांच्या इरा जाधवनं वनडेत ठोकल्या ३४६ धावा, एकटीनं ४२ चौकार १६ षटकारांचा पाऊस पाडला

मुंबईच्या इरा जाधव हिने महिलांच्या अंडर-१९ वनडे ट्रॉफीमध्ये इतिहास रचला आहे. इराने मेघालयविरुद्ध त्रिशतक झळकावले आहे. तिने १५७ चेंडूत ३४६ धावांची विक्रमी खेळी खेळली. या खेळीत इराने ४२ चौकार आणि १६ षटकार मारले.

या खेळीनंतर इरा महिला अंडर-१९ वनडे क्रिकेटमध्ये सर्वात मोठी खेळी खेळणारी जगातील पहिली खेळाडू ठरली आहे. इरा डावाच्या शेवटपर्यंत नाबाद राहिली. तिच्या या विक्रमी फलंदाजीमुळे मुंबई संघाने मेघालयविरुद्धच्या निर्धारित ५० षटकांच्या सामन्यात ३ बाद ५६३ धावा केल्या.

मुंबई विरुद्धच्या या सामन्यात मेघालय संघाने एकूण ६ गोलंदाजांचा वापर केला, त्यापैकी तिघींनी १०० हून अधिक धावा दिल्या. याशिवाय तीन गोलंदाजांनी ५० हून अधिक धावा दिल्या.

केवळ इरा जाधवच नाही तर मुंबईची कर्णधार हार्ले गालानेही मेघालयच्या गोलंदाजांची धुलाई केली आणि ७९ चेंडूत ११६ धावांची दमदार खेळी केली.

इरा जाधव कोण आहे?

इरा जाधव अवघ्या १४ वर्षांची आहे. तिने प्रसिद्ध शारदाश्रम विद्या मंदिर शाळेकडून क्रिकेट करिअरला सुरुवात केली. या शारदाश्रमातून अनेक महान क्रिकेटपटू घडले आहेत.

इरा सध्या मुंबईच्या १५ वर्षांखालील संघाची कर्णधार आहे. याशिवाय १९ वर्षांखालील संघातही तिचा समावेश आहे. इराने लहान वयातच आपल्या दमदार खेळीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

कल्पना मुरकर यांनी इरा जाधवला क्रिकेटच्या पहिल्या ट्रिक्स शिकवल्या आहेत. मात्र, आता कल्पना यांचा मुलगा वैदिक मुरकर इराला प्रशिक्षण देत आहे. प्रशिक्षकांसोबतच इराचे वडील सचिन जाधव हे देखील आपल्या मुलीला क्रिकेटर बनवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत.

Whats_app_banner

संबंधित बातम्या