IPL 2024 : दुखापतीमुळे आयपीएल न खेळणाऱ्या खेळाडूंना पगार मिळतो का? नियम काय? जाणून घ्या
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  IPL 2024 : दुखापतीमुळे आयपीएल न खेळणाऱ्या खेळाडूंना पगार मिळतो का? नियम काय? जाणून घ्या

IPL 2024 : दुखापतीमुळे आयपीएल न खेळणाऱ्या खेळाडूंना पगार मिळतो का? नियम काय? जाणून घ्या

Mar 19, 2024 06:03 PM IST

IPL Salary Structure For Injured Player : आयपीएल २०२४ सुरू होण्यापूर्वीच अनेक मोठे खेळाडू दुखापतग्रस्त झाले आहेत आणि स्पर्धेतून बाहेर पडले आहेत. अशा स्थितीत एकही सामना न खेळणाऱ्या खेळाडूंना बोली लागलेली रक्कम मिळणार का, असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.

IPL 2024 : दुखापतीमुळे आयपीएल न खेळणाऱ्या खेळाडूंना पगार मिळतो का? नियम काय? जाणून घ्या
IPL 2024 : दुखापतीमुळे आयपीएल न खेळणाऱ्या खेळाडूंना पगार मिळतो का? नियम काय? जाणून घ्या (PTI)

जगभरात फ्रेंचायझी क्रिकेट लीगची संख्या वाढली आहे. त्यामुळे खेळाडू वर्षभर क्रिकेट खेळताना दिसतात. अशा परिस्थितीत क्रिकेटपटूंना दुखापती होण्याच्या घटनाही प्रचंड वाढल्या आहेत. 

गेल्या आयपीएलमध्ये म्हणजेच आयपीएल २०२३ मध्येही अनेक खेळाडू स्पर्धेला मुकले होते. जसप्रीत बुमराह, ऋषभ पंत आणि प्रसिद्ध कृष्णासह अनेक परदेशी खेळाडू दुखापतींमुळे आयपीएल २०२३ मध्ये खेळू शकले नव्हते.

दरम्यान, आता काही दिवसांतच आयपीएल २०२४ चा थरार सुरू होणार आहे. पण याही आयपीएलमध्ये काही दिग्गज खेळाडू दिसणार नाहीत. दुखापतीमुळे हे खेळाडू यंदाच्या आयपीएलमध्ये खेळणार नाहीत.

आयपीएल २०२४ सुरू होण्यापूर्वीच अनेक मोठे खेळाडू दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर पडले आहेत. आयपीएल मिनी लिलावात अनेक खेळाडूंवर करोडो रुपयांची बोली लागली होती. 

पण हे खेळाडू आता आयपीएल खेळताना दिसणार नाहीत. अशा स्थितीत या खेळाडूंना कोट्यवधी रुपयांची आयपीएल फीस मिळणार की नाही? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.

आयपीएलच्या नियमांनुसार, जर एखाद्या खेळाडूने दुखापतीमुळे किंवा इतर कारणांमुळे सीझन सुरू होण्यापूर्वी आपले नाव मागे घेतले तर त्याला कोणतीही रक्कम दिली जाणार नाही. याचा अर्थ असा की जर एखाद्या खेळाडूने कोणताही सामना न खेळता स्पर्धेतून माघार घेतली तर त्याला पैसे मिळणार नाहीत.

त्याचवेळी, खेळाडूला स्पर्धेदरम्यान दुखापत झाल्यास किंवा कोणत्याही वैयक्तिक कारणामुळे खेळता आले नाही, तर त्याला सामन्यानुसार पैसे दिले जातील.

जगातील अनेक दिग्गज खेळाडू आयपीएल २०२४ ला मुकणार आहेत. यामध्ये मोहम्मद शमीचादेखील समावेश आहे. शमीने गतवर्षी २८ विकेट घेत पर्पल कॅप जिंकली होती. 

शमी व्यतिरिक्त लुंगी एनगिडी, गस ऍटकिन्सन, जेसन रॉय, प्रसिध कृष्णा, मथिश पाथिराना, मार्क वुड, रॉबिन मिंझ आणि दिलशान मधुशंका हे खेळाडू दुखापतीमुळे IPL 2024 मधून पूर्णपणे बाहेर पडले आहेत. 

या खेळाडूंनी आयपीएल सुरू होण्याआधीच स्वताहून माघार घेतली आहे. त्यामुळे त्यांना आगामी हंगामात कोणतीही रक्कम दिली जाणार नाही.

Whats_app_banner