आयपीएल २०२५ चा बहुप्रतीक्षित लिलाव आता अगदी जवळ आला आहे. पण त्याआधी गुरुवारी (३१ ऑक्टोबर) आयपीएलच्या सर्व संघांना आपल्या रिटेन केलेल्या खेळाडूंची यादी जाहीर करायची आहे. या यादीकडे जगाचे लक्ष असणार आहे. सर्व १० संघ आपल्या मुख्य खेळाडूंना संघाशी जोडून ठेवू इच्छितात. त्याचबरोबर अनेक प्रमुख खेळाडू संघ सोडून लिलावात उतरताना दिसतील.
दिल्ली कॅपिटल्स आणि लखनौ सुपर जायंट्सचा कर्णधार ऋषभ पंत आणि केएल राहुल आपापले संघ सोडण्याच्या तयारीत असल्याची माहिीती आहे. त्याचबरोबर गतविजेत्या कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार श्रेयस अय्यरसह ५ संघांचे कर्णधारही बदलण्याची शक्यता आहे.
अशा तऱ्हेने आजचा दिवस सर्व संघआणि त्यांच्या चाहत्यांसाठी खास असणार आहे. आयपीएल रिटेनिंग लिस्ट आल्यानंतर बीसीसीआय मेगा लिलावाची तारीख जाहीर करू शकते. रिपोर्ट्सनुसार, मेगा लिलाव नोव्हेंबरच्या अखेरीस होऊ शकतो.
आयपीएलच्या सर्वच संघांना ३१ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत रिटेन खेळाडूंची सादर करण्याची मुदत आहे.
आयपीएल रिटेन्शनचे लाईव्ह स्ट्रिमिंग जिओ सिनेमावर पाहू शकता. तसेच, आयपीएल रिटेन्शन टीव्हीवर स्टार स्पोर्ट्सवर लाईव्ह पाहता येईल. या दोन्ही ठिकाणी ३१ ऑक्टोबर रोजी दुपारी ४:३० वाजेपासून थेट प्रक्षेपण सुरू होणार आहे.
तसेच, यावेळी संघ ६ खेळाडूंना रिटेन करू शकतात. यात ५ कॅप्ड आणि एक अनकॅप्ड खेळाडू असावेत.
अशा परिस्थितीत कोणता संघ आपल्या किती खेळाडूंना रिटेन करतो, हे पाहणे मनोरंजक ठरणार आहे. या वेळी सर्वाधिक लक्ष नवीन आणि युवा खेळाडूंवर असेल, जे गेल्या काही वर्षांत चांगली कामगिरी करत आहेत.
संबंधित बातम्या