IPL 2024 Play Offs : यंदा हे ४ संघ प्लेऑफमध्ये पोहोचतील, सेहवाग- स्टीव्ह स्मिथसह ५ दिग्गजांचं धाडसी भाकीत
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  IPL 2024 Play Offs : यंदा हे ४ संघ प्लेऑफमध्ये पोहोचतील, सेहवाग- स्टीव्ह स्मिथसह ५ दिग्गजांचं धाडसी भाकीत

IPL 2024 Play Offs : यंदा हे ४ संघ प्लेऑफमध्ये पोहोचतील, सेहवाग- स्टीव्ह स्मिथसह ५ दिग्गजांचं धाडसी भाकीत

Mar 22, 2024 09:25 PM IST

ipl 2024 play offs prediction : ग्लेन मॅकग्रा, वीरेंद्र सेहवाग, स्टीव्ह स्मिथसह क्रिकेट जगतातील ५ दिग्गज क्रिकेटपटूंनी प्लेऑफमध्ये पोहोचणाऱ्या ४ संघांची नावे सांगितली आहेत.

IPL 2024 Play Offs : यंदा हे ४ संघ प्लेऑफमध्ये पोहोचतील, सेहवाग- स्टीव्ह स्मिथसह ५ दिग्गजांचं धाडसी भाकीत
IPL 2024 Play Offs : यंदा हे ४ संघ प्लेऑफमध्ये पोहोचतील, सेहवाग- स्टीव्ह स्मिथसह ५ दिग्गजांचं धाडसी भाकीत (IPL)

इंडियन प्रीमियर लीग २०२४ चा (IPL 2024) बिगुल वाजला आहे. आयपीएलची चमकणारी ट्रॉफी मिळवण्यासाठी १० संघांमध्ये चुरस सुरू झाली आहे. स्पर्धेच्या सुरुवातीबरोबरच विविध अंदाज बांधण्याची चुरसदेखील सुरू झाली आहे. 

ग्लेन मॅकग्रा, वीरेंद्र सेहवाग, स्टीव्ह स्मिथसह क्रिकेट जगतातील ५ दिग्गज क्रिकेटपटूंनी प्लेऑफमध्ये पोहोचणाऱ्या ४ संघांची नावे सांगितली आहेत. 

सेहवाग-स्मिथने त्यांचे ४ संघ निवडले

भारताचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवागने जिओ सिनेमाच्या शोमध्ये बोलताना प्लेऑफमध्ये पोहोचू शकणाऱ्या ४ संघांची नावे सांगितली. वीरूने आरसीबी, दिल्ली कॅपिटल्स, राजस्थान रॉयल्स आणि सनरायझर्स हैदराबाद हे संघ प्ले ऑफमध्ये पोहोचतील अशी भविष्यवाणी केली. तर स्टार स्पोर्ट्सच्या कार्यक्रमात बोलताना स्टीव्ह स्मिथने मुंबई इंडियन्स, लखनऊ सुपर जायंट्स, दिल्ली कॅपिटल्स आणि चेन्नई सुपर किंग्ज या ४ संघांची निवड केली आहे.

मॅकग्रा-पार्थिव पटेल यांची भविष्यवाणी

पार्थिव पटेलच्या मते, मुंबई इंडियन्स, राजस्थान रॉयल्स, सनरायझर्स हैदराबाद आणि गुजरात टायटन्स हे संघ आयपीएल २०२४ च्या प्लेऑफमध्ये पोहोचण्यात यशस्वी होतील. 

त्याच वेळी, ग्लेन मॅकग्राने केवळ दोन संघांबाबत भविष्यवाणी केली आहे. त्याने दिल्ली कॅपिटल्स आणि चेन्नई सुपर किंग्ज हे संघ प्लेऑफमध्ये जातील असे सांगितले आहे.

तर टॉम मूडी यांनी मुंबई इंडियन्स, लखनौ सुपर जायंट्स, सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स हे ४ प्लेऑफमध्ये जातील अशी भविष्यवाणी केली आहे.

१० संघांमध्ये एका ट्रॉफीसाठी चुरस

आयपीएल २०२४ मध्ये एकूण १० संघ सहभागी होत आहेत. BCCI ने इंडियन प्रीमियर लीगच्या १७ व्या हंगामातील सुरुवातीच्या २१ सामन्यांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. बोर्डाने २२ मार्च ते ७ एप्रिलपर्यंतचे वेळापत्रक जाहीर केले आहे. देशातील लोकसभा निवडणुकीच्या तारखा आता जाहीर झाल्या असून उर्वरित सामन्यांचे वेळापत्रक लवकरच बोर्ड जाहीर करेल.

Whats_app_banner