IPL opening ceremony 2025 venue, date, time : इंडियन प्रीमियर लीगचा १८ वा मोसम २२ मार्चपासून सुरू होत आहे. आयपीएलचा पहिला सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (KKR vs RCB) यांच्यात होणार आहे. त्यापूर्वी भव्य उद्घाटन सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार आहे.
आयपीएलच्या उद्घाटन सोहळ्याची तारीख, वेळ इत्यादींबद्दल आपण येथे जाणून घेणार आहोत. विशेष म्हणजे आयपीएलची तिकीट विक्री देखील सुरू झाली आहे, त्याबद्दलही आपण येथे जाणून घेणार आहोत.
गतविजेता कोलकाता नाईट रायडर्स आयपीएल २०२५ चा पहिला सामना RCB विरुद्ध खेळणार आहे. आयपीएलचा हा पहिला सामना २२ मार्च रोजी सायंकाळी ७.३० वाजल्यापासून खेळवला जाईल. नाणेफेक ७ वाजता होईल. यावेळी आरसीबीने रजत पाटीदार याच्याकडे कर्णधारपद सोपवले आहे.
तर केकेआरची कमान वरिष्ठ खेळाडू अजिंक्य रहाणे याच्या हाती आहे. या सामन्यापूर्वी येथे भव्य उद्घाटन सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार आहे.
आयपीएल २०२५ चा उद्घाटन सोहळा कोलकात्याच्या ईडन गार्डन स्टेडियमवर होणार आहे.
आयपीएलचा पहिला सामना संध्याकाळी ७.३० वाजता सुरू होईल, नाणेफेक संध्याकाळी ७ वाजता होईल. याआधी संध्याकाळी ६ वाजता आयपीएलचा उद्घाटन सोहळा सुरू होईल.
आयपीएलच्या उद्घाटन सोहळ्यात बॉलिवूडमधील प्रसिद्ध स्टार्स परफॉर्म करणार आहेत. पण या सोहळ्यात कोणते कलाकार परफॉर्म करणार हे अद्याप निश्चित झालेले नाही.
आयपीएलचा उद्घाटन सोहळा कोलकाता येथील ईडन गार्डन येथे केकेआर विरुद्ध आरसीबी सामन्यापूर्वी होणार आहे. या सामन्याचे तिकीट हे उद्घाटन समारंभाचे तिकीट असेल. या सामन्याची तिकिटे ऑनलाइन विक्रीसाठी उपलब्ध झाली आहेत. चाहते BookMyShow वर तिकीट बुक करू शकतात. वृत्त लिहेपर्यंत किमान ३,५०० रुपयांचे तिकीट उपलब्ध होते.
चेन्नई सुपर किंग्स, दिल्ली कॅपिटल्स, गुजरात टायटन्स, कोलकाता नाइट रायडर्स, लखनौ सुपर जायंट्स, मुंबई इंडियन्स, पंजाब किंग्स, राजस्थान रॉयल्स, रॉयल चॅलेंजर्स बंगलोर, सनरायझर्स हैदराबाद हे १० संघ IPL २०२५ मध्ये खेळणार आहेत.
संबंधित बातम्या