IPL 2025 Auction : आयपीएलच्या 'मेगा' आणि 'मिनी' ऑक्शनमध्ये काय फरक? ही माहिती तुम्हाला असलीच पाहिजे!
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  IPL 2025 Auction : आयपीएलच्या 'मेगा' आणि 'मिनी' ऑक्शनमध्ये काय फरक? ही माहिती तुम्हाला असलीच पाहिजे!

IPL 2025 Auction : आयपीएलच्या 'मेगा' आणि 'मिनी' ऑक्शनमध्ये काय फरक? ही माहिती तुम्हाला असलीच पाहिजे!

Updated Oct 05, 2024 10:10 AM IST

IPL Mega vs Mini Auction : अनेक आयपीएल चाहते मेगा आणि मिनी लिलावाबद्दल संभ्रमात आहेत. आता IPL मेगा लिलाव २०२५ येत आहे. अशा परिस्थितीत या दोघांमधील तीन मोठे फरक काय आहेत ते जाणून घेऊया.

IPL 2025 Auction : आयपीएलच्या 'मेगा' आणि 'मिनी' ऑक्शनमध्ये काय फरक? ही माहिती तुम्हाला असलीच पाहिजे!
IPL 2025 Auction : आयपीएलच्या 'मेगा' आणि 'मिनी' ऑक्शनमध्ये काय फरक? ही माहिती तुम्हाला असलीच पाहिजे!

Difference Between IPL Mega vs Mini Auction : आयपीएल २०२५ च्या मेगा लिलावाची तयारी जोरात सुरू आहे. या मेगा लिलावाचा क्रिकेटप्रेमींमध्येही प्रचंड उत्साह आहे. लिलावाआधी  बीसीसीआयने नवीन नियमांची घोषणा केली. तसेच, काही जुने नियम पुन्हा ऑक्शनमध्ये आणण्यात आले आहेत.

यासोबतच अनेक बडे खेळाडू या लिलावात उतरण्याची शक्यता आहे. त्यामुळे यंदाचा आयपीएल लिलाव आणखी खास बनला आहे. 

दरम्यान हा मेगा लिलाव आहे. तर दरवर्षी मिनी लिलाव आयोजित केला जातो. पण या दोन लिलावात अनेक महत्त्वाचे फरक आहेत, ज्याबद्दल जाणून घेणे महत्त्वाचे आहे. या मिनी आणि मेगा ऑक्शनमधील तीन मोठे फरक काय आहेत ते आपण येथे जाणून घेऊया.

राईट टू मॅच कार्डचा वापर

मेगा लिलावामध्ये, संघांना राईट टू मॅच कार्ड (RTM कार्ड) वापरण्याची परवानगी आहे, ज्याद्वारे ते लिलावाआधी रीलीज केलेल्या खेळाडूला सर्वोच्च बोलीच्या बरोबरीने बोली लावून परत संघात आणू शकतात.

पण मिनी लिलावात असा पर्याय नाही. आरटीएम कार्ड हे मेगा लिलावादरम्यानच उपलब्ध होते, मात्र यावेळी त्यात थोडा बदल करण्यात आला असून त्यामुळे ते अधिकच रोमांचक झाले आहे.

 रिटेन्शन नियमांमध्ये बदल

मेगा आणि मिनी लिलावांमध्ये रिटेंशन नियम देखील एक प्रमुख फरक आहेत. मेगा लिलावामध्ये, संघांना ५+१ पॉलिसी लागू असलेल्या जास्तीत जास्त ६ खेळाडू रिटेन करण्याची परवानगी आहे. याचा अर्थ असा की संघ ५ कॅप्ड (भारतीय किंवा परदेशी) आणि १ अनकॅप्ड खेळाडू रिटेन करू शकतात. 

तर मिनी लिलावामध्ये रिटेन करण्याची कोणतीही विशिष्ट मर्यादा नाही, परंतु कमी स्लॉटमुळे खेळाडू जास्त किंमतीला विकले जातात.

ट्रेड  विंडो अंतर

या लिलावांमध्ये सर्वात मोठा फरक म्हणजे ट्रेड विंडो. मेगा लिलाव २०२५ साठी ट्रेड विंडो वापरण्यात येणार अशा बातम्या होत्या, परंतु हे खरे नाही. ट्रेड विंडो फक्त मिनी लिलावादरम्यान उपलब्ध आहे. 

ही विंडो आयपीएल सीझन संपल्यानंतर एक महिन्यानंतर खुली होते आणि मिनी लिलावाच्या एक आठवड्यापर्यंत चालते. लिलावानंतर ते पुन्हा सुरू होते आणि नवीन हंगामाच्या एक महिना आधी बंद होते. दुसरीकडे, मेगा लिलावादरम्यान ट्रेड विंडोसाठी कोणतीही तरतूद नाही.

Whats_app_banner

संबंधित बातम्या