IPL 2025 Unsold Players : डेव्हिड वॉर्नर, बेयरस्टॉ ते पड्डीकल, हे स्टार खेळाडू ठरले अनसोल्ड, पाहा
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  IPL 2025 Unsold Players : डेव्हिड वॉर्नर, बेयरस्टॉ ते पड्डीकल, हे स्टार खेळाडू ठरले अनसोल्ड, पाहा

IPL 2025 Unsold Players : डेव्हिड वॉर्नर, बेयरस्टॉ ते पड्डीकल, हे स्टार खेळाडू ठरले अनसोल्ड, पाहा

Nov 24, 2024 10:51 PM IST

IPL Auction 2025 unsold players list : आयपीएल २०२५ च्या मेगा लिलावात अनेक खेळाडूंची लॉटरी लागली. मात्र काही खेळाडू असेही आहेत, ज्यांना एकही खरेदीदार मिळाला नाही.

IPL 2025 Unsold Players : डेव्हिड वॉर्नर, बेयरस्टॉ ते पड्डीकल, हे स्टार खेळाडू ठरले अनसोल्ड, पाहा
IPL 2025 Unsold Players : डेव्हिड वॉर्नर, बेयरस्टॉ ते पड्डीकल, हे स्टार खेळाडू ठरले अनसोल्ड, पाहा

Full list unsold players in IPL Auction 2025 : आयपीएल २०२५ साठीच्या मेगा लिलावात खेळाडूंवर पैशांचा वर्षाव होत आहे. लखनौ सुपर जायंट्स (LSG) ने ऋषभ पंतला २७ कोटी रुपयांना खरेदी करून इंडियन प्रीमियर लीगच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू बनवला आहे. त्याच्याशिवाय श्रेयस अय्यरवर २६.७५ कोटी रुपयांची बोली लागल्याने खळबळ उडाली आहे, त्याला पंजाब किंग्जने विकत घेतले आहे.

पण आत्तापर्यंत झाेल्या या मेगा लिलावात अशी काही नावे आहेत, ज्यांची खूप चर्चा होती. त्यांच्यावर मोठी बोली लावली जाऊ शकते, असे बोलले जात होते.पण हे खेळाडू अनसोल्ड राहिले. या खेळाडूंना खरेदीदार मिळाला नाही.

आयपीएल मेगा ऑक्शनमधील अनसोल्ड खेळाडू

देवदत्त पडिक्कल- मूळ किंमत- २ कोटी रुपये

डेव्हिड वॉर्नर- मूळ किंमत- २ कोटी रुपये

जॉनी बेअरस्टो- मूळ किंमत- २ कोटी रुपये

वकार सलामखिल – मूळ किंमत – ७५ लाख रुपये

अनमोलप्रीत सिंग- मूळ किंमत- ३० लाख रुपये

यश धूल- मूळ किंमत- ३० लाख रुपये

उत्कर्ष सिंग- मूळ किंमत- ३० लाख रुपये

उपेंद्र यादव मूळ किंमत – ३० लाख रुपये

लवनीथ सिसोदिया- मूळ किंमत- ३० लाख रुपये

वेगवान गोलंदाजांना भरपूर पैसा मिळाला

IPL २५२५ च्या मेगा लिलावात वेगवान गोलंदाजांना लॉटरी लागली आहे. भारतीय वेगवान गोलंदाज असो की परदेशी वेगवान गोलंदाज सर्वच संघांनी त्यांच्यावर मनमोकळेपणाने पैसा खर्च केला आहे. आयपीएल २०२५ च्या लिलावात इंग्लंडच्या जोफ्रा आर्चरला राजस्थान रॉयल्सने १२.५० कोटी रुपयांना विकत घेतले आहे. 

आर्चरची मूळ किंमत २ कोटी रुपये होती. ऑस्ट्रेलियाच्या जोश हेझलवूडला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने विकत घेतले. आरसीबीने हेजलवूडला १२.५० कोटींना खरेदी केले.

लिलावात भारतीय वेगवान गोलंदाजांनाही मोठी रक्कम मिळाली. आवेश खानला दिल्ली कॅपिटल्सने ९.७५ कोटी रुपयांना विकत घेतले आहे. तर प्रसिध कृष्णाला ९.५० कोटी रुपये मिळाले आहेत. कृष्णाला गुजरात टायटन्सने विकत घेतले आहे. खलील अहमदला चेन्नई सुपर किंग्जने ४.८०  कोटी रुपयांना विकत घेतले.

वेगवान गोलंदाज टी नटराजनलाही लिलावात मोठी रक्कम मिळाली. नटराजनला दिल्ली कॅपिटल्सने १०.७५ कोटी रुपयांना विकत घेतले. आरसीबीनेही नटराजनला विकत घेण्याचा प्रयत्न केला. आरसीबीने नटराजनसाठी १०.७५ कोटी रुपयांपर्यंत बोली लावली. वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्टला मुंबईने विकत घेतले. मुंबई इंडियन्सने ट्रेंट बोल्टला १२.५० कोटी रुपयांना विकत घेतले.

Whats_app_banner