IPL Mega Auction 2025 : आयपीएल २०२५ साठी खेळाडूंचा मेगा लिलाव सौदी अरेबियाच्या जेद्दाह शहरात होत आहे. या मेगा लिलावाचा पहिला दिवस संपला असून पहिल्या दिवशी ऋषभ पंत सर्वात महागडा खेळाडू ठरला. त्याला लखनौ सुपर जायंट्सने २७ कोटींना विकत घेतले. तर केएल राहुलला दिल्ली कॅपिटल्सने विकत घेतले. लिलावाच्या पहिल्या दिवशी ४६७.९५ कोटी रुपये खर्च झाले. एकूण ७२ खेळाडू विकले गेले. त्यापैकी २४ परदेशी खेळाडू होते.
ऋषभ पंत - लखनौ सुपर जायंट्स - रु. २७ कोटी
श्रेयस अय्यर - पंजाब किंग्स - २६.७५ कोटी रु
व्यंकटेश अय्यर - कोलकाता नाईट रायडर्स - २३.७५ कोटी रु
अर्शदीप सिंग - पंजाब किंग्स - १८ कोटी रु
युझवेंद्र चहल – पंजाब किंग्स – १८ कोटी रुपये
अनुभवी गोलंदाज पियुष चावला अनसोल्ड राहिला. तो गेल्या आयपीएल मुंबई इंडियन्समध्ये होता.
आकाश मधवालची मूळ किंमत ३० लाख रुपये होती. त्याला राजस्थान रॉयल्सने १.२० कोटी रुपयांना विकत घेतले. पंजाब किंग्जनेही आकाशसाठी शेवटपर्यंत प्रयत्न केले. पण राजस्थानने बाजी मारली.
नूर अहमदला चेन्नई सुपर किंग्जने १० कोटी रुपयांना विकत घेतले. गुजरात टायटन्सला नूरसाठी आरटीएम वापरायचे होते. पण CSK ने किंमत वाढवली.
ट्रेंट बोल्टला मुंबई इंडियन्सने १२.५० कोटी रुपयांना विकत घेतले. बोल्टची मूळ किंमत २ कोटी रुपये होती. राजस्थान रॉयल्सनेही त्याच्यासाठी शेवटपर्यंत झुंज दिली. बोल्ट याआधीही मुंबईकडून खेळला आहे.
जोफ्रा आर्चरला राजस्थान रॉयल्सने १२.५० कोटींना खरेदी केले. आर्चर यापूर्वी मुंबई इंडियन्सकडून खेळला आहे. मुंबईने आर्चरसाठी शेवटपर्यंत झुंज दिली. मात्र मुंबईने १२.२५ कोटींनंतर बोली लावली नाही.
आवेश खानला लखनौ सुपर जायंट्सने विकत घेतले. त्याची मूळ किंमत २ कोटी रुपये होती. लखनऊने आवेशला ९.७५ कोटी रुपयांना खरेदी केले.
प्रसिध कृष्णाला गुजरात टायटन्सने ९.५० कोटी रुपयांना विकत घेतले. त्याची मूळ किंमत २ कोटी रुपये होती.
आरसीबीने जितेश शर्माला ११ कोटी रुपयांना खरेदी केले. पंजाब किंग्जने जितेशसाठी आरटीएमचा वापर केला होता. पण आरसीबीने दिलेल्या किमतीशी ते जुळवू शकले नाहीत.
इशान किशनला सनरायझर्स हैदराबादने ११.२५ कोटी रुपयांना खरेदी केले. ईशानला मुंबई इंडियन्सने रिलीज केले होते. आता तो हैदराबादकडून खेळणार आहे.
मार्कस स्टॉइनिसला पंजाब किंग्सने ११ कोटी रुपयांना विकत घेतले. स्टॉइनिसची मूळ किंमत २ कोटी रुपये होती.
कोलकाता नाईट रायडर्सने व्यंकटेश अय्यरसाठी खजिना खुला केला आहे. केकेआरने व्यंकटेशला २३.७५ कोटींना विकत घेतले. त्याची मूळ किंमत २ कोटी रुपये होती.
डेव्हॉन कॉनवेला चेन्नई सुपर किंग्सने ६.२५ कोटी रुपयांना विकत घेतले. कॉनवेची मूळ किंमत २ कोटी रुपये होती. तो याआधीही CSK चा भाग होता.
भारताचा फलंदाज देवदत्त पडिक्कल अनसोल्ड राहिला. त्याची मूळ किंमत २ कोटी रुपये होती. पण पडिक्कलवर कोणत्याही संघाने बोली लावली नाही.
हॅरी ब्रूकला दिल्ली कॅपिटल्सने ६.२५ कोटी रुपयांना विकत घेतले. त्याची मूळ किंमत २ कोटी रुपये होती. ब्रूक हा इंग्लंडचा फलंदाज आहे.
केएल राहुलला दिल्ली कॅपिटल्सने १४ कोटींना विकत घेतले. राहुलची मूळ किंमत २ कोटी रुपये होती. तो यापूर्वी लखनौ सुपर जायंट्सचा भाग होता.
मोहम्मद शमीवर सनरायझर्स हैदराबादने मोठी बोली लावली आहे. शमीला हैदराबादने १० कोटी रुपयांना विकत घेतले आहे. त्याची मूळ किंमत २ कोटी रुपये होती. शमी याआधी गुजरात टायटन्सचा भाग होता.
लखनौने यष्टिरक्षक फलंदाज ऋषभ पंतला २७ कोटींना खरेदी केले. त्यामुळे पंत आयपीएलच्या इतिहासात सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. याबाबतीत, त्याने श्रेयस अय्यरला मागे सोडले आहे, जो थोड्याच वेळापूर्वी २६.७५ कोटी रुपयांना विकला गेला होता. ऋषभ पंतसाठी लखनौ आणि आरसीबी यांच्यात सुरुवातीला युद्ध रंगले होते.
पंत २ कोटींच्या मूळ किंमतीसह लिलावात उतरला होता आणि अल्पावधीतच त्याची किंमत १० कोटींच्या पुढे गेली होती. यादरम्यान हैदराबादही शर्यतीत सामील झाले, पण लखनौनेही हार मानली नाही.
हैदराबादची मालक काव्या मारन आणि लखनऊचे मालक संजय गोयंका यांनी पंतसाठी लिलावाच्या बोली लावली आणि काही वेळातच त्याची किंमत १७ कोटींच्या पुढे गेली. हैदराबाद आणि लखनौ इथेच थांबले नाहीत आणि पंतवरील बोली वाढतच गेली. लखनौने पंतसाठी २०.७५ कोटी रुपयांची बोली लावली. यानंतर हैदराबादने माघार घेतली.
मात्र, दिल्लीने आरटीएमचा वापर केला. यानंतर लखनौने पंतसाठी २७ कोटींची ऑफर दिली आणि दिल्लीने हात मागे घेतला. अशाप्रकारे पंतला २७ कोटी रुपयांना विकला गेला. लखनऊने त्याला आयपीएलमधील सर्वात महागडा खेळाडू म्हणून संघात सामील करून घेतले.
ऑस्ट्रेलियन खेळाडू मिचेल स्टार्कला दिल्ली कॅपिटल्सने विकत घेतले. त्याची मूळ किंमत २ कोटी रुपये होती. मात्र त्याला ११.७५ कोटींमध्ये खरेदी केले.
इंग्लंडचा यष्टिरक्षक फलंदाज जोस बटलरला गुजरात टायटन्सने विकत घेतले. बटलरची मूळ किंमत २ कोटी रुपये होती. गुजरातने त्याला १५.५० कोटी रुपयांना खरेदी केले.
KKR ला IPL २०२४ चे विजेतेपद मिळवून देणारा श्रेयस अय्यर IPL इतिहासातील लिलावात सर्वाधिक कमाई करणारा खेळाडू बनला आहे. पंजाबने श्रेयसला २६.७५ कोटी रुपयांना खरेदी केले. श्रेयसची मूळ किंमत २ कोटी रुपये होती. श्रेयस अय्यरला मिळविण्यासाठी दिल्ली आणि कोलकाता यांच्यात लढत झाली.
या दोघांमध्ये पंजाब किंग्जनेही बोलीत उडी घेतली. यानंतर पंजाब आणि दिल्ली यांच्यात श्रेयस आणि केकेआरला मागे घेण्याची स्पर्धा लागली. श्रेयस लिलावात विकला गेलेला सर्वात महागडा भारतीय खेळाडू तसेच आयपीएल इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला.
अय्यरने ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कचा विक्रम मोडला, ज्याला कोलकाता नाईट रायडर्सने २६.७५ कोटी रुपयांना अखेर विकत घेतले.
दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज कागिसो रबाडाला गुजरात टायटन्सने विकत घेतले. रबाडाची मूळ किंमत २ कोटी रुपये होती. गुजरातने त्याला १०.७५ कोटी रुपयांना खरेदी केले.
पंजाब किंग्सने राईट टू मॅच (RTM) कार्ड वापरून वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगला १८ कोटी रुपयांना खरेदी केले. सनरायझर्स हैदराबादने अर्शदीपवर १८ कोटींची बोली लावली होती, पण पंजाबने RTM च्या माध्यमातून अर्शदीपला आपल्या संघात खेचले.
IPL २०२५ च्या मेगा लिलावात पहिली बोली अर्शदीप सिंगवर लावली जात आहे. वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग हा मार्की खेळाडूंच्या सेटचा एक भाग आहे. त्याची मूळ किंमत २ कोटी रुपये आहे. अर्शदीपला पंजाब किंग्जने रिलीज केले होते.
IPL २०२५ चा मेगा लिलाव लवकरच सुरू होणार आहे. यासाठी सर्व फ्रँचायझी सज्ज आहेत.
पंजाब किंग्जकडे सर्वाधिक ११०.५० कोटी रुपये शिल्लक आहेत तर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडे ८३ कोटी रुपये आहेत. दिल्ली कॅपिटल्सकडे ७३ कोटी रुपये आणि राईट टू मॅच (RTM) कार्ड आहे ज्याद्वारे ते त्यांचा माजी कर्णधार खरेदी करू शकतात.
यावेळी लिलावात अशा ५ खेळाडूंचा समावेश आहे जे मागील हंगामापर्यंत आपल्या संघाचे नेतृत्व करत होते, यामध्ये श्रेयस, पंत, राहुल, फाफ डुप्लेसिस आणि सॅम कुरन यांच्या नावांचा समावेश आहे.
कोलकाताने श्रेयस अय्यर, दिल्ली कॅपिटल्सने ऋषभ पंत, लखनऊ सुपरजायंट्सने केएल राहुल, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने फाफ डुप्लेसिस आणि पंजाब किंग्जने शिखर धवन आणि सॅम करन यांना रिलीज केले आहे. अशा स्थितीत या संघांना नव्या कर्णधाराची गरज आहे.
आयपीएल ऑक्शन भारतीय वेळेनुसार दुपारी ३.३० वाजता सुरू होईल. हा लिलाव दोन दिवस चालणार आहे. आयपीएलमधील मेगा लिलाव दर तीन वर्षांनी होतो. यावेळी पुन्हा लिलाव भारताबाहेर होत आहे. सौदी अरेबियातील जेद्दाह येथे मेगा ऑक्शन होत आहे. मेगा लिलाव दुपारी ३.३० वाजता सुरू होणार असून रात्री १०:३० वाजेपर्यंत चालणार आहे.
भारताचा यष्टिरक्षक फलंदाज ऋषभ पंत आयपीएल २०२५ च्या लिलावात सर्वात महागडा खेळाडू ठरू शकतो. या लिलावात सर्वांच्या नजरा मिचेल स्टार्क, केएल राहुल, श्रेयस अय्यर आणि जोस बटलर यांच्यावर आहेत. या सर्वांना २० कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम मिळू शकते.