IPL Auction KL Rahul : केएल राहुल स्वस्तात दिल्ली कॅपिटल्सकडे, आरसीबी-सीएसकेने १० कोटींच्या पुढे बोली लावली नाही
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  IPL Auction KL Rahul : केएल राहुल स्वस्तात दिल्ली कॅपिटल्सकडे, आरसीबी-सीएसकेने १० कोटींच्या पुढे बोली लावली नाही

IPL Auction KL Rahul : केएल राहुल स्वस्तात दिल्ली कॅपिटल्सकडे, आरसीबी-सीएसकेने १० कोटींच्या पुढे बोली लावली नाही

Nov 24, 2024 06:25 PM IST

IPL Auction 2025, KL Rahul : केएल राहुलला दिल्ली कॅपिटल्सने विकत घेतले. दिल्लीने या स्टायलिश फलंदाजाला केवळ १४ कोटी रुपयांना खरेदी केले. राहुलला घेण्यासाठी चेन्नईने जोरदार प्रयत्न केले. पण ते यशस्वी होऊ शकले नाहीत.

IPL Auction KL Rahul : केएल राहुल स्वस्तात दिल्ली कॅपिटल्सकडे, आरसीबी-सीएसकेने १० कोटींच्या पुढे बोली लावली नाही
IPL Auction KL Rahul : केएल राहुल स्वस्तात दिल्ली कॅपिटल्सकडे, आरसीबी-सीएसकेने १० कोटींच्या पुढे बोली लावली नाही (PTI)

आयपीएल २०२५ साठीच्या मेगा ऑक्शनमध्ये केएल राहुल याला दिल्ली कॅपिटल्सने १४ कोटी रुपयांमध्ये खरेदी केले आहे. म्हणजेच तो आगामी आयपीएल नव्या संघाकडून खेळताना दिसणार आहे.

मार्की खेळाडू म्हणून केएल राहुल २ कोटी रुपयांच्या मूळ किमतीत लिलावात उतरला होता. गतविजेत्या केकेआरने त्याच्यासाठी बोलीची सुरुवात केली आणि त्यानंतर आरसीबीने रिंगणात उडी घेतली. राहुलला घेण्यासाठी आरसीबी आणि केकेआरमध्ये स्पर्धा होती. यानंतर दिल्लीनेही राहुलमध्ये स्वारस्य दाखवले आणि केकेआरसह बोलीमध्ये सामील झाले.

दिल्लीने राहुलसाठी ११.५० कोटी रुपयांची बोली लावली, पण केकेआर मागे हटायला तयार नव्हते. यानंतर दिल्लीने राहुलसाठी १२ कोटींची बोली लावली, यानंतर केकेआरने माघार घेतली आणि या दरम्यान, सीएसकेने बोलीमध्ये उडी घेतली आणि राहुलसाठी बोली लावली.

दिल्लीने १४ कोटींची बोली लावली. यानंतर लखनऊला राहुलसाठी आरटीएमच्या वापराबाबत विचारण्यात आले. पण त्यांनी यासाठी नकार दिला. 

या लिलावात चेन्नई सुपर किंग्जनेही राहुलला खरेदी करण्याचा प्रयत्न केला. चेन्नईने राहुलसाठी १३.७५ कोटी रुपयांपर्यंत बोली लावली. तर आरसीबीने फार पूर्वीच हार मानली होती. आरसीबीने राहुलसाठी १०.५० कोटी रुपयांपर्यंत बोली लावली.

पंत सर्वात महागडा, श्रेयस अय्यरलाही मोठी रक्कम मिळाली

गेल्या वर्षी कोलकात्याला चॅम्पियन बनवणाऱ्या श्रेयस अय्यरलाही आयपीएल २०२५ च्या लिलावात मोठी रक्कम मिळाली. अय्यरला पंजाब किंग्जने २६.७५ कोटी रुपयांना विकत घेतले.

आता ऋषभ पंत आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. श्रेयस अय्यर हा दुसरा सर्वात महागडा खेळाडू आहे. या दोन्ही खेळाडूंना त्यांच्या संघाने सोडले होते.

केकेआरने श्रेयस अय्यरला सोडले तर ऋषभ पंतला दिल्ली कॅपिटल्सने सोडले. आता अय्यरला पंजाब किंग्जने २६.७५ कोटींना आणि ऋषभ पंतला लखनऊने २७ कोटींना विकत घेतले आहे. या दोन्ही खेळाडूंना संघाचे कर्णधारपद मिळू शकते, असे मानले जात आहे.

जोस बटलर १५.७५ कोटींमध्ये गुजरातकडे

इंग्लंडचा स्फोटक यष्टीरक्षक फलंदाज जोस बटलरला विकत घेण्यासाठी अनेक संघांमध्ये स्पर्धा होती. मात्र, अखेरीस गुजरात टायटन्सने या स्टार सलामीला १५.७५ कोटींना विकत घेतले. गेल्या मोसमापर्यंत बटलर राजस्थान रॉयल्स संघाचा भाग होता. लखनौ सुपर जायंट्सनेही जोस बटलरला खरेदी करण्यासाठी मोठी बोली लावली.

लखनौ आणि गुजरातमध्ये घनघोर युद्ध झाले. मात्र, अखेरीस बटलरला विकत घेण्यात गुजरातला यश आले. लखनौने या खेळाडूसाठी १५.२५ कोटी रुपयांपर्यंत बोली लावली होती. पण गुजरात टायटन्सने आधीच या खेळाडूला विकत घेण्याचा विचार केल्याचे स्पष्टपणे दिसत होते.

Whats_app_banner