IPL 2025 : आयपीएलच्या वेळापत्रकात बदल, मार्चच्या किती तारखेला सुरू होणार स्पर्धा? जाणून घ्या
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  IPL 2025 : आयपीएलच्या वेळापत्रकात बदल, मार्चच्या किती तारखेला सुरू होणार स्पर्धा? जाणून घ्या

IPL 2025 : आयपीएलच्या वेळापत्रकात बदल, मार्चच्या किती तारखेला सुरू होणार स्पर्धा? जाणून घ्या

Jan 12, 2025 05:20 PM IST

IPL 2025 Schedule New Date : आयपीएलच्या पुढील हंगामाची तारीख बदलण्यात आली आहे. आयपीएल २०२५ आता २३ मार्चपासून सुरू होणार आहे.

IPL 2025 : आयपीएलच्या वेळापत्रकात बदल, मार्चच्या किती तारखेला सुरू होणार स्पर्धा? जाणून घ्या
IPL 2025 : आयपीएलच्या वेळापत्रकात बदल, मार्चच्या किती तारखेला सुरू होणार स्पर्धा? जाणून घ्या (HT_PRINT)

IPL 2025 Schedule New Date : आयपीएल २०२५ बाबत नवे अपडेट समोर आले आहे. आधी ही स्पर्धा १४ मार्चपासून सुरू होणार होती. मात्र आता ही स्पर्धा उशिराने सुरू होणार आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी ही माहिती दिली आहे. 

आयपीएल २०२५ आता २३ मार्चपासून सुरू होणार आहे. पण प्ले ऑफ आणि फायनल मॅचची तारीख अजून कळलेली नाही. आयपीएलच्या नव्या वेळापत्रकावर लवकरच काम सुरू होईल.

मुंबई मुख्यालयात बीसीसीआयची नुकतीच एक बैठक झाली. या बैठकीत अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली. आता पुढील बैठक १८ किंवा १९ जानेवारीला होऊ शकते. यामध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडियाचा संघ निश्चित होणार आहे. यासोबतच आयपीएलबाबतही चर्चा होऊ शकते.

 सध्या तरी IPL २०२५ ची तारीख बदलून २३ मार्च करण्यात आली आहे. ही स्पर्धा आता थोडी उशिराने सुरू होणार आहे.

चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर लगेचच सुरू होणार होते IPL

वास्तविक चॅम्पियन्स ट्रॉफीचा अंतिम सामना ९ मार्चला खेळवला जाणार आहे. तर स्पर्धेचा पहिला उपांत्य सामना ४ मार्चला तर दुसरा उपांत्य सामना ५ मार्चला होणार आहे. त्यानंतर लगेचच १४ मार्चपासून आयपीएल सुरू होणार होते. त्यामुळे खेळाडूंना फारसा ब्रेक मिळत नव्हता.

आयपीएलमध्येही अनेक परदेशी खेळाडू सहभागी होणार आहेत. हे खेळाडू चॅम्पियन्स ट्रॉफीमध्येही आपपाल्या देशांचे प्रतिनिधित्व करणार आहेत. त्यामुळे या खेळाडूंनाही ब्रेकची आवश्यकता लागणार आहे. त्यामुळे आयपीएल १० दिवसांनी पुढे ढकलण्यात आले असावे. दरम्यान, आयपीएलच्या सुरुवातीची तारीख का बदलण्यात आली याबाबत कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही. आयपीएल २०२५ चे वेळापत्रक अद्याप जाहीर झालेले नाही. पण लवकरच याबाबत अपडेट येऊ शकते.

Whats_app_banner

संबंधित बातम्या