आयपीएल २०२५ मध्ये चेन्नई सुपर किंग्जची अवस्था अत्यंत वाईट आहे. पाच वेळचा चॅम्पियन सीएसके प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. चेन्नईने आतापर्यंत ११ सामन्यांपैकी केवळ दोन सामने जिंकले असून संघ गुणतालिकेत सर्वात तळाला म्हणजे दहाव्या स्थानावर आहे. मात्र, यंदाच्या मोसमात सीएसकेच्या संघात एका नव्या खेळाडूचा समावेश झाला आहे. एमएस धोनीच्या नेतृत्वाखालील सीएसकेने उर्विल पटेलला सामील करत सर्वांना आश्चर्यचकित केले आहे. पटेलने सय्यद मुश्ताक अली स्पर्धेत २८ चेंडूत शतक झळकावून खळबळ उडवून दिली होती. हे एका भारतीयाचे संयुक्त सर्वात जलद टी-२० शतक आहे.
सीएसकेने दुखापतग्रस्त वंश बेदीच्या जागी २६ वर्षीय यष्टीरक्षक-फलंदाज पटेलला संघात घेतले आहे. बेदीच्या डाव्या घोट्याला झालेल्या दुखापतीमुळे त्याला यंदाच्या मोसमातून बाहेर पडावे लागले होते. त्याला एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही. अनकॅप्ड पटेल ३० लाख रुपयांच्या बेस प्राइसवर चेन्नई संघात सामील झाला. तो आयपीएलचा एकही सामना खेळलेला नाही. त्याने ४७ टी-२० सामन्यात ११६२ धावा केल्या आहेत. आयपीएल २०२३ मध्ये तो गुजरात टायटन्स संघाचा भाग होता.
आयपीएलने सोमवारी जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, "चेन्नई सुपर किंग्जने वंश बेदीच्या जागी उर्विल पटेलची निवड केली आहे. गुजरातचा यष्टीरक्षक-फलंदाज उर्विलने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये त्रिपुराविरुद्ध २८ चेंडूत शतक झळकावत संयुक्तपणे सर्वात जलद टी-२० शतक करण्याचा विक्रम प्रस्थापित केला. उर्विल २०२३ च्या हंगामात गुजरात टायटन्सचा भाग होता. ३० लाख रुपयांच्या बेस प्राईसवर तो सीएसकेशी जोडला गेला आहे. सीएसकेचे कोलकाता नाईट रायडर्स, राजस्थान रॉयल्स आणि गुजरात टायटन्स यांच्याशी सामना होणार आहे.
सीएसकेने चालू मोसमात तिसऱ्यांदा बदली खेळाडूची घोषणा केली आहे. कोपराच्या दुखापतीमुळे कर्णधार ऋतुराज गायकवाड बाहेर पडला. तो फक्त पाच सामने खेळू शकला, त्यानंतर धोनीला पुन्हा कर्णधारपदाचा पदभार स्वीकारावा लागला. गुरजनीत सिंगच्या दुखापतीनंतर चेन्नईने दक्षिण आफ्रिकेच्या देवल्ड ब्रेव्हिसचा समावेश केला.
चेन्नई सुपर किंग्ज संघ : महेंद्रसिंह धोनी (कर्णधार), शेख रशीद, आयुष म्हात्रे, सॅम करन, रवींद्र जडेजा, देवल्ड ब्रेव्हिस, दीपक हुडा, नूर अहमद, खलील अहमद, अंशुल कंबोज, मथीशा पाथिराना, शिवम दुबे, रविचंद्रन अश्विन, जेमी ओव्हरटन, कमलेश नागरकोटी, रामकृष्ण घोष, विजय शंकर, राहुल त्रिपाठी, श्रेयस गोपाल, डेव्हन कॉनवे, रचिन रवींद्र, मुकेश चौधरी, नॅथन एलिस, आंद्रे सिद्धार्थ आणि उर्विल पटेल।
संबंधित बातम्या