IPL 2025 : अक्षर पटेल दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार, यंदा हे ५ संघ नवीन कर्णधारासह मैदानात उतरणार, पाहा
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  IPL 2025 : अक्षर पटेल दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार, यंदा हे ५ संघ नवीन कर्णधारासह मैदानात उतरणार, पाहा

IPL 2025 : अक्षर पटेल दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार, यंदा हे ५ संघ नवीन कर्णधारासह मैदानात उतरणार, पाहा

Published Mar 15, 2025 10:35 AM IST

IPL 2025 Teams and Captain: दिल्ली कॅपिटल्सने शुक्रवारी फिरकी अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेल याची संघाचा कर्णधार म्हणून नियुक्ती केली. यासह सर्व १० संघांचे कर्णधार निश्चित झाले आहेत.

IPL 2025 : अक्षर पटेल दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार, यंदा हे ५ संघ नवीन कर्णधारासह मैदानात उतरणार, पाहा
IPL 2025 : अक्षर पटेल दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार, यंदा हे ५ संघ नवीन कर्णधारासह मैदानात उतरणार, पाहा

IPL 2025 All 10 Teams Captain : इंडियन प्रीमियर लीगच्या १८व्या हंगामाचा बिगुल वाजला आहे. आगामी हंगामासाठी सर्वच संघ सज्ज झाले आहेत. यंदा एकूण ५ संघ या हंगामात म्हणजेच आयपीएल २०२५ मध्ये नवीन कर्णधारासह खेळणार आहेत. आता सर्व १० संघांचे कर्णधार निश्चित झाले आहेत.

दिल्ली कॅपिटल्सने शुक्रवारी फिरकी अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेल याची संघाचा कर्णधार म्हणून नियुक्ती केली. यासह सर्व १० संघांचे कर्णधार निश्चित झाले आहेत.

दिल्ली कॅपिटल्स, लखनौ सुपर जायंट्स, पंजाब किंग्स, रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आणि कोलकाता नाईट रायडर्स नवीन कर्णधारांसह आयपीएल २०२५ मध्ये उतरतील. दिल्लीने संघाची कमान अक्षर पटेलकडे, लखनऊने ऋषभ पंतकडे, पंजाब किंग्जने श्रेयस अय्यरकडे, आरसीबीने रजत पाटीदारकडे आणि केकेआरने अजिंक्य रहाणेकडे संघाची कमान दिली आहे.

IPL संघांचे कर्णधार

 दिल्ली कॅपिटल्स- अक्षर पटेल

 सनरायझर्स हैदराबाद- पॅट कमिन्स

 रॉयल चॅलेंजर्स बंगलोर- रजत पाटीदार

राजस्थान रॉयल्स- संजू सॅमसन

पंजाब किंग्स- श्रेयस अय्यर

लखनौ सुपर जायंट्स- ऋषभ पंत 

मुंबई इंडियन्स- हार्दिक पंड्या

कोलकाता नाईट रायडर्स- अजिंक्य रहाणे

 गुजरात टायटन्स- शुभमन गिल

 चेन्नई सुपर किंग्स- ऋतुराज गायकवाड

२२ मार्चपासून आयपीएल सुरू होणार

आयपीएल २०२५ चा १८वा मोसम २२ मार्चपासून सुरू होणार आहे. यंंदा १३ शहरांमध्ये सामने खेळवले जाणार आहेत. आयपीएल २०२५ चा पहिला सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर यांच्यात होणार आहे. आयपीएलचा पहिला सामना २२ मार्च रोजी सायंकाळी ७.३०वाजता होणार आहे.

सामन्याचा नाणेफेक ७ वाजता होणार आहे. यावेळी आरसीबीने रजत पाटीदारकडे कर्णधारपद सोपवले आहे, तर केकेआरची कमान वरिष्ठ खेळाडू अजिंक्य रहाणेकडे आहे.

पहिल्या सामन्याआधी उद्घाटन सोहळा रंगणार

आयपीएल २०२५ चा उद्घाटन सोहळा कोलकात्याच्या ईडन गार्डन स्टेडियमवर होणार आहे. आयपीएलच्या उद्घाटन सोहळ्यात बॉलिवूडमधील प्रसिद्ध स्टार्स परफॉर्म करणार आहेत. पण या सोहळ्यात कोणते कलाकार परफॉर्म करणार हे अद्याप निश्चित झालेले नाही. IPL २०२५ चा उद्घाटन सोहळा २२ मार्च रोजी संध्याकाळी ६ वाजता सुरू होईल.

Rohit Bibhishan Jetnavare

eMail

Whats_app_banner

संबंधित बातम्या