इंडियन प्रीमियर लीग २०२५ चे वेळापत्रक जाहीर झाले आहे. आयपीएलच्या १८ व्या हंगामाची सुरूवात २२ मार्चपासून होणार असून अंतिम सामना २५ मे रोजी होणार आहे. गेल्या तीन वर्षांप्रमाणेच यंदाही आयपीएलमध्ये १० संघांचा समावेश असून एकूण ७४ सामने खेळले जाणार आहेत. इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) २०२५ च्या हंगामाची सुरुवात २२ मार्च रोजी गतविजेत्या कोलकाता नाईट रायडर्स (केकेआर) आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (आरसीबी) यांच्यातील सलामीच्या सामन्याने ईडन गार्डन्सवर होणार आहे.
आरसीबीचा कर्णधार म्हणून रजत पाटीदारची घोषणा करण्यात आली आहे, तर केकेआरच्या कर्णधाराची अद्याप घोषणा करण्यात आलेली नाही. आयपीएलचा एल क्लासिको (मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज) २३ मार्च रोजी चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियम उर्फ चेपॉक स्टेडिअमवर होणार आहे.
संबंधित बातम्या