रोहित शर्मा हा भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक आहे. त्याच्या नेतृत्वात भारताने २०२४ चा टी-20 वर्ल्डकप जिंकला. त्याआधी रोहित शर्माच्या नेतृत्वात आयपीएल फ्रेंचाइजी मुंबई इंडियन्सने (MI) ५ वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकली.
२०२४ चा टी-20 वर्ल्डकप जिंकल्यानंतर रोहित शर्मा प्रचंड लोकप्रिय झाला आहे. या सगळ्यामध्ये आयपीएल मेगा लिलावापूर्वी रोहित शर्माबाबत मोठी बातमी समोर येत आहे.
मागील हंगामापूर्वी, आयपीएल २०२४ साठी मुंबई इंडियन्सने रोहित शर्माला कर्णधारपदावरून हटवले होते. रोहितच्या जागी संघाची कमान हार्दिक पांड्याकडे सोपवण्यात आली होती.
अशातच आता रोहित शर्माला आयपीएल २०२५ पूर्वी संघाद्वारे रीलीज केले जाऊ शकते अशी अटकळ पसरली आहे. जर रोहितला सोडण्यात आले तर इतर संघ त्याला आपल्या संघात घेण्यासाठी मोठी रक्कम मोजू शकतात, यात शंका नाही.
दरम्यान, सोशल मीडियावर एका पत्रकाराकडून एक मोठा दावा केला जात आहे हा दावा झपाट्याने व्हायरल झाला आहे.
RevSportz शी संबंधित एका पत्रकाराने एक मोठा दावा केला आहे. आयपीएलचे दिल्ली कॅपिटल्स (DC) आणि लखनौ सुपर जायंट्स (LSG) हे रोहित शर्मा याला आपल्या संघात घेण्यासाठी मोठी रक्कम खर्च करू शकतात. रोहितला आपल्या संघात घेण्यासाठी हे संघ जवळपास ५० कोटी रूपये खर्च करण्यास तयार आहेत.
पण या दाव्यात कितपत तथ्य आहे हे आयपीएल लिलावानंतरच कळेल. दरम्यान, रोहित शर्मा १९ सप्टेंबरपासून बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेत भारतीय संघाचे नेतृत्व करताना दिसणार आहे.
रोहित शर्मा २०१३ मध्ये मुंबई इंडियन्सचा कर्णधार म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. त्यानंतर त्याच्या नेतृत्वात मुंबईने ५ जेतेपदे (२०१३, २०१५, २०१७,२०१९ आणि २०२०) जिंकली होती. त्यांनी २०१३ मध्ये चॅम्पियन्स लीग टी-20 चे विजेतेपदही जिंकले होते. रोहित शर्मा डिसेंबर २०२३ पर्यंत मुंबई इंडियन्सचे कर्णधार होता आणि २०११ पासून सर्व लिलावांमध्ये त्याला मुंबईने रिटेन केले होते.