आयपीएल २०२५ साठी गुरुवारी (३१ ऑक्टोबर) रिटेन खेळाडूंची यादी जाहीर झाली. यामध्ये दिल्ली कॅपिटल्सने त्यांचा कर्णधार ऋषभ पंतला रीलीज केले. पंतने २०१६ मध्ये आयपीएलमध्ये पदार्पण केले आणि तेव्हापासून तो दिल्लीचा भाग आहे. पण आता फ्रेंचायझीने त्याला सोडून दिले आहे.
पंत रीलीज झाल्यानंतर लगेचच, विविध चर्चांना सुरुवात झाली. यासोबत ऋषभ पंत चेन्नई सुपर किंग्समध्ये सहभागी होऊ शकतो, असेही बोलले जात आहे. विशेष म्हणजे, एमएस धोनीच्या जवळच्या व्यक्तीने हा खुलासा केला आहे.
पंत लवकरच चेन्नईची पिवळी जर्सी परिधान करताना दिसणार असल्याचे रहस्य धोनीचा जवळचा आणि प्रिय मित्र सुरेश रैना याने उलगडले नाही. JioCinema वर बोलताना रैना म्हणाला, “मी दिल्लीत एमएस धोनीला भेटलो आणि पंतही तिथे होता. लवकरच कोणीतरी पिवळी जर्सी घालणार आहे.”
रैनाच्या या विधानामुळे आयपीएल २०२५ च्या मेगा लिलावात पंतला खरेदी करण्यासाठी चेन्नई सर्वतोपरी प्रयत्न करेल हे स्पष्ट झाले. आता IPL २०२५ मध्ये पंत कोणत्या संघात दिसणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
ऋषभ पंतने २०१६ मध्ये दिल्ली कॅपिटल्सकडून आयपीएलमध्ये पदार्पण केले होते. २०२४ च्या मोसमात, त्याने दिल्लीशी संलग्न राहून ९ वर्षे पूर्ण केली. आता ९ वर्षांनी दिल्ली आणि पंत वेगळे झाले. दीर्घकाळ दिल्लीकडून खेळत असलेला पंत २०२१ पासून फ्रेंचायझीचा कर्णधार होता.
दिल्ली कॅपिटल्सने संपूर्ण जगाला चकित करत ऋषभ पंतला रिलीज केले. दिल्लीने केवळ ४ खेळाडूंना कायम ठेवले आहे. दिल्लीने आगामी हंगामासाठी अभिषेक पोरेल, अक्षर पटेल, ट्रस्टन स्टब्स आणि कुलदीप यादव यांना कायम ठेवले आहे.
अक्षर पटेल (१६.५ कोटी)
कुलदीप यादव (१३.२५ कोटी)
ट्रिस्टन स्टब्स (१० कोटी)
अभिषेक पोरेल (४ कोटी)