आयपीएल गव्हर्निंग काउन्सिलचीे शनिवारी (२८ सप्टेंबर) बैठक पार पडली. या बैठकीत अनेक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. सर्वात महत्वाचा निर्णय म्हणजे, आयपीएलचे सर्व संघ आपापल्या संघात ६ खेळाडू रिटेन करू शकतात. २०२२ मध्ये झालेल्या शेवटच्या मेगा लिलावात, एका संघाला जास्तीत जास्त ४ खेळाडू रिटने करण्याची परवानगी होती.
या बैठकीतील आणखी एक ऐतिहासिक निर्णय म्हणजे, आयपीएलमधील खेळाडूंसाठी प्रति लीग सामन्यासाठी ७.५ लाख रुपये मॅच फी निश्चित करण्यात आली आहे. हे भारतीय आणि परदेशी खेळाडूंना लागू होईल.
म्हणजेच, जर एखाद्या खेळाडूने लीगचे सर्व सामने खेळले तर कराराव्यतिरिक्त त्याला फक्त मॅच फी म्हणून १.०५ कोटी रुपये मिळणार आहेत.
आयपीएलमध्ये, 'अनकॅप्ड' भारतीय खेळाडूला (जो तीन आयपीएल सामने खेळू शकतो) किमान आधारभूत किंमत २० लाख रुपये आणि अतिरिक्त २२.५ लाख रुपये मिळेल. त्यामुळे तो एका मोसमात केवळ तीन तासांचे तीन सामने खेळून ४२.५ लाख रुपये कमवू शकतो, तर एका मोसमात १० रणजी सामने खेळल्यास त्याला केवळ २४ लाख रुपये मिळतील.
ज्या खेळाडूंनी पाच वर्षांपूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला (कसोटी, एकदिवसीय आणि टी-२० आंतरराष्ट्रीय) अलविदा केला आहे, अशा खेळाडूंचा BCCI अनकॅप्ड खेळाडूंच्या यादीत समावेश करणार आहे. याशिवाय तो बीसीसीआयच्या केंद्रीय करारातूनही बाहेर आहे. विशेषत: महेंद्रसिंग धोनीसाठी हा नियम करण्यात आला आहे.
१५ ऑगस्ट २०१९ रोजी त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. मात्र, धोनी गेल्या पाच वर्षांपासून आयपीएलमध्ये सतत खेळत आहे.
त्याने २०२३ मध्ये चेन्नई सुपर किंग्ज (CSK) ला त्याच्या नेतृत्वाखाली विजेतेपद मिळवून दिले. २०२४ मध्ये त्यांनी ऋतुराजकडे कर्णधारपद सोपवले. यानंतर २०२४ चा हंगाम धोनीचा शेवटचा असेल अशी अटकळ बांधली जात होती.
महेंद्रसिंग धोनीला अनकॅप्ड खेळाडू म्हणून कायम ठेवल्यास चेन्नई सुपर किंग्ज त्याला ४ कोटी रुपये देऊन कायम ठेवू शकते. आयपीएलचा हा नवा नियम फक्त धोनीसाठी आणला आहे.
प्रत्येक फ्रँचायझी जास्तीत जास्त पाच खेळाडू रिटेन करू शकते.
पाच रिटेन्शन व्यतिरिक्त, प्रत्येक फ्रँचायझीला एक राइट-टू-मॅच मिळेल.
जर संघाने फक्त तीन रिटेन्शन केले तर त्यांना तीन राईट-टू-मॅच मिळतील
म्हणजे एक संघ जास्तीत जास्त सहा खेळाडू रिटेन करू शकतो.
रिटेन केलेले खेळाडू कमाल पाच कॅप्ड आणि दोन अनकॅप्ड खेळाडू असू शकतात.
कायम ठेवलेल्या खेळाडूंमध्ये भारतीय किंवा परदेशी यांच्यासाठी कोणतीही मर्यादा निश्चित केलेली नाही
२०२५ च्या मेगा लिलावासाठी फ्रँचायझी पर्स १२० कोटी रुपयांपर्यंत वाढली, ती २०२४ मध्ये एकूण ११० कोटी रुपये होती.
लिलाव पर्स (९०) + परफॉर्मन्स फी (२०) – फ्रँचायझीकडे आता २०२५ मध्ये एकूण १४६ कोटी रुपये असतील
२०२६ मध्ये १५१ कोटी रुपये आणि २०२७ मध्ये १५६ कोटी रुपये असेल.
म्हणजे फ्रँचायझीकडे एकूण तीन पर्स असतील, ज्यात लिलाव, परफॉर्मन्स फी आणि मॅच फी पर्स यांचा समावेश असेल.
पहिल्या रिटेन्शनसाठी १८ कोटी रुपये, दुसऱ्यासाठी १४ कोटी रुपये आणि तिसऱ्यासाठी ११ कोटी रुपये खर्च केले जातील.
चौथ्या रिटेंशनसाठी पुन्हा १८ कोटी रुपये आणि पाचव्या रिटेंशनसाठी १४ कोटी रुपये खर्च करावे लागतील.
कराराव्यतिरिक्त, खेळाडूंना प्रत्येक लीग सामन्यासाठी ७.५ लाख रुपये मॅच फी मिळेल.
म्हणजेच एका खेळाडूला संपूर्ण हंगाम खेळण्यासाठी १.०५ कोटी रुपये मॅच फी मिळेल.
पाच वर्षांपूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झालेले भारतीय खेळाडू अनकॅप्ड असतील
२०२५-२०२७ हंगामासाठी इम्पॅक्ट प्लेयर नियम लागू राहतील
विदेशी खेळाडूंना मेगा लिलावासाठी नोंदणी करावी लागणार आहे
फक्त नोंदणीकृत खेळाडू पुढील दोन वर्षांसाठी (२०२७) भाग घेऊ शकतात.
लिलावात निवडलेल्या खेळाडूंनी हंगाम सुरू होण्यापूर्वी सोडल्यास त्यांच्यावर दोन वर्षांची बंदी घालण्यात येईल.