IPL Video : धोनीसमोरच 'RCB-RCB' च्या घोषणा, चाहत्यांनी चेपॉक स्टेडियम दणाणून सोडलं, व्हिडीओ पाहा
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  IPL Video : धोनीसमोरच 'RCB-RCB' च्या घोषणा, चाहत्यांनी चेपॉक स्टेडियम दणाणून सोडलं, व्हिडीओ पाहा

IPL Video : धोनीसमोरच 'RCB-RCB' च्या घोषणा, चाहत्यांनी चेपॉक स्टेडियम दणाणून सोडलं, व्हिडीओ पाहा

Published Mar 29, 2025 09:58 AM IST

CSK vs RCB IPL 2025 : चेपॉकमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने चेन्नई सुपर किंग्जचा १७ वर्षांनंतर पराभव केला आहे. CSK चे होम ग्राउंड शुक्रवारी 'RCB RCB RCB' च्या घोषणांनी दणाणून गेले होते, याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

IPL Video : धोनीसमोरच 'RCB-RCB' च्या घोषणा, चाहत्यांनी चेपॉक स्टेडियम दणाणून सोडलं, व्हिडीओ पाहा
IPL Video : धोनीसमोरच 'RCB-RCB' च्या घोषणा, चाहत्यांनी चेपॉक स्टेडियम दणाणून सोडलं, व्हिडीओ पाहा (AFP)

CSK vs RCB Highlights : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने शुक्रवारी (२८ मार्च) चेन्नई सुपर किंग्जचा ५० धावांनी पराभव केला. चेपॉकमध्ये होणाऱ्या प्रत्येक सामन्यात संपूर्ण स्टेडियम पिवळ्या रंगात रंगलेले दिसते. 'सीएसके, सीएसके'च्या घोषणांनी स्टेडियम दुमदुमले असते, मात्र शुक्रवारी या मैदानातील चित्र काहीसे वेगळेच होते.

एमएस धोनीसमोर चेन्नईच्या स्टेडियममध्ये 'आरसीबी, आरसीबी'चे नारे लागताना सर्वांनी पाहिले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

१९७ धावांचा पाठलाग करताना चेन्नईने अतिशय संथ सुरुवात केली. कर्णधार ऋतुराज गायकवाडसह त्यांचे आघाडीचे फलंदाजही लवकर बाद झाले. अशा परिस्थितीत आरसीबी विजयाकडे वाटचाल करत असताना चेपॉकवर सीएसकेचे चाहते निराश झाले.

मात्र तेथे उपस्थित असलेल्या विराटच्या चाहत्यांनी 'आरसीबी आरसीबी'च्या घोषणा देण्यास सुरुवात केली. चाहत्यांनी बनवलेले व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. विराट कोहलीमुळे आरसीबीची फॅन फॉलोइंग प्रचंड आहे.

आरसीबीने ५० धावांनी विजय मिळवला

१९७ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना चेन्नईची सुरुवात चांगली झाली नाही. राहुल त्रिपाठी (५) नंतर कर्णधार रुतुराज गायकवाड (०) याला जोश हेजलवूडने स्वस्तात पॅव्हेलियनमध्ये पाठवले. यानंतर दीपक हुडा ४ धावा करून भुवनेश्वर कुमारचा बळी ठरला. एका टोकाला रचिन रवींद्रने काही काळ झुंज दिली. पण यश दयालने १३व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर त्याला बाद करून सामना एकतर्फी केला. रचिनने ३१ चेंडूत ४१ धावा केल्या.

आरसीबीकडून जोश हेझलवूडचे सर्वाधिक ३ बळी

त्याने ४ षटकात केवळ २१ धावा दिल्या. यश दयालने ३ षटकात १८ धावा देत २ बळी घेतले. लियाम लिव्हिंगस्टोनने ४ षटकात २८ धावा देत २ बळी घेतले. एक विकेट भुवनेश्वर कुमारच्या नावावर राहिली. एमएस धोनी शेवटच्या षटकांमध्ये फलंदाजीला आला पण तोपर्यंत सामना सीएसकेच्या हातून निसटला होता. धोनीने १६ चेंडूत नाबाद ३० धावा केल्या, शेवटच्या षटकात त्याने २ षटकारही मारले.

तत्पूर्वी, नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने १९६ धावा केल्या होत्या. सलामीवीर फिल सॉल्टने ३२ आणि विराट कोहलीने ३१ धावा केल्या. संघाकडून कर्णधार रजत पाटीदारने (५१) सर्वाधिक धावा केल्या. CSK फिरकीपटू नूर अहमद याने ३ बळी घेतले.

Rohit Bibhishan Jetnavare

eMail

Whats_app_banner