IPL 2025 Points Table, Orange Cap, Purple Cap : आयपीएल २०२४ मध्ये सोमवारी (७ एप्रिल) खेळल्या गेलेल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने मुंबई इंडियन्सचा १२ धावांनी पराभव केला. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात आरसीबीने प्रथम फलंदाजी करताना मुंबईसमोर २२२ धावांचे लक्ष्य ठेवले होते.
आरसीबीकडून विराट कोहली याने ६७ धावांची शानदार खेळी केली. तर कर्णधार रजत पाटीदार याने ६४ धावांची खेळी केली. मुंबईकडून हार्दिक पांड्या याने २ विकेट घेतल्या.
यानंतर लक्ष्याचा पाठलाग करताना हार्दिक पंड्या आणि तिलक वर्मा यांनी स्फोटक खेळी केली. पण दोघेही संघाला विजय मिळवून देऊ शकले नाहीत. आरसीबीने हा सामना १२ धावांनी जिंकला.
तथापि, मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्या या हंगामात (२० सामन्यांनंतर) सर्वाधिक बळी घेणारा संयुक्त दुसरा गोलंदाज बनला आहे. आरसीबीचा हा ४ सामन्यांतील तिसरा विजय आहे. तर मुंबई इंडियन्सचा हा ४ था पराभव आहे, संघाने या हंगामात आतापर्यंत फक्त एकच सामना जिंकला आहे.
सलग दोन सामने जिंकल्यानंतर, आरसीबीने तिसरा सामना गमावला, तर चौथ्या सामन्यात त्यांनी मुंबई इंडियन्सचा पराभव केला. सध्या दिल्ली कॅपिटल्सचा संघ गुणतालिकेत अव्वल आहे. तर गुजरात टायटन्स दुसऱ्या स्थानावर आहेत.
आरसीबी अधिक मजबूत झाली आहे. पण मुंबई इंडियन्सला हरवल्यानंतरही ते पॉइंट टेबलमध्ये तिसऱ्या स्थानावरच आहेत. सामन्यापूर्वीही ते तिसऱ्या क्रमांकावरच होते. सध्या, आरसीबीचा ६ गुणांसह नेट रन रेट +१.०१५ आहे.
हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्सचा हा ५ सामन्यांतील चौथा पराभव आहे. पॉइंट्स टेबलमध्ये मुंबईचे स्थानही बदललेले नाही, ते ८ व्या क्रमांकावर आहेत. २ गुणांसह मुंबईचा नेट रन रेट -०.०१० आहे.
सूर्यकुमार यादव याने आरसीबीविरुद्ध २६ चेंडूत २८ धावा केल्या, तो ऑरेंज कॅप हिसकावण्यापासून ३ धावांनी कमी पडला. सध्या तो या हंगामात दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे, त्याच्या नावावर ५ सामन्यांमध्ये १९९ धावा आहेत.
निकोलस पूरन (LSG)- २०१
सूर्यकुमार यादव (MI)- १९९
साई सुदर्शन (GT) – १९१
मिचेल मार्श (LSG)- १८४
जोस बटलर (GT)- १६६
हार्दिक पांड्या याने आरसीबीविरुद्ध ४ षटकांत ४५ धावा देत २ बळी घेतले आणि तो स्पर्धेत सर्वाधिक बळी घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत संयुक्त दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला, परंतु पर्पल कॅपपासून तो वंचित राहिला. सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या टॉप ५ गोलंदाजांची यादी पहा.
नूर अहमद (CSK)- १०
हार्दिक पंड्या (MI) – १०
मिचेल स्टार्क (DC)- ९
मोहम्मद सिराज (GT)- ९
खलील अहमद (CSK)- ८
संबंधित बातम्या