IPL Points Table Update : आयपीएल २०२५ चा आठवा सामना (२९ मार्च) चेन्नई सुपर किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात खेळला गेला. चेन्नईच्या चेपॉकवर झालेल्या या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने चेन्नई सुपर किंग्जचा ५० धावांनी पराभव केला.
विशेष म्हणजे, आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदाच रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने चेपॉकमध्ये चेन्नई सुपर किंग्जचा पराभव केला आहे.
चेन्नई सुपर किंग्जच्या या पराभवानंतर गुणतालिकेत मोठा बदल झाला आहे. वास्तविक, या पराभवानंतर ऋतुराज गायकवाड याच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्जची सातव्या स्थानावर घसरण झाली आहे.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला सलग दुसरा विजय मिळाला. आता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू २ सामन्यांत ४ गुणांसह अव्वल स्थानावर आहे. यानंतर ऋषभ पंत याच्या नेतृत्वाखालील लखनौ सुपर जायंट्स दुसऱ्या स्थानावर आहे.
त्याच वेळी, रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आणि लखनऊ सुपर जायंट्सनंतर अनुक्रमे पंजाब किंग्ज, दिल्ली कॅपिटल्स, सनरायझर्स हैदराबाद, कोलकाता नाइट रायडर्स आणि चेन्नई सुपर किंग्ज हे संघ आहेत. या संघांचे प्रत्येकी २-२ गुण आहेत.
तर हार्दिक पंड्या याच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्स, गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स या हंगामातील त्यांच्या पहिल्या विजयाची वाट पाहत आहेत.
तत्पूर्वी, या सामन्यात प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने २० षटकांत ७ गडी गमावून १९७ धावा केल्या. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसाठी कर्णधार रजत पाटीदारने ३२ चेंडूत सर्वाधिक ५१ धावा केल्या.
याशिवाय फिल सॉल्टने १६ चेंडूत ३२ धावांची खेळी केली. चेन्नई सुपर किंग्जकडून नूर अहमदने सर्वाधिक ३ बळी घेतले.
यानंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या १९७ धावांना प्रत्युत्तरात फलंदाजीला आलेल्या चेन्नई सुपर किंग्जला २० षटकांत ८ गडी गमावून केवळ १४६ धावा करता आल्या. अशाप्रकारे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने ५० धावांनी मोठा विजय नोंदवला.
संबंधित बातम्या