IPl Players Retention: इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएलच्या २०२५ च्या मेगा लिलावापूर्वी कोणत्या खेळाडूला रिटेन केले जाईल आणि कोणत्या खेळाडूला रिलीज केले जाईल, यावर ३१ ऑक्टोबर रोजी निर्णय होणार आहे. नोव्हेंबर २०२४ च्या शेवटच्या आठवड्यात होणाऱ्या मेगा लिलावाला महिनाही शिल्लक राहिला नसल्याने बीसीसीआयने आयपीएलच्या १० संघांना यापूर्वीच आपल्या रिटेन आणि रिलीज खेळाडूंची यादी देण्यास सांगितले आहे.
आयपीएल २०२५ मेगा लिलावापूर्वी, एक संघ आपल्या २०२४ संघातील केवळ ६ खेळाडूंना कायम ठेवू शकतो, ज्यात जास्तीत जास्त ५ कॅप्ड खेळाडू आणि दोन अनकॅप्ड खेळाडू असतील. यावेळी भारतीय आणि परदेशी खेळाडूंबाबत कोणतीही अट नाही. मात्र, अनकॅप्ड खेळाडू भारतीय असणे आवश्यक आहे. आयपीएलच्या सर्व १० संघांना गुरुवारी (३१ ऑक्टोबर) सायंकाळी ५ वाजेपर्यंत आपापली रिटेनिंग लिस्ट बीसीसीआयकडे सादर करायची आहे.
आयपीएल संघाकडे १२० कोटी रुपये असतील, त्यापैकी ७९ कोटी रुपये रिटेनमेंटमध्ये खर्च केले जाऊ शकतात. जर एखाद्या संघाने ५ अनकॅप्ड आणि एक कॅप्ड खेळाडू कायम ठेवला तर त्यांच्या पर्समधून ७९ कोटी रुपये कापले जातील. उरलेल्या पैशांतून संघ लिलावात उतरू शकतो. टॉप रिटेनरला किमान १८ कोटी रुपये द्यावे लागतील.
संघ एका खेळाडूवर १८ कोटींपेक्षा जास्त खर्च करू शकतात, कारण आयपीएलने फ्रँचायझींना सांगितले आहे की, ते एका खेळाडूवर १८ कोटींपेक्षा जास्त खर्च करू शकतात. अशावेळी तुमच्या पर्समधून तेवढेच पैसे कापले जातील. एखाद्या खेळाडूला २३ कोटी रुपयांना रिटेन केले. तर, त्या फ्रंचायझीच्या पर्समधून अतिरिक्त पाच कोटी रुपये कापले जातील. अनकॅप्ड खेळाडूवर संघ ४ कोटी रुपये खर्च करू शकतो.
यावेळी राईट टू मॅच अर्थात आरटीएम कार्डचा नियमही लागू आहे. जर एखाद्या संघाने चार खेळाडूंना कायम ठेवले तर ते आरटीएमद्वारे लिलावातून दोन खेळाडूंची (एक कॅप्ड आणि एक अनकॅप्ड) निवड करू शकतात. जर एखाद्या संघाने केवळ २ खेळाडूंना कायम ठेवले तर लिलावातून चार खेळाडूंची निवड केली जाऊ शकते, ज्यामध्ये दोन अनकॅप्ड आवश्यक आहे. जर एखाद्या संघाने ६ खेळाडूंना कायम ठेवले तर ते आरटीएम वापरू शकणार नाहीत. जर एखाद्या संघाने पाच कॅप्ड खेळाडूंना कायम ठेवले तर आरटीएम त्यांच्यासोबत फक्त एक अनकॅप्ड खेळाडू जोडू शकेल.
१ नोव्हेंबर २०१९ ते ३० ऑक्टोबर २०२४ या कालावधीत भारताकडून कोणताही आंतरराष्ट्रीय सामना न खेळलेला खेळाडू अनकॅप्ड खेळाडूंच्या श्रेणीत येईल, असे बीसीसीआयने यापूर्वीच स्पष्ट केले आहे. याशिवाय देशांतर्गत क्रिकेट खेळलेला कोणताही खेळाडू. तो अनकॅप्ड श्रेणीतही राहणार आहे. अशा परिस्थितीत एमएस धोनी, संदीप शर्मा, पियुष चावला, विजय शंकर, मयंक मार्कंडे, कर्ण शर्मा, ऋषी धवन आणि मोहित शर्मा या खेळाडूंना अनकॅप्ड भारतीय खेळाडू म्हटले जाईल. यासाठी संघांना किमान चार कोटी रुपये खर्च करावे लागतील.