IPL 2025 Retentions List : हेनरिक क्लासेन आणि निकोलस पूरन सर्वात महागडे खेळाडू, रिटेन खेळाडूंची संपूर्ण यादी, पाहा
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  IPL 2025 Retentions List : हेनरिक क्लासेन आणि निकोलस पूरन सर्वात महागडे खेळाडू, रिटेन खेळाडूंची संपूर्ण यादी, पाहा

IPL 2025 Retentions List : हेनरिक क्लासेन आणि निकोलस पूरन सर्वात महागडे खेळाडू, रिटेन खेळाडूंची संपूर्ण यादी, पाहा

Published Oct 31, 2024 09:20 PM IST

IPL 2025 Player Retentions full list : आयपीएलच्या आगामी हंगामासाठी सर्व १० फ्रँचायझींनी रिटेन केलेल्या खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. विराट कोहली सर्वात महागडा रिटेन केलेला भारतीय खेळाडू आहे. तर हेनरिक क्लासेन याने रिटेन्शनमध्ये उच्चतम रक्कम मिळवली आहे.

IPL 2025 Retentions List : हेनरिक क्लासेन आणि निकोलस पूरन सर्वात महागडे खेळाडू, रिटेन खेळाडूंची संपूर्ण यादी, पाहा
IPL 2025 Retentions List : हेनरिक क्लासेन आणि निकोलस पूरन सर्वात महागडे खेळाडू, रिटेन खेळाडूंची संपूर्ण यादी, पाहा

आयपीएलच्या आगामी हंगामाच्या लिलावापूर्वी सर्व १० फ्रँचायझींनी रिटेन केलेल्या खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. रिषभ पंत, केएल राहुल आणि श्रेयस सारख्या बड्या खेळाडूंना त्यांच्या संघाने रिलीज केले आहे. 

भारतीय खेळाडूंमध्ये विराट कोहली हा सर्वात महागडा रिटेन खेळाडू आहे. विराटला आरसीबीने २१ कोटी रुपयांमध्ये रिटेन केले.

तर रोहित (१६.३० कोटी), जसप्रीत बुमराह (१८ कोटी) यांनाही भरपूर पैसे मिळाले आहेत. मात्र, लिलावानंतर आता परदेशी खेळाडूने रिटेन्शन प्राइस जिंकली आहे. सनरायझर्स हैदराबादने हेनरिक क्लासेनला संघात कायम ठेवण्यासाठी सर्वाधिक रक्कम दिली आहे.

सनरायझर्स हैदराबादचा आक्रमक फलंदाज हेनरिक क्लासेन (२३ कोटी) हा रिटेन खेळाडूंमध्ये सर्वात महागडा खेळाडू ठरला. त्याने याबाबतीत आरसीबीच्या विराट कोहलीला (२१ कोटी) मागे टाकले.

रिटेन खेळाडूंची संपूर्ण यादी

कोलकाताने या खेळाडूंना रिटेन केले

कोलकाता नाईट रायडर्सने कर्णधार श्रेयस अय्यरला सोडण्याचा निर्णय घेतला आहे. KKR ने IPL २०२५ साठी ५ खेळाडूंना रिटेन केले आहे. केकेआरने आंद्रे रसेल, सुनील नरेन, वरुण चक्रवर्ती, रमणदीप सिंग आणि हर्षित राणा यांना कायम ठेवले आहे.

रिंकू सिंग- १३ कोटी 

वरुण चक्रवर्ती- १२ कोटी

 सुनील नारायण- १२ कोटी

 आंद्रे रसेल- १२ कोटी

 हर्षित राणा- ४ कोटी

रामनदिन सिंग- ४ कोटी

सनरायझर्स हैदराबादने या खेळाडूंना रिटेन केले

सनरायझर्स हैदराबादने ५ खेळाडूंना कायम ठेवले आहे. सनरायझर्स हैदराबादने पॅट कमिन्स, अभिषेक शर्मा, हेनरिक क्लासेन, नितीश कुमार रेड्डी आणि ट्रॅव्हिस हेडला कायम ठेवले आहे.

हेनरिक क्लासेन (२३ कोटी), 

पॅट कमिन्स (१८ कोटी)

अभिषेक शर्मा (१४ कोटी),

 ट्रॅव्हिस हेड (१४ कोटी) 

नितीश कुमार रेड्डी (६ कोटी)

राजस्थान रॉयल्सने या खेळाडूंना रिटेन केले

राजस्थान रॉयल्सने जोस बटलरला रिटेन केलेले नाही. आयपीएल २०२५ साठी राजस्थानने संजू सॅमसन, यशस्वी जैस्वाल, रियान पराग, ध्रुव जुरेल, शिमरॉन हेटमायर आणि संदीप शर्मा यांना कायम ठेवले आहे.

संजू सॅमसन (१८ कोटी)

यशस्वी जैस्वाल (१८ कोटी)

रियान पराग (१४ कोटी)

ध्रुव जुरेल (१४ कोटी) 

शिमरॉन हेटमायर (११ कोटी)

 संदीप शर्मा (४ कोटी)

गुजरात टायटन्सने या खेळाडूंना रिटेन केले

गुजरात टायटन्सने ५ खेळाडूंना कायम ठेवले आहे. गुजरातने IPL २०२५ साठी शुभमन गिल, राहुल तेवतिया, साई सुदर्शन, राशिद खान आणि शाहरुख खान यांना कायम ठेवले आहे.

राशीद खान (१८ कोटी)

शुभमन गिल (१६.५ कोटी), 

साई सुदर्शन (८.५ कोटी), 

राहुल तेवतिया (४ कोटी) 

शाहरुख खान (४ कोटी).

लखनौ सुपर जायंट्सने या खेळाडूंना रिटेन केले

लखनऊ सुपर जायंट्सने कर्णधार केएल राहुलला सोडले आहे. लखनौने निकोलस पुरन, आयुष बडोनी, मयंक यादव, मोहसीन खान आणि रवी बिश्नोई यांना कायम ठेवले आहे.

निकोलस पूरन (२१ कोटी)

मयंक यादव (११ कोटी)

रवी बिश्नोई (११ कोटी)

मोहसिन खान (४ कोटी)

आयुष बडोनी (४ कोटी)

दिल्ली कॅपिटल्सने या खेळाडूंना रिटेन केले

दिल्ली कॅपिटल्सने संपूर्ण जगाला चकित केले आहे. ऋषभ पंतला सोडण्यात आले आहे. दिल्लीने केवळ ४ खेळाडूंना कायम ठेवले आहे. दिल्लीने आगामी हंगामासाठी अभिषेक पोरेल, अक्षर पटेल, ट्रस्टन स्टब्स आणि कुलदीप यादव यांना कायम ठेवले आहे.

अक्षर पटेल (१६.५ कोटी)

 कुलदीप यादव (१३.२५ कोटी)

ट्रिस्टन स्टब्स (१० कोटी)

अभिषेक पोरेल (४ कोटी)

चेन्नई सुपर किंग्जने या खेळाडूंना रिटेन केले

चेन्नई सुपर किंग्सने आयपीएल २०२५ साठी ५ खेळाडूंना कायम ठेवले आहे. चेन्नईने रवींद्र जडेजा, ऋतुराज गायकवाड, शिवम दुबे, एमएस धोनी आणि मथिशा पाथिराना यांना कायम ठेवले आहे.

रवींद्र जडेजा - १८ कोटी

ऋतुराज गायकवाड- १८ कोटी

मथिषा पाथिराना- १३ कोटी

शिवम दुबे - १२ कोटी

एम एस धोनी- ४ कोटी

आरसीबीने या खेळाडूंना रिटेन केले

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने केवळ ३ खेळाडूंना कायम ठेवले आहे. आरसीबीने विराट कोहली, रजत पाटीदार आणि यश दयाल यांना कायम ठेवले आहे. ग्लेन मॅक्सवेल, फाफ डू प्लेसिस आणि मोहम्मद सिराज या स्टार खेळाडूंना सोडण्यात आले आहे.

विराट कोहली (२१ कोटी) 

रजत पाटीदार (११ कोटी)

यश दयाल (५ कोटी)

पंजाब किंग्जने केवळ दोन खेळाडूंना रिटेन केले

पंजाब किंग्जने अतिशय आश्चर्यकारक निर्णय घेतला आहे. पंजाबने केवळ दोन खेळाडूंना कायम ठेवले आहे. पंजाबने प्रभसिमरन सिंग आणि शशांक सिंगला कायम ठेवले आहे. हे दोन्ही खेळाडू अनकॅप्ड आहेत.

शशांक सिंग (५.५ कोटी)

प्रभसिमरन सिंग (४ कोटी)

मुंबई इंडियन्सने या खेळाडूंना रिटेन केले

मुंबई इंडियन्सने माजी कर्णधार रोहित शर्मा, सध्याचा कर्णधार हार्दिक पांड्या, मधल्या फळीतील फलंदाज सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा आणि स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह यांना कायम ठेवले आहे.

जसप्रीत बुमराह - १८ कोटी

सूर्यकुमार यादव – १६.३५ कोटी रुपये

हार्दिक पांड्या - १६.३५ कोटी रुपये

रोहित शर्मा- १६.३० कोटी

तिलक वर्मा – ८ कोटी रु

Whats_app_banner

संबंधित बातम्या