सीएसकेनं धोनीला रिटेन केलं, पण तो खेळणार का? रिकी पाँटिंगच्या ‘अशा’ वक्तव्यामुळं धाकधूक वाढली
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  सीएसकेनं धोनीला रिटेन केलं, पण तो खेळणार का? रिकी पाँटिंगच्या ‘अशा’ वक्तव्यामुळं धाकधूक वाढली

सीएसकेनं धोनीला रिटेन केलं, पण तो खेळणार का? रिकी पाँटिंगच्या ‘अशा’ वक्तव्यामुळं धाकधूक वाढली

HT Marathi Desk HT Marathi
Nov 05, 2024 11:18 AM IST

Ricky Ponting On MS Dhoni: आयपीएल २०२५ च्या मेगा ऑक्शनपूर्वी सर्व फ्रँचायझीने आपल्या रिटेन आणि रिलीज केलेल्या खेळाडूंची यादी बीसीसीआयकडे सोपवली आहे, ज्यात सीएसकेने धोनीला रिटेन केले आहे. मात्र, त्याच्या खेळण्याबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

आयपीएल २०२४: महेंद्रसिंह धोनीच्या खेळण्याबाबत रिकी पाँटिंगची मोठी भविष्यवाणी
आयपीएल २०२४: महेंद्रसिंह धोनीच्या खेळण्याबाबत रिकी पाँटिंगची मोठी भविष्यवाणी (X)

IPL 2025: दिग्गज यष्टीरक्षक फलंदाज एमएस धोनी पुन्हा एकदा आयपीएलमध्ये खेळताना दिसणार आहे. चेन्नई सुपर किंग्जने आयपीएल २०२५ च्या मेगा लिलावापूर्वी धोनीला ४ कोटी रुपयांना रिटेन केले आहे. भारताचा माजी कर्णधार धोनीने गेल्या पाच वर्षांपूर्वी शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला आहे. यामुळे त्याला अनकॅप्ड खेळाडू म्हणून संघात कायम ठेवण्यात आले. दरम्यान, ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार आणि पंजाब किंग्जचा नवा मुख्य प्रशिक्षक रिकी पाँटिंगने ४३ वर्षीय धोनीबद्दल मोठी भविष्यवाणी केली. आयपीएल २०२५ मधील सर्व सामन्यांमध्ये सीएसके धोनीला खेळवणार नाही, असे पाँटिंगने म्हटले आहे.

आगामी आयपीएल हंगामात धोनीला काही सामन्यात विश्रांती दिली जाईल, जेणेकरून त्याच्यावरचा ताण कमी होईल, असे पॉन्टिंगला वाटते. आयसीसी रिव्ह्यूच्या नुकत्याच झालेल्या एका एपिसोडमध्ये पाँटिंग म्हणाला की, ‘दोन हंगामापूर्वी धोनीला अपेक्षित कामगिरी करता आली नाही. परंतु, नंतर त्याने कमबॅक केले. त्याने जुन्या एमएस धोनीप्रमाणे काही सामन्यांमध्ये प्रभाव पाडला. मला वाटते आताही तसेच होईल. ते संपूर्ण हंगामात त्यांना काढून टाकू शकत नाहीत. त्याला सामन्यापासून दूर ठेवण्याचा आणि विश्रांती देण्याचा विचार ते करू शकतात.’

धोनीच्या नेतृत्वाखाली सीएसकेने पाच आयपीएल ट्रॉफी जिंकल्या आहेत. आयपीएल २०२४ पूर्वी त्याने सीएसकेचे कर्णधारपद ऋतुराज गायकवाडकडे सोपवले. मात्र, गेल्या मोसमात चेन्नईचा संघ प्लेऑफमध्ये पोहोचण्यात यशस्वी ठरला नाही. सीएसके गुणतालिकेत पाचव्या स्थानावर राहिली. तो कोणत्याही संघात असो, कर्णधार असो वा नसो, तो त्या संघासाठी नेहमीच मार्गदर्शक आणि चांगला लीडर असेल. मग तो खेळत असो किंवा बाहेर बसलेला असो. धोनी चेन्नईसाठी महत्त्वाचा आहे कारण तो मैदानात आणि मैदानाबाहेरही संघाला मार्गदर्शन करताना करताना दिसतो.

धोनीने गेल्या मोसमात खालच्या फळीत खेळताना आपल्या धडाकेबाज फलंदाजीने चाहत्यांचे मनोरंजन केले होते. त्याने १४ सामन्यात ५३.६७ च्या सरासरीने आणि २२०. ५५ च्या जबरदस्त स्ट्राईक रेटने १६१ धावा केल्या आहेत. तो ८ वेळा नाबाद राहिला. इतर दिग्गजांप्रमाणेच धोनीनेही प्रभावी राहण्याचा मार्ग शोधला आहे, असे पॉन्टिंगचे मत आहे. तो आता डावाच्या शेवटच्या २० चेंडूंवर फलंदाजी करत आहे. मात्र, तरीही तो समोरच्या संघावर दबाव टाकण्यात यशस्वी ठरला आहे.

Whats_app_banner