IPL 2025 : ऑरेंज कॅप-पर्पल कॅप सध्या कोणाच्या डोक्यावर? गुणतालिकेत पंजाबची मोठी झेप, पाहा ताजे अपडेट
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  IPL 2025 : ऑरेंज कॅप-पर्पल कॅप सध्या कोणाच्या डोक्यावर? गुणतालिकेत पंजाबची मोठी झेप, पाहा ताजे अपडेट

IPL 2025 : ऑरेंज कॅप-पर्पल कॅप सध्या कोणाच्या डोक्यावर? गुणतालिकेत पंजाबची मोठी झेप, पाहा ताजे अपडेट

Published Apr 02, 2025 10:21 AM IST

IPL 2025 Orange Cape Purple Cape : आयपीएलमध्ये मंगळवारी झालेल्या सामन्यात पंजाब किंग्जने लखनौ सुपर जायंट्सचा ८ गडी राखून पराभव केला. या विजयानंतर पंजाबने गुणतालिकेत मोठी झेप घेतली तर लखनौची घसरण झाली आहे.

IPL 2025 : ऑरेंज कॅप-पर्पल कॅप सध्या कोणाच्या डोक्यावर? गुणतालिकेत पंजाबची मोठी झेप, पाहा लेटेस्ट अपडेट
IPL 2025 : ऑरेंज कॅप-पर्पल कॅप सध्या कोणाच्या डोक्यावर? गुणतालिकेत पंजाबची मोठी झेप, पाहा लेटेस्ट अपडेट (PTI)

IPL Points Table : आयपीएल २०२४ चा १३ वा सामना मंगळवारी (१ एप्रिल) पंजाब किंग्ज आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात खेळला गेला. लखनौच्या एकाना क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात पंजाबने लखनौचा ८ विकेट्सने पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना ऋषभ पंत याच्या नेतृत्वाखालील लखनौ संघाने १७१ धावा केल्या होत्या.

प्रत्युत्तरात पंजाबने १६.२ षटकांत २ फलंदाजांच्या मोबदल्यात लक्ष्य गाठले आणि ८ गडी राखून मोठा विजय नोंदवला. 

पंजाबकडून सलामीवीर प्रभसिमरन सिंग याने ३४ चेंडूत ६९ धावा फटकावल्या. त्याला सामन्यातील सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून गौरवण्यात आले. या सामन्यानंतर पॉइंट टेबलमध्ये काय बदल झाले आणि आता ऑरेंज कॅप आणि पर्पल कॅप कोणाकडे आहे ते जाणून घेऊया.

LSG वि. PBKS सामन्यानंतर गुणतालिकेत बदल

पंजाब किंग्जने हा सामना जिंकून गुणतालिकेत पाचव्या स्थानावरून दुसऱ्या स्थानावर मजल मारली आहे. संघाने २ पैकी २ सामने जिंकले आहेत. ४ गुणांसह त्यांचा नेट रन रेट (+१.४८५) सुद्धा चांगला आहे. लखनौ सुपर जायंट्स आधी तिसऱ्या क्रमांकावर होता, आता ८ विकेटने मोठ्या पराभवानंतर सहाव्या स्थानावर घसरला आहे.

लखनौचा हा तिसऱ्या सामन्यातील दुसरा पराभव आहे. २ गुणांसह त्यांचा नेट रन रेट (-०.१५०) इतका आहे.

ऑरेंज कॅपच्या शर्यतीत श्रेयस अय्यर

३० चेंडूत ५२ धावांची खेळी करणारा पंजाब किंग्जचा कर्णधार श्रेयस अय्यर ऑरेंज कॅपच्या शर्यतीत सामील झाला आहे. या मोसमात सर्वाधिक धावा करणारा तो दुसरा खेळाडू आहे. ऑरेंज कॅप सध्या लखनौचा खेळाडू निकोलस पूरन  याच्याकडे आहे. त्याच्या या स्पर्धेत ३ सामन्यात १८९ धावा आहेत.

सर्वाधिक धावा करणारे फलंदाज (१३व्या सामन्यानंतर)

निकोलस पूरन- १८९

श्रेयस अय्यर- १४९

साई सुदर्शन- १३७

ट्रॅव्हिस हेड- १३६

मिचेल मार्श- १२४

पर्पल कॅप सीएसकेच्या नूर अहमदकडे

चेन्नई सुपर किंग्जचा फिरकी गोलंदाज नूर अहमद  याच्याकडे सध्या पर्पल कॅप आहे. त्याने ३ सामन्यात ९ विकेट घेतल्या आहेत. दुसऱ्या स्थानावर मिचेल स्टार्क आहे, ज्याने २ सामन्यात ८ विकेट घेतल्या आहेत. आयपीएलच्या १३व्या सामन्यानंतर सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या ५ गोलंदाजांची यादी खाली दिली आहे.

नूर अहमद- ९

मिचेल स्टार्क- ८

खलील अहमद- ६

शार्दुल ठाकूर- ६

अर्शदीप सिंग- ५

Rohit Bibhishan Jetnavare

eMail

Whats_app_banner

संबंधित बातम्या