आयपीएल २०२५ संदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे. वास्तविक, आयपीएलच्या पुढील हंगामापूर्वी मेगा लिलाव आयोजित केला जाणार आहे. अशा परिस्थितीत, नियमानुसार, मेगा लिलावापूर्वी, सर्व संघांना त्यांच्या रिटेन केलेल्या आणि रीलीज केलेल्या खेळाडूंची यादी जाहीर करावी लागेल.
त्याच वेळी, कोणताही संघ जास्तीत जास्त ४ खेळाडू रिटेन करू शकत होता. मात्र, यावेळी नियमात बदल करण्यात आला आहे. सुत्रांच्या माहितीनुसार, आता संघ ४ ऐवजी ६ खेळाडूंना रिटेन करू शकतात.
अशा परिस्थितीत चेन्नई सुपर किंग्ज त्यांच्या कोणत्या ६ खेळाडूंना कायम ठेवू शकते हे जाणून घेऊया.
रिपोर्टनुसार, चेन्नई सुपर किंग्जने कायम ठेवण्यासाठी ६ खेळाडूंची यादी तयार केली आहे. या ६ खेळाडू वगळता इतर सर्व खेळाडूंना रीलिज करण्यात येणार आहे.
रिटेन करण्यात येणाऱ्या खेळाडूंच्या यादीत कर्णधार ऋतुराज गायकवाड, अष्टपैलू रवींद्र जडेजा, शिवम दुबे, वेगवान गोलंदाज मथिशा पाथिराना, सलामीवीर फलंदाज ड्वेन कॉनवे आणि माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी यांचा समावेश असू शकतो.
याचा अर्थ चेन्नई सुपर किंग्ज शार्दुल ठाकूर, मुस्तफिजुर रहमान, रचिन रवींद्र, डॅरिल मिशेल, दीपक चहर, अजिंक्य रहाणे, मोईन अली आणि महिष थीक्षाना या दिग्गजांना सोडणार आहे. याशिवाय समीर रिझवी, तुषार देशपांडे यांसारखे तरुण खेळाडूही रीलिज होणार आहेत.
३१ जुलै रोजी झालेल्या बैठकीत काही संघमालकांनी मेगा लिलाव करण्यावर आक्षेप घेतला होता. पण बीसीसीआय मेगा लिलाव रद्द करण्याच्या मनस्थितीत नाही.
IPL २०२५ साठी मेगा लिलाव होणार असल्याची बातमी पसरली तेव्हा ३-४ खेळाडूंना कायम ठेवण्याचा नियम उघड झाला. आता संघ मालकांसोबत झालेल्या बैठकीनंतर बीसीसीआय प्रत्येक फ्रँचायझीला ६ खेळाडू कायम ठेवण्याची परवानगी देऊ शकते.