MS Dhoni: धोनीची दुखापतीवर मात, बॅडमिंटन खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल, पण आयपीएल २०२५ मध्ये खेळणार का?-ipl 2025 ms dhoni playing badminton video goes viral sparks fitness and return speculations ,क्रिकेट बातम्या
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  MS Dhoni: धोनीची दुखापतीवर मात, बॅडमिंटन खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल, पण आयपीएल २०२५ मध्ये खेळणार का?

MS Dhoni: धोनीची दुखापतीवर मात, बॅडमिंटन खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल, पण आयपीएल २०२५ मध्ये खेळणार का?

Aug 28, 2024 10:38 AM IST

MS Dhoni Playing Badminton: धोनीचा बॅडमिंटन खेळतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यानंतर त्याच्या फीटनेसबाबत चर्चा सुरू झाल्या असून तो आयपीएल २०२५ मध्ये खेळणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

धोनीचा बॅडमिंटन खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल
धोनीचा बॅडमिंटन खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल

MS Dhoni Viral Video: चेन्नई सुपरकिंग्जचा माजी कर्णधार आणि यष्टीरक्षक महेंद्रसिंह धोनी आयपीएल २०२५ मध्ये खेळणार की नाही, हा प्रश्न चाहत्यांच्या मनात सतत सुरू आहे. धोनीने यासंदर्भात अद्याप स्पष्टपणे काहीही सांगितलेले नाही. नुकताच धोनीचा बॅडमिंटन खेळतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला, ज्यात तो शक्तिशाली स्मॅश करताना दिसत आहे. यावरून तो पूर्णपणे बरा आणि उत्कृष्ट शारीरिक स्थितीत असल्याचे दिसून येते. आयपीएलल्या गेल्या हंगामात तो गुडघ्याच्या दुखापतीने त्रस्त असल्याचे अनेक व्हिडिओ समोर आले होते. मात्र, या व्हायरल व्हिडिओमुळे धोनीच्या आयपीएल पुनरागमनाबद्दल उत्सुकता वाढली आहे.

धोनीने भले आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असेल, पण तरीही त्याचे खेळावरील प्रेम कमी झालेले नाही. धोनीला फक्त क्रिकेट खेळायला आवडते असे नाही, त्याला इतर खेळांमध्येही रस आहे. नुकताच तो झारखंडमध्ये टेनिस खेळताना दिसला, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. धोनीने पुन्हा एकदा दाखवून दिले की तो एक खेळाडू म्हणून तंदुरुस्त आहे आणि अजूनही आयपीएलमध्ये खेळू शकतो. आयपीएल २०२४ मध्ये धोनीला गुडघ्याला दुखापत झाली होती. मात्र, आता असे दिसते आहे की, धोनी दुखापतीतून सावरला असून तो तंदुरुस्त दिसत आहे.

आयपीएलच्या गेल्या हंगामात धोनीने आपल्या फीटनेसबाबत चिंता व्यक्त केली होती. यामुळे आयपीएल २०२४ धोनीच्या कारकिर्दीतील शेवटचा हंगाम असेल, असे बोलले जात होते. मात्र, धोनीने अद्याप त्याच्या निवृत्तीवर भाष्य केले नाही. आयपीएलच्या पुढच्या हंगामात तो खेळणार की नाही, हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होईल.

सीएसकेचे सीईओ काशी विश्वनाथ काय म्हणाले?

आयपीएलच्या नियमांनुसार, पाच वर्षांपूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झालेल्या खेळाडूंना अनकॅप्ड खेळाडू मानले जात होते. परंतु, २०२१ मध्ये हा नियम रद्द करण्यात आला. नुकतेच, सीएसकेचे सीईओ काशी विश्वनाथ यांनी सांगितले होते की भारतीय क्रिकेट नियामक मंडळ नियमांबाबत निर्णय घेईल.

धोनी आयपीएल २०२५ मध्ये खेळण्याची शक्यता

धोनीने कोणताही निर्णय घेण्यापूर्वी आयपीएल २०२५ च्या मेगा लिलावाच्या पार्श्वभूमीवर रिटेन्शन नियम पाहणार असल्याचे सांगितले. धोनीने एका इव्हेंटमध्ये सांगितले होते की, 'फ्रँचायझी आणि व्यवस्थापनाकडे रिटेन्शन नियमाबाबत निर्णय घेण्यासाठी अजून बराच वेळ आहे. हे सर्व ठरल्यावर मी निर्णय घेईन. शेवटी कोणताही निर्णय सीएसके​​च्या हिताचा असावा असे आम्हा सर्वांना वाटते.' धोनीच्या या वक्तव्यावरून तो आयपीएल २०२५ मध्ये खेळण्यास उत्सुक असल्याचे दिसत आहे.

विभाग