आयपीएल २०२५ च्या मेगा लिलावापूर्वी रिटेन्शन नियम जाहीर झाले आहेत. आता संघ सहा खेळाडूंना रिटेन करू शकतील. या दरम्यान, ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटपटू आणि कोच टॉम मूडी यांनी एक आश्चर्यकारक विधान केले आहे.
मूडी यांनी आयपीएल संघांना कोचिंगही दिले आहे. मुडी यांनी टीम इंडियाचा ऑलराऊंडर आणि मुंबई इंडयियन्सचा कर्णधार हार्दिक पंड्या याला १८ कोटी रुपयांमध्ये रिटेन करायचे की नाही याबाबत वक्तव्य केले आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, संघ १८-१८ कोटी रुपयांच्या दोन खेळाडूंना, १४-१४ कोटी रुपयांच्या दोन खेळाडूंना आणि ११-११ कोटी रुपयांमध्ये प्रत्येकी दोन खेळाडूंना रिटेन करू शकतात.
क्रिकइन्फोच्या वृत्तानुसार, या मुद्द्यावर मूडी म्हणाले, "गेल्या सीझनमध्ये ज्या प्रकारे गोष्टी घडल्या त्यानुसार रोहितबद्दल काहीही सांगता येत नाही." मला वाटते जसप्रीत बुमराह आणि सूर्यकुमार यादव यांना प्रत्येकी १८ कोटी रुपयांमध्ये रिटेन करावे. या यादीत पंड्याचा समावेश व्हावा, असे वाटत नाही.
पंड्याला १४ कोटी रुपये मिळू शकतात, असे मूडी यांनी सांगितले. त्याचा फॉर्म आणि फिटनेस यावरही ते अवलंबून असेल. मात्र या सर्व क्षेत्राबाबत बोलायचे झाल्यास त्याला १८ कोटी रुपये मिळावेत असे वाटत नाही. जेव्हा तुम्ही १८ कोटी रुपये खर्च करता तेव्हा तुम्हाला एक चांगला मॅच विनर खेळाडू मिळावा, अशी अपेक्षा असते.
विशेष म्हणजे, आयपीएल २०२४ च्या आधी मुंबई इंडियन्सने रोहित शर्माला कर्णधारपदावरून हटवले होते. त्याच्या जागी हार्दिक पांड्याला कर्णधार बनवण्यात आले. त्या मोसमात संघाची कामगिरी अत्यंत खराब होती. रोहितला कर्णधारपदावरून हटवण्यावरून बराच वादही झाला होता. अशा स्थितीत रोहित संघासोबत राहणार की नाही याबाबत आताच काही सांगता येणार नाही.
पंड्या हा अष्टपैलू खेळाडू असून त्याने अनेक प्रसंगी चमकदार कामगिरी केली आहे. पण गेल्या आयपीएलचा हंगाम पंड्यासाठी काही खास नव्हता. इंडियन प्रीमियर लीगमध्ये त्याने आतापर्यंत १३७ सामने खेळले आहेत. त्यात त्याने २५२५ धावा केल्या आहेत. पंड्याने १० अर्धशतकांसह ६४ विकेट्सही घेतल्या आहेत.
संबंधित बातम्या