IPL २०२५ साठी खेळाडूंचा मेगा लिलाव रविवारपासून (२४ नोव्हेंबर) होणार आहे. हा लिलाव दोन दिवस चालेल. पण याआधी एका मॉक ऑक्शनचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये दिल्ली कॅपिटल्सचा माजी खेळाडू ऋषभ पंत याला सर्वाधिक किमत मिळाली.
पंजाब किंग्जने मॉक ऑक्शनमध्ये पंतवर मोठी बोली लावली आणि त्याला ३३ कोटी रुपयांना विकत घेतले. पंतसह या मॉक ऑक्शनमध्ये केएल राहुल, श्रेयस अय्यर आणि इशान किशन यांना मोठ्या किमती मिळाल्या. युझवेंद्र चहल आणि ऑस्ट्रेलियन खेळाडू मिचेल मार्श यांनाही मोठी किंमत मिळाली. पंतला दिल्ली कॅपिटल्सने सोडले आहे. आता तो मेगा ऑक्शनमध्ये मोठी कमाई करू शकतो. मॉक
जिओ सिनेमाच्या मॉक ऑक्शनमध्ये ऋषभ पंत सर्वात महागडा ठरला. पंतला पंजाब किंग्जने ३३ कोटी रुपयांना विकत घेतले. तर आरसीबीने केएल राहुलवर मोठी बोली लावली. आरसीबीने राहुलला २९.५ कोटींना खरेदी केले. श्रेयस अय्यरबद्दल बोलायचे झाले तर KKR ने त्याला २१ कोटी रुपयांमध्ये खरेदी केले.
जिओ सिनेमाच्या मॉक ऑक्शनमध्ये ईशान किशनला दिल्ली कॅपिटल्सने विकत घेतले. इशानला १५.५ कोटी रुपये मिळाले. हैदराबादने युजवेंद्र चहलला १५ कोटींना विकत घेतले. मुंबई इंडियन्सने मिचेल मार्शवर बाजी मारली. तो १८ कोटींना विकला गेला.
IPL २०२५ मेगा लिलाव २४ आणि २५ नोव्हेंबर रोजी जेद्दाह येथे होणार आहे. ५७४ खेळाडूंवर बोली लागणार आहे. मेगा लिलावात अनेक खेळाडूंची मूळ किंमत २ कोटी रुपये आहे. तर काही खेळाडूंची मूळ किंमत १.५० कोटी रुपये आहे.
ऋषभ पंत - पंजाब किंग्स - ३३ कोटी रु
केएल राहुल - रॉयल चॅलेंजर्स बंगलोर - २९.५ कोटी रु
श्रेयस अय्यर - कोलकाता नाईट रायडर्स - २१ कोटी रु
इशान किशन - दिल्ली कॅपिटल्स - रु. १५.५ कोटी
युझवेंद्र चहल – सनरायझर्स हैदराबाद – १५ कोटी रुपये
मिचेल मार्श - मुंबई इंडियन्स - १८ कोटी रु