आयपीएल २०२५ साठी मेगा लिलाव आज (२४ नोव्हेंबर) आणि उद्या सोमवारी (२५ नोव्हेंबर) रोजी होणार आहे. या मेगा ऑक्शनमध्ये अनेक खेळाडूंवर मोठ्या बोली लावल्या जाऊ शकतात. लिलावासाठी अनेक मोठी नावे रिंगणात आहे, ज्यांवर संघ २५ कोटी रुपये खर्च करू शकतात. चला तर मग जाणून घेऊया असे कोणते खेळाडू आहेत ज्यांच्यावर संघ मोठ्या बोली लावण्यास तयार असतील.
गेल्या मोसमापर्यंत दिल्ली कॅपिटल्सचे नेतृत्व करणाऱ्या ऋषभ पंतसाठी संघ २५ कोटी रुपये खर्च करण्यास तयार असू शकतात. IPL २०२५ मध्ये पंत सर्वात महागडा खेळाडू बनू शकतो. आता पंतला कोणता संघ कोणत्या किंमतीत खरेदी करतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
गेल्या मोसमापर्यंत केएल राहुल लखनऊ सुपर जायंट्सचे नेतृत्व करताना दिसला होता, पण नंतर त्याला सोडण्यात आले. आता या मेगा लिलावात राहुललाही २५ कोटी रुपयांपर्यंत किंमत मिळू शकते.
कोलकाता नाईट रायडर्सने श्रेयस अय्यरला रिलीज करून सर्वांना आश्चर्यचकित केले. अय्यरच्या नेतृत्वाखाली, केकेआरने आयपीएल २०२४ चे विजेतेपद जिंकलेहोते, पण त्यानंतरही फ्रँचायझीने त्याला सोडले. अशा परिस्थितीत मेगा लिलावात त्यांना २० कोटी रुपयांपर्यंत किंमत मिळण्याची शक्यता आहे.
इंग्लंडचा यष्टिरक्षक फलंदाज जोस बटलर आयपीएल २०२४ पर्यंत राजस्थान रॉयल्सचा भाग होता. यावेळी बटलर मेगा लिलावात मैदानात उतरणार आहे. बटलरसारख्या महान फलंदाजाला विकत घेण्यासाठी संघ २० कोटी रुपयांपर्यंत खर्च करण्यास तयार असू शकतात.
मोहम्मद शमी आयपीएल २०२४ पर्यंत गुजरात टायटन्सचा भाग राहिला. मात्र, दुखापतीमुळे तो २०२४ चा हंगाम खेळू शकला नाही. पण शमी २०२३ च्या आयपीएलमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज ठरला होता.
आता शमी या दुखापतीतून सावरला असून सध्या तो टीम इंडियाच्या प्रमुख गोलंदाजांपैकी एक आहे. अशा परिस्थितीत संघ शमीवरहीो २० कोटी रुपये खर्च करू शकतात.