IPL Auction : आरसीबीचं ठरलं! या ५ खेळाडूंवर धनवर्षाव करणार, कोणत्याही किंमतीत संघात आणणार, जाणून घ्या
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  IPL Auction : आरसीबीचं ठरलं! या ५ खेळाडूंवर धनवर्षाव करणार, कोणत्याही किंमतीत संघात आणणार, जाणून घ्या

IPL Auction : आरसीबीचं ठरलं! या ५ खेळाडूंवर धनवर्षाव करणार, कोणत्याही किंमतीत संघात आणणार, जाणून घ्या

Nov 18, 2024 03:20 PM IST

IPL 2025 Auction : आरसीबीच्या फॅन फॉलोइंगबद्दल सर्वांनाच माहिती आहे आणि विराट कोहली संघाचा भाग असल्याने त्याच्या संघात कोण-कोण सामील होणार याची सर्वांनाच उत्सुकता आहे.

IPL Auction : आरसीबीचं ठरलं! या ५ खेळाडूंवर धनवर्षाव करणार, कोणत्याही किंमतीत संघात आणणार, जाणून घ्या
IPL Auction : आरसीबीचं ठरलं! या ५ खेळाडूंवर धनवर्षाव करणार, कोणत्याही किंमतीत संघात आणणार, जाणून घ्या (PTI)

आयपीएल २०२५ मेगा लिलावासाठी आता केवळ आठवडाभराचा कालावधी शिल्लक राहिला आहे. आयपीएलचा लिलाव २४ आणि २५ नोव्हेंबर रोजी सौदी अरेबियातील जेद्दाह येथे होणार आहे. या लिलावात फ्रेंचायझी मोठ्या प्रमाणात बोली लावताना दिसतील. मात्र, चाहत्यांच्या नजरा आरसीबी संघावर आहेत.

आरसीबीच्या फॅन फॉलोइंगबद्दल सर्वांनाच माहिती आहे आणि विराट कोहली संघाचा भाग असल्याने त्याच्या संघात कोण-कोण सामील होणार याची सर्वांनाच उत्सुकता आहे.

RCB संघाने लिलावापूर्वी तीन खेळाडूंना रिटेन केले होते, ज्यात विराट कोहली, रजत पाटीदार आणि यश दयाल यांच्या नावांचा समावेश आहे. 

यश दयालचा संघात अनकॅप्ड खेळाडू म्हणून समावेश करण्यात आला असून आता आरसीबी संघात एकूण २२ जागा रिक्त आहेत, त्यापैकी ८ परदेशी खेळाडू असतील.

विशेष म्हणजे आरसीबी ८३ कोटी रुपयांची पर्स घेऊन आयपीएल लिलावात उतरणार आहे. अशा परिस्थितीत आरसीबी तगड्या खेळाडूंवर मोठ्या प्रमाणात पैसा खर्च करताना दिसणार आहे. 

जॉस बटलर

आरसीबी IPL २०२५ च्या लिलावात जोस बटलरला संघात खेचण्यासाठी चांगली बोली लावताना दिसू शकते. लिलावापूर्वी जोस बटलरला राजस्थान रॉयल्सने सोडले होते. राजस्थान संघाने त्याला आयपीएल २०२४ मध्ये १० कोटी रुपयांमध्ये आपल्यासोबत ठेवले होते.

आता आरसीबी संघ त्याला आयपीएल २०२५ च्या लिलावात खरेदी करू इच्छित आहे, कारण आरसीबी संघ कर्णधाराच्या शोधात आहे. फाफ डू प्लेसिसला सोडल्यानंतर आरसीबी संघ जोस बटलरला विकत घेऊन त्याला संघाचे कर्णधारपद देऊ शकते. कारण जॉस बटलरकडे इंग्लंडचे नेतृत्व करण्याचा चांगला अनुभव आहे. 

बटलर त्याच्या दुहेरी भूमिकेसाठी ओळखला जातो, पहिला फलंदाजी आणि दुसरा विकेटकीपिंग. अशा परिस्थितीत आरसीबी संघ दिनेश कार्तिकची जागाही भरून काढू शकते. 

केएल राहुल

आयपीएल २०२५ साठीच्या लिलावात आरसीबी केएल राहुल यालाही खरेदी करू शकते. केएल राहुल आरसीबीमध्ये सामील होणार असल्याची चर्चा अनेक दिवसांपासून सुरू आहे, कारण तो याआधीही आरसीबीकडून खेळला आहे.

अशा परिस्थितीत त्याच्या पुनरागमनाकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. राहुलने पंजाब किंग्ज आणि लखनौ सुपर जायंट्सचे नेतृत्व केले आहे आणि त्याच्या नेतृत्वाखाली लखनऊचा नवीन संघ ३ पैकी २ हंगामात प्लेऑफमध्ये पोहोचला आहे. अशा परिस्थितीत राहुलला विकत घेण्यासाठी आरसीबी संघ आयपीएल लिलावात बराच पैसा खर्च करू शकतो.

युझवेंद्र चहल

RCB संघ राजस्थान रॉयल्सचा माजी लेगस्पिनर युजवेंद्र चहल यालाही लिलावात खरेदी करण्यात स्वारस्य दाखवू शकतो. लिलावापूर्वी चहलला राजस्थान संघाने सोडले होते. चहल २०१४ ते २०२१ पर्यंत आरसीबीचा भाग होता.

त्यानंतर २०२२ च्या आयपीएल लिलावात राजस्थान रॉयल्सने त्याला ६.५० कोटी रुपयांना विकत घेतले. सामन्याच्या कोणत्याही क्षणी विकेट घेण्याची चहलकडे क्षमता आहे. हेच लक्षात घेऊन आरसीबी संघ त्याला आपल्या संघात समाविष्ट करू शकते.

चहलने आयपीएलमध्ये १६० सामने खेळताना २५० विकेट घेतल्या आहेत आणि आयपीएल २०२४ मध्ये त्याने १८ विकेट घेतल्या होत्या. चहलने २०२३ मध्ये २१ आणि २०२२ मध्ये २७ विकेट घेतल्या होत्या. 

हर्षल पटेल

आयपीएल २०२५ च्या मेगा लिलावात आरसीबी वेगवान गोलंदाज हर्षल पटेल याच्यावरही बोली लावू शकते. आयपीएल मेगा लिलावापूर्वी पंजाब किंग्सने हर्षलला रिलीज केले होते, पण हर्षलची अप्रतिम कामगिरी पाहता त्याच्यासाठी मोठी बोली लावली जाऊ शकते.

हर्षलने गेल्या मोसमात पंजाब किंग्जकडून १४ सामन्यांत २४ बळी घेतले होते. आरसीबी संघ हर्षल पटेलला परत आणू इच्छितो, ज्यामुळे वेगवान गोलंदाजीला अधिक धार मिळेल. हर्षलला २०२२ मध्ये आरसीबीने १०.७५ कोटी रुपयांना खरेदी केले होते.

ग्लेन मॅक्सवेल

आरसीबी ग्लेन मॅक्सवेल यालाही खरेदी करू इच्छित आहे. लिलावापूर्वी, RCB टीम RTM कार्ड वापरून मॅक्सवेलला खरेदी करू शकते. ग्लेन मॅक्सवेल आरसीबी टीमच्या मध्यक्रमाला मजबूत करू शकतो. याशिवाय त्याची गोलंदाजी मधल्या षटकांमध्ये संघासाठी योगदान देणारी ठरते.

ग्लेन मॅक्सवेलने आयपीएल २०२४ मध्ये १० सामने खेळले आणि गोलंदाजी करताना ६ विकेट्स घेतल्या, बॅटने ५२ धावा केल्या. त्याच्या आयपीएल कारकिर्दीत आतापर्यंत त्याने १३४ सामने खेळताना २७७१ धावा केल्या आहेत. तसेच, गोलंदाजीत ३७ विकेट्स घेतल्या आहेत.

Whats_app_banner