आयपीएल २०२५ च्या (IPL 2025) मेगा लिलावासंदर्भात एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. आयपीएलच्या मेगा लिलावापूर्वी खेळाडूंची रिटेन केलेल्या आणि रीलीज केलेल्या खेळाडूंची यादीही प्रसिद्ध केली जाईल. एका रिपोर्टनुसार, सर्व आयपीएल संघ नोव्हेंबरमध्ये खेळाडूंची यादी जाहीर करू शकतात आणि त्यानंतर डिसेंबरमध्ये एक मेगा ऑक्शन आयोजित केले जाऊ शकते.
मेगा लिलावाचे ठिकाण अद्याप निश्चित झालेले नाही. फ्रँचायझी आयपीएल २०२५ च्या धोरणातील बदलाची वाट पाहत आहेत. लवकरच त्यांची घोषणा होऊ शकते.
Cricbuzz च्या बातमीनुसार, IPL २०२५ साठी मेगा लिलाव डिसेंबरमध्ये आयोजित केला जाऊ शकतो. याआधी १५ नोव्हेंबरपर्यंत सर्व संघ रिटेन आणि रीलीज केलेल्या खेळाडूंची यादी जाहीर करू शकतात. बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी गेल्या महिन्यात आयपीएल संघांच्या मालकांची बैठक घेतली होती. यामध्ये आयपीएलच्या धोरणावर चर्चा झाली.
आता या सप्टेंबरच्या अखेरीस बीसीसीआयची वार्षिक बैठक होणार आहे. या वेळी नवीन नियम जाहीर केले जाऊ शकतात. यानंतर पुढील हंगामाची तयारी वेगाने सुरू होईल.
IPL २०२४ चा लिलाव दुबईत पार झाला होता. तर यापूर्वी देशातच लिलाव आयोजित करण्यात आला होता. जर आपण आयपीएल २०२५ च्या मेगा लिलावासाठी सध्या तीन ठिकाणे पुढे आली आहेत. आयपीएल २०२५ साठीचे मेगा ऑक्शन देशाची राजधानी दिल्ली, कोलकाता किंवा मुंबईत होऊ शकतो. मात्र याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
अनेक संघांचे कर्णधार बदलणार का?
IPL 2025 पूर्वी अनेक प्रकारच्या अफवा पसरल्या आहेत. मीडिया रिपोर्ट्सवर विश्वास ठेवला तर या हंगामात अनेक संघांचे कर्णधार बदलतील. आयपीएल 2024 मध्ये मुंबई इंडियन्सने कर्णधार बदलला होता. त्याने रोहित शर्माला काढून हार्दिक पांड्याकडे जबाबदारी दिली.
यावर बराच गदारोळ झाला. यावेळीही मुंबईत बदल होऊ शकतात. यासोबतच लखनऊ सुपर जायंट्ससह अनेक संघ बदलांसह दिसू शकतात.