IPL 2025 Mega Auction : सर्व संघ पर्स तर पंजाब किंग्स पैशांची पोतडी घेऊन येणार, कोणाकडे किती रक्कम शिल्लक? पाहा
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  IPL 2025 Mega Auction : सर्व संघ पर्स तर पंजाब किंग्स पैशांची पोतडी घेऊन येणार, कोणाकडे किती रक्कम शिल्लक? पाहा

IPL 2025 Mega Auction : सर्व संघ पर्स तर पंजाब किंग्स पैशांची पोतडी घेऊन येणार, कोणाकडे किती रक्कम शिल्लक? पाहा

Nov 23, 2024 10:28 PM IST

IPL Auction 2025 News In Marathi : आयपीएल २०२५ चा मेगा लिलाव सौदी अरेबियाच्या वेळेनुसार दुपारी १२:३० वाजता सुरू होईल. म्हणजे भारतात तुम्ही दुपारी ३ वाजल्यापासून मेगा लिलाव पाहू शकाल. २४ आणि २५ नोव्हेंबर, म्हणजेच लिलावाच्या दोन्ही दिवसांची वेळ सारखीच आहे.

IPL 2025 Mega Auction : पंजाब किंग्स पैशांची पोतडी घेऊन येणार, तर या संघाकडे सर्वात कमी रक्कम शिल्लक? पाहा
IPL 2025 Mega Auction : पंजाब किंग्स पैशांची पोतडी घेऊन येणार, तर या संघाकडे सर्वात कमी रक्कम शिल्लक? पाहा

IPL 2025 Mega Auction All 10 Teams Purse Value : आयपीएल २०२५ साठी खेळाडूंचे मेगा ऑक्शन २४ आणि २५ नोव्हेंबर रोजी जेद्दाह येथे होणार आहे. यामध्ये २०४ स्लॉटसाठी ५७४ खेळाडूंवर बोली लागणार आहे. मेगा लिलावात अनेक खेळाडूंची मूळ किंमत २ कोटी रुपये आहे. तर काही खेळाडूंची बेस प्राइस १.५० कोटी रुपये आहे.

यावेळी आयपीएलच्या मेगा लिलावात ३६६ भारतीय आणि २०८ परदेशी खेळाडूंचा समावेश आहे. या परदेशी खेळाडूंमध्ये ३ सहयोगी देशांच्या खेळाडूंचाही समावेश आहे. तसेच, आयपीएल मेगा ऑक्शनमध्ये ३१८ भारतीय अनकॅप्ड खेळाडू आणि १२ अनकॅप्ड परदेशी खेळाडूही सहभागी होणार आहेत. एकूण २०४ स्लॉट उपलब्ध आहेत, त्यापैकी ७० स्लॉट विदेशी खेळाडूंसाठी राखीव आहेत. यावेळी खेळाडूची सर्वाधिक बेस प्राइस २ कोटी रुपये असून, या श्रेणीत ८१ खेळाडूंनी आपली नावे नोंदवली आहेत.

कोणत्या संघाकडे किती रक्कम शिल्लक?

आयपीएल २०२५ च्या मेगा लिलावासाठी सर्व संघांच्या पर्समध्ये १२० कोटी रुपये होते. मात्र प्रत्येक संघाने काही खेळाडूंना रिटेन केले आहे. त्यानंतर आता सर्व संघांच्या पर्समधील काही रक्कम कमी झाली आहे.

राजस्थान रॉयल्स : राजस्थान रॉयल्सने ६ खेळाडूंना कायम ठेवले आहे. या खेळाडूंना रिटेन करण्यासाठी राजस्थानने ७९ कोटी रुपये खर्च केले आहेत. त्यामुळे राजस्थान रॉयल्सच्या पर्समध्ये आता फक्त ४१ कोटी रुपये शिल्लक आहेत.

सनरायझर्स हैदराबाद : सनरायझर्स हैदराबादने ७५ कोटी रुपये खर्च करून ५ खेळाडूंना कायम ठेवले आहे. हैदराबादकडे अनकॅप्ड खेळाडूकरिता राईट टू मॅच कार्ड आहे. आता IPL २०२५ मेगा लिलावासाठी सनरायझर्स हैदराबादकडे ४५ कोटी रुपये शिल्लक आहेत.

मुंबई इंडियन्स : मुंबई इंडियन्सने ५ खेळाडूंना कायम ठेवले आहे. या खेळाडूंना कायम ठेवण्यासाठी मुंबईने ७५ कोटी रुपये खर्च केले आहेत. त्यामुळे मुंबई इंडियन्सच्या खिशात आता फक्त ४५ कोटी रुपये उरले आहेत. हैदराबादकडे अनकॅप्ड खेळाडूसाठी राईट टू मॅच कार्ड आहे.

कोलकाता नाईट रायडर्स : कोलकाता नाईट रायडर्सने ६ खेळाडूंना रिटेन केले आहे. या खेळाडूंना कायम ठेवण्यासाठी कोलकाताने ६९ कोटी रुपये खर्च केले आहेत. त्यामुळे कोलकाता नाईट रायडर्सच्या खिशात आता फक्त ५१ कोटी रुपये शिल्लक आहेत.

चेन्नई सुपर किंग्स: चेन्नई सुपर किंग्सने ६५ कोटी रुपये खर्च करून ५ खेळाडूंना रिटेन केले आहे. चेन्नईकडे अनकॅप्ड खेळाडूसाठी राईट टू मॅच कार्ड आहे. आता चेन्नई सुपर किंग्जकडे आयपीएल २०२५ मेगा लिलावासाठी ५५ कोटी रुपये शिल्लक आहेत.

लखनौ सुपर जायंट्स : लखनौ सुपर जायंट्सने ५ खेळाडूंना कायम ठेवले आहे. या खेळाडूंना रिटेन करण्यासाठी लखनौने ५१ कोटी रुपये खर्च केले आहेत. त्यामुळे आता लखनौ सुपर जायंट्सच्या पर्समध्ये फक्त ६९ कोटी रुपये शिल्लक आहेत. लखनौला कॅप्ड खेळाडूकरिता कार्ड मॅच करण्याचा अधिकार आहे.

गुजरात टायटन्स: गुजरात टायटन्सने ५१ कोटी रुपये खर्च करून ५ खेळाडूंना कायम ठेवले आहे. गुजरातकडे एका कॅप्ड खेळाडूसाठी राईट टू मॅच कार्ड आहे. आता IPL २०२५ मेगा लिलावासाठी गुजरात टायटन्सकडे ६९ कोटी रुपये शिल्लक आहेत.

दिल्ली कॅपिटल्स: दिल्ली कॅपिटल्सने ४ खेळाडूंना रिटेन करण्यासाठी ४३.७५ कोटी रुपये खर्च केले आहेत. दिल्लीकडे दोन राइट टू मॅच कार्ड आहेत. ज्याद्वारे ते प्रत्येकी एक अनकॅप्ड आणि कॅप्ड प्लेअर किंवा दोन्ही कॅप्ड प्लेअर खरेदी करू शकतात. आता आयपीएल २०२५ मेगा लिलावासाठी दिल्ली कॅपिटल्सकडे ७६.२५ कोटी रुपये शिल्लक आहेत.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने ३ खेळाडूंना कायम ठेवले आहे. या खेळाडूंना कायम ठेवण्यासाठी बेंगळुरूने ३७ कोटी रुपये खर्च केले आहेत. अशा परिस्थितीत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या पर्समध्ये आता फक्त ८३ कोटी रुपये शिल्लक आहेत. बेंगळुरूकडे तीन राइट टू मॅच कार्ड आहेत. ज्याद्वारे ते एक अनकॅप्ड आणि २ कॅप्ड खेळाडू खरेदी करू शकतात किंवा ते तीनही कॅप्ड खेळाडू खरेदी करू शकतात.

पंजाब किंग्स : पंजाब किंग्जने ९.५ कोटी रुपये खर्च करून २ खेळाडूंना कायम ठेवले आहे. पंजाबकडे चार कॅप्ड खेळाडूंसाठी कार्ड मॅच करण्याचा अधिकार आहे. आता आयपीएल २०२५ मेगा लिलावासाठी पंजाब किंग्जकडे ११०.५ कोटी रुपये शिल्लक आहेत.

Whats_app_banner