आयपीएल २०२५साठी खेळाडूंचा मेगा लिलाव संपला आहे. सौदी अरेबियातील जेद्दाह येथे दोन दिवस (रविवार आणि सोमवार) या लिलावाचे आयोजन करण्यात आले होते. IPL 2025 च्या मेगा लिलावात एकूण १८२ खेळाडू विकले गेले. या कालावधीत सर्व १० संघांनी एकूण ६३९.१५ कोटी रुपये खर्च केले.
मेगा लिलावात एकूण ६२ परदेशी खेळाडू विकले गेले. सर्व संघांनी एकूण ८ वेळा RTM चा वापर केला. बिहारचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी हा लिलावात विकला गेलेला सर्वात तरुण खेळाडू ठरला.
राजस्थानने वैभवला १.१० कोटी रुपयांना खरेदी केले. यंदाच्या लिलावात ऋषभ पंत हा सर्वात महागडा खेळाडू ठरला. ऋषभ पंतला लखनौ सुपर जायंट्सने २७ कोटींना खरेदी केले. पंत व्यतिरिक्त, श्रेयस अय्यरला पंजाब किंग्जने २६.७५ कोटी रुपयांना आणि व्यंकटेश अय्यरला कोलकाता नाइट रायडर्सने (KKR) २३.७५ कोटी रुपयांना विकत घेतले.
दोन दिवस चाललेल्या या मेगा लिलावात एकूण ५७७ खेळाडूंचा सहभाग होता, त्यापैकी 182 खेळाडूंची विक्री झाली, तर ३९५वखेळाडूंसाठी कोणीही बोली लावली नाही.
मेगा लिलावाच्या दुसऱ्या दिवशी भुवनेश्वर कुमार, दीपक चहर आणि मुकेश कुमार या भारतीय खेळाडूंसाठी मोठ्या बोली लागल्या. आरसीबीने भुवनेश्वरला १०.७५ कोटी रुपयांना, मुंबई इंडियन्सने दीपक चहरला ९.२५ कोटी रुपयांना आणि मुकेश कुमारला दिल्ली कॅपिटल्सने ८ कोटी रुपयांना खरेदी केले.
अर्जुन तेंडुलकरला मुंबई इंडियन्सने दुसऱ्यांदा ३० लाख रुपयांच्या मूळ किमतीत खरेदी केले.
गेल्या मोसमापर्यंत मुंबई इंडियन्सचा भाग असलेला सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन आयपीएल २०२५ च्या लिलावात अनसोल्ड ठरला. यावेळी या खेळाडूला कोणत्याही संघाने खरेदी केले नाही.
ऑक्शनच्या शेवटच्या राऊंडमध्ये अजिंक्य रहाणे आणि ग्लेन फिलिप्स यांना खरेदीदार मिळाला. रहाणेला केकेआरने दीड कोटी रुपयांना विकत घेतले. तर फिलिप्सला गुजरात टायटन्सने २ कोटींमध्ये घेतले. दोन्ही त्यांच्या बेस प्राइसमध्ये विकले गेले.
IPL २०२५ च्या लिलावात सर्वात तरुण खेळाडू वैभव सूर्यवंशी करोडपती झाला आहे. १३ वर्षीय वैभवला राजस्थान रॉयल्सने १.१० कोटी रुपयांना विकत घेतले आहे. दिल्लीनेही वैभवसाठी बराच वेळ बोली लावली होती. वैभवची मूळ किंमत ३० लाख रुपये होती.
दिल्ली प्रीमियर लीगमध्ये ६ चेंडूत ६ षटकार मारणाऱ्या प्रियांश आर्य याला पंजाब किंग्जने मूळ किमतीपेक्षा जवळपास १३ पट जास्त पैसे दिले. पंजाबने या युवा खेळाडूला ३.८० कोटी रुपयांना खरेदी केले. आरसीबीने या खेळाडूसाठी ३.६० कोटी रुपयांपर्यंत बोली लावली होती.
ऑस्ट्रेलियाच्या स्टीव्ह स्मिथमध्ये कोणीही रस दाखवला नाही, ज्याची मूळ किंमत २ कोटी रुपये होती.
युधवीर सिंग चरकला राजस्थान रॉयल्सने ३५ लाख रुपयांना विकत घेतले. त्याची मूळ किंमत ३० लाख रुपये होती.
विल जॅकला मुंबई इंडियन्सने ५.२५ कोटी रुपयांना विकत घेतले. त्याची मूळ किंमत २ कोटी रुपये होती. आरसीबीने जॅकसाठी आरटीएमचा वापर केला नाही.
मनीष पांडेला कोलकाताने त्याची मूळ किंमत ७५ लाख रुपये देऊन विकत घेतले.
लखनौने शाहबाज अहमदसाठी २.४० कोटी रुपयांची यशस्वी बोली लावली. त्याची मूळ किंमत एक कोटी रुपये होती.
अल्लाह गझनफर याला मुंबई इंडियन्सने ४.८०नकोटी रुपयांना विकत घेतले. त्याची मूळ किंमत ७५ लाख रुपये होती.
लखनौने आकाश दीपसाठी ८ कोटींची बोली लावली. आरसीबीने त्याच्यासाठी आरटीएमचा वापर केला नाही. आकाशची मूळ किंमत एक कोटी रुपये होती.
पंजाब किंग्जने मुकेश कुमारसाठी ६.५०वकोटींची बोली लावली. दिल्लीने मुकेशसाठी आरटीएमचा वापर केला आणि पंजाबने मुकेशसाठी ८ कोटी रुपयांची अंतिम बोली प्रस्तावित केली, जी दिल्लीने स्वीकारली. अशाप्रकारे दिल्लीने मुकेशला RTM द्वारे ८ कोटी रुपयांना विकत घेतले. मुकेशची मूळ किंमत २ कोटी रुपये होती.
दीपक चहरसाठी मुंबई इंडियन्सने ९.२५ कोटींची बोली लावली. चेन्नईने त्याच्यासाठी RTM वापरले नाही. चहरची मूळ किंमत २ कोटी रुपये होती.
भारतीय वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारची मूळ किंमत २ कोटी रुपये होती. आरसीबीने भुवनेश्वरला १०.७५ कोटी रुपयांना खरेदी केले.
तुषार देशपांडे मूळ किंमत १ कोटी रुपये घेऊन मैदानात उतरला. त्याच्यासाठी राजस्थान आणि सीएसके यांच्यात स्पर्धा होती. अखेर राजस्थानने तुषारला ६.५० कोटींना खरेदी केले.
नितीश राणाला राजस्थान रॉयल्सने ४.२० कोटी रुपयांना विकत घेतले. त्याची मूळ किंमत १.५० कोटी रुपये होती.
कृणाल पांड्याची मूळ किंमत २ कोटी रुपये होती. क्रुणालला आरसीबीने ५.७५ कोटी रुपयांना खरेदी केले.
मार्को यान्सेनची मूळ किंमत १.२५ कोटी रुपये होती. पंजाब किंग्जने त्याला ७ कोटी रुपयांना खरेदी केले. यान्सेनला घेण्यासाठी मुंबई आणि पंजाबमध्ये बराच काळ चुरस रंगली होती.
सॅम करनला सीएसकेने घेतले. त्याची बेस प्राइस २ कोटी होती. त्याला सीएसकेने २.४० कोटीमध्ये खरेदी केले.
वॉशिंग्टन सुंदरला गुजरात टायटन्सने ३.२० कोटी रुपयांना विकत घेतले. सुंदरची मूळ किंमत २ कोटी रुपये होती.
मयंक अग्रवालला कोणत्याही संघाने खरेदी केले नाही ज्याची मूळ किंमत १ कोटी रुपये आहे.
पृथ्वी शॉमध्ये कोणत्याही संघाने स्वारस्य दाखवले नाही . त्याची मूळ किंमत ७५ लाख रुपये होती.
भारताचा अष्टपैलू शार्दुल ठाकूर हा अनसोल्ड ठरला. त्याची मूळ किंमत २ कोटी रुपये होती.
भारतीय फलंदाज अजिंक्य रहाणे मूळ किंमत १.५० कोटी घेऊन मैदानात उतरला होता आणि कोणत्याही संघाने त्याला घेण्यास स्वारस्य दाखवले नाही.
दिल्ली कॅपिटल्सने फाफ डुप्लेसिससाठी २ कोटी रुपयांची बोली लावली. RCB कडे RTM पर्याय उपलब्ध होता, पण बेंगळुरूने त्याचा वापर केला नाही. डुप्लेसिस त्याच्या मूळ किमतीत दिल्लीत दाखल झाला.
वेस्ट इंडिजचा झंझावाती फलंदाज रोव्हमन पॉवेलमध्ये फारशा संघांनी रस दाखवला नाही. कोलकाता नाईट रायडर्सने पॉवेलला त्याच्या मूळ किमतीत दीड कोटी रुपयांना खरेदी केले. पॉवेल आज विकला जाणारा पहिला खेळाडू होता.
न्यूझीलंडचा फलंदाज केन विल्यमसन याला कोणत्याही संघाने विकत घेतले नाही. विल्यमसनची मूळ किंमत २ कोटी रुपये आहे.
ग्लेन फिलिप्ससाठी कोणत्याही फ्रेंचायझीने बोली लावली नाही. त्याची मूळ किंमत २ कोटी रुपये होती.
पहिल्या दिवशी १० फ्रँचायझींनी मिळून ७२ खेळाडूंना खरेदी केले. यासाठी त्यांनी एकूण ४६७.९५ कोटी रुपये खर्च केले. आता संघांकडे एकूण १७३.५५ कोटी रुपये शिल्लक आहेत. आयपीएल मेगा ऑक्शन २०२५ च्या दुसऱ्या दिवशी १३२ खेळाडू लिलावाच्या मैदानात असतील.
आयपीएल ऑक्शनच्या दुसऱ्या दिवशी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघ सर्वाधिक रक्कम घेऊन लिलावाच्या टेबलावर बसेल. त्यांच्याकडे ३०.६५ कोटी रुपये शिल्लक आहेत. तर सध्या १६ खेळाडूंचे स्लॉट रिक्त आहेत, ज्यात ५ परदेशी खेळाडूंचा समावेश आहे.
यानंतर मुंबई इंडियन्सच्या पर्समध्ये २६.१० कोटी रुपये शिल्लक आहेत तर पंजाब किंग्जने दुसऱ्या दिवसाठी २२.५० कोटी रुपये वाचवले आहेत. गुजरात टायटन्सकडे १७.५० कोटी रुपये शिल्लक आहेत तर राजस्थान रॉयल्स लिलावाच्या शेवटच्या दिवशी १७.३५ कोटी रुपयांसह लिलावाच्या टेबलवर बसतील.
चेन्नई सुपर किंग्जच्या पर्समध्ये १५.६० कोटी रुपये शिल्लक आहेत, तर लखनऊ सुपर जायंट्स दुसऱ्या दिवशी १४.८५ कोटी रुपयांसह प्रवेश करेल. दिल्ली कॅपिटल्स १३.८०वकोटी रुपयांसह लिलावात प्रवेश करेल तर कोलकाता नाइट रायडर्स सोमवारी १०.०५ कोटी रुपयांसह लिलावात प्रवेश करेल. सनरायझर्स हैदराबादकडे सर्वात कमी पर्स आहे जी दुसऱ्या दिवशी ५.१५ कोटी रुपये आणेल.