IPL Auction : आयपीएल ऑक्शन फिक्स असते? विल जॅकचे उदाहरण देत चाहत्यानं केला दावा
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  IPL Auction : आयपीएल ऑक्शन फिक्स असते? विल जॅकचे उदाहरण देत चाहत्यानं केला दावा

IPL Auction : आयपीएल ऑक्शन फिक्स असते? विल जॅकचे उदाहरण देत चाहत्यानं केला दावा

Nov 26, 2024 06:16 PM IST

IPL Auction 2025 Fixed : आयपीएल २०२५ चा मेगा लिलाव २४-२५ नोव्हेंबर रोजी जेद्दाह येथे पार पडला. आता संपूर्ण लिलाव फिक्स झाल्याचा दावा एका चाहत्याने केला आहे.

IPL Auction : आयपीएल ऑक्शन फिक्स असते? विल जॅकचे उदाहरण देत चाहत्याचा दावा
IPL Auction : आयपीएल ऑक्शन फिक्स असते? विल जॅकचे उदाहरण देत चाहत्याचा दावा (JioCinema)

सौदी अरेबियाच्या जेद्दाह शहरात आयपीएल २०२५ साठी खेळाडूंचा लिलाव पार पडला. यामध्ये सर्वच संघांनी खेळाडूंवर पैशांचा पाऊस पाडला. यादरम्यान, ऑक्शनच्या दुसऱ्या दिवशी एक विचित्र घटना घडली. हे पाहून चाहत्यांनी आयपीएल ऑक्शन हे फिक्स असते, असे बोलण्यास सुरुवात केली.

वास्तविक, इंग्लंडच्या विल जॅक याला मुंबई इंडियन्सने खरेदी केले. या खरेदीनंतर मुंबई इंडियन्सचे मालक आकाश अंबानी हे उठून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाच्या मालकाजवळ गेले आणि त्यांच्याशी हात मिळवला. यानंतर चाहत्यांनी आयपीएल ऑक्शन फिक्स असल्याचे म्हणायला सुरुवात केली.

खरं तर,  मेगा लिलावात खेळाडूंवर बोली लावली जात असताना, संघ मालकं एकमेकांकडे बघून इशारा करताना तर कधी हसताना दिसतात. पण जेव्हा इंग्लंडचा दिग्गज फलंदाज विल जॅक्सची पाळी आली तेव्हा मुंबई इंडियन्सचे मालक आकाश अंबानी हस्तांदोलन करण्यासाठी आरसीबीच्या लिलाव टेबलावर गेले.

या लिलावात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने टीम डेव्हिडला विकत घेतले आहे. वास्तविक, एका चाहत्याने विल जॅक आणि टिम डेव्हिडच्या या व्यवहाराला फिक्सिंग म्हटले आहे.

सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एका चाहत्याने दावा केला आहे, की RCB आणि MI यांच्यात आधीच एक करार झाला आहे की ते अनुक्रमे टिम डेव्हिड आणि विल जॅकला खरेदी करणार आहेत. 

या चाहत्याने असेही सांगितले की, एकीकडे बेंगळुरूने विल जॅकला एमआयला ५.३ कोटींना विकले आहे आणि त्यापेक्षा खूपच कमी पैसे देऊन टीम डेव्हिडला ३ कोटींना विकत घेतले आहे. या व्हायरल पोस्टमध्ये हे पूर्णपणे फिक्स असल्याचे सांगितले आहे.

आरसीबीने RTM ची संधी गमावली

विल जॅकने २०२४ मध्ये आरसीबीकडून खेळताना आयपीएलमध्ये पदार्पण केले. संपूर्ण हंगामात, त्याने बेंगळुरूसाठी ८ सामन्यात ३३ च्या सरासरीने २३० धावा केल्या. १७५.५७ च्या स्फोटक स्ट्राईक रेटमुळे जॅक विशेषत: प्रसिद्धीच्या झोतात आला आणि तो आवश्यकतेनुसार गोलंदाजीही करू शकतो.

आयपीएल २०२४ मध्ये त्याने २ विकेट घेतल्या होत्या. अशा परिस्थितीत, जॅक हे आरसीबीसाठी ट्रम्प कार्ड मानले जात होते, या सर्व बाबी असतानाही आरसीबीने आरटीएमची सुवर्ण संधी गमावली होती.

दुसरीकडे, मुंबई इंडियन्सचे मालक आकाश अंबानी यांनी विल जॅकला ५.२५ कोटी रुपयांना खरेदी करून आनंदी दिसले कारण जॅकला त्याच्या T20 कारकिर्दीत १९१ सामन्यांचा अनुभव आहे. या प्रचंड कारकिर्दीत त्याने ४८४७ धावा करण्यासोबतच ६० विकेट्सही घेतल्या आहेत.

Whats_app_banner