IPL 2025 All 10 Teams Retention : आयपीएल २०२५ पूर्वी सर्व १० संघांनी रिटेन केलेल्या खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. ३१ ऑक्टोबर रोजी सर्व संघांनी कायम ठेवलेल्या खेळाडूंची यादी जाहीर केली. संघांना जास्तीत जास्त ६ खेळाडू कायम ठेवण्याचा अधिकार होता, परंतु केवळ दोन संघांनी पूर्ण ६ खेळाडू कायम ठेवण्याचा निर्णय घेतला.
सर्व १० संघांनी खेळाडू रिटेन करण्यासाठी किती पैसे खर्च केले आणि त्यांच्या पर्समध्ये आता किती पैसे शिल्लक आहेत, हे आपण येथे जाणून घेणार आहोत.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने विराट कोहली (रु. २१ कोटी), रजत पाटीदार (११ कोटी) आणि यश दयाल (५ कोटी) यांना कायम ठेवले. फ्रँचायझीने राखून ठेवण्यासाठी एकूण ३७ कोटी रुपये खर्च केले. आता मेगा लिलावासाठी संघाकडे ८३ कोटी रुपये शिल्लक आहेत.
पंजाब किंग्जने केवळ दोन खेळाडूंना कायम ठेवले, ज्यात शशांक सिंग (५.५ कोटी) आणि प्रभसिमरन सिंग (४ कोटी रुपये) यांचा समावेश होता. पंजाबने रिटेन्शनमध्ये ९.५ कोटी रुपये खर्च केले. आता मेगा लिलावासाठी फ्रेंचायझीकडे ११०.५ कोटी रुपयांचे पर्स मूल्य शिल्लक आहे.
सनरायझर्स हैदराबादने हेनरिक क्लासेन (रु. २३ कोटी), पॅट कमिन्स (रु. १८ कोटी), अभिषेक शर्मा (रु. १४ कोटी), ट्रॅव्हिस हेड (रु. १४ कोटी) आणि नितीश कुमार रेड्डी (६ कोटी रु.) या ५ खेळाडूंना कायम ठेवले. हैदराबादने रिटेन्शनसाठी ७५ कोटी रुपये खर्च केले. आता मेगा लिलावासाठी फ्रँचायझीकडे ४५ कोटी रुपयांचे पर्स मूल्य शिल्लक आहे.
मुंबई इंडियन्सने एकूण ५ खेळाडूंना कायम ठेवले, ज्यात जसप्रीत बुमराह (१८ कोटी), सूर्यकुमार यादव (१६.३५ कोटी), हार्दिक पंड्या (१६.३५ कोटी), रोहित शर्मा (१६.३० कोटी) आणि तिलक वर्मा (८ कोटी) यांचा समावेश आहे. मुंबईने रिटेन्शनसाठी एकूण ५५ कोटी रुपये खर्च केले. आता फ्रेंचायझीकडे ऑक्शनसाठी पर्समध्ये ५५ कोटी रुपये शिल्लक आहेत.
लखनौने निकोलस पूरन (रु.२१ कोटी), रवी बिश्नोई (११ कोटी), मयंक यादव (११ कोटी), मोहसिन खान (४ कोटी) आणि आयुष बडोनी (४ कोटी रु.) या ५ खेळाडूंना कायम ठेवले. फ्रँचायझीने कायम ठेवण्यासाठी ५१ कोटी रुपये खर्च केले. आता संघाच्या खिशात ६९ कोटी रुपये शिल्लक आहेत.
राजस्थानमध्ये संजू सॅमसन (१८ कोटी), यशस्वी जैस्वाल (१८ कोटी), रियान पराग (१४ कोटी), ध्रुव जुरेल (१४ कोटी), शिमरॉन हेटमायर (११ कोटी) आणि संदीप शर्मा (४ कोटी रुपये) यांचा समावेश आहे. ठेवली. संघाने ७९ कोटी रुपये खर्च केले आता संघाकडे ४१ कोटी रुपयांची पर्स शिल्लक आहे.
चेन्नईने ऋतुराज गायकवाड (१८ कोटी), मथिशा पाथिराना (१३ कोटी), शिवम दुबे (१२ कोटी), रवींद्र जडेजा (१८ कोटी) आणि एमएस धोनी (४ कोटी) यांना कायम ठेवले. फ्रँचायझीने कायम ठेवण्यासाठी ५५ कोटी रुपये खर्च केले. आता संघाकडे ६५ कोटी रुपयांची पर्स शिल्लक आहे.
केकेआरने रिंकू सिंग (१३ कोटी रुपये), वरुण चक्रवर्ती (१२ कोटी), सुनील नरेन (१२ कोटी), आंद्रे रसेल (१२ कोटी), हर्षित राणा (४ कोटी) आणि रमणदीप सिंग (४ कोटी रुपये) यांना खरेदी केले. ठेवली. फ्रँचायझीने राखून ठेवण्यासाठी ६९ कोटी रुपये खर्च केले. आता संघाकडे ५१ कोटी रुपये शिल्लक आहेत.
गुजरातने राशिद खान (१८ कोटी), शुभमन गिल (१६.५० कोटी), साई सुदर्शन (८.५० कोटी), राहुल तेवतिया (४ कोटी) आणि शाहरुख खान (४ कोटी) यांना कायम ठेवले. फ्रँचायझीने एकूण ५१ कोटी रुपये खर्च केले. आता संघाकडे ६९ कोटी रुपये शिल्लक आहेत.
दिल्लीने अक्षर पटेल (रु. १६.५० कोटी), कुलदीप यादव (१३.२५ कोटी), ट्रिस्टन स्टब्स (१० कोटी) आणि अभिषेक पोरेल (रु. ४ कोटी) यांना कायम ठेवले. फ्रँचायझीने रिटेन्शनसाठी एकूण ४७ कोटी रुपये खर्च केले. आता संघाकडे ७३ कोटी रुपयांची पर्स शिल्लक आहे.