Full list of sold and unsold players in IPL Auction 2025 : आयपीएल २०२५ साठी मेग ऑक्शन होत आहे. या मेगा लिलावाच्या दुसऱ्या दिवशी धक्कादायक बाबी घडल्या. वास्तविक, टीम इंडियाचा अनुभवी फलंदाज अजिंक्य रहाणे आणि न्यूझीलंडचा सुपरस्टार केन विल्यमसन याच्यासह अनेक दिग्गज खेळाडू अनसोल्ड राहिले आहेत.यामध्ये पृथ्वी शॉ आणि मयंक अग्रवाल यांच्या नावाचाही समावेश आहे. या खेळाडूंना कुणी विचारलंही नाही.
केन विल्यमसनची मूळ किंमत २ कोटी रुपये होती. तर रहाणेची मूळ किंमत १.५० कोटी रुपये होती. यांना खरेदीदार मिळाला नाही. पृथ्वीची मूळ किंमत फक्त ७५ लाख रुपये होती. टीम इंडियातून बाहेर पडल्यानंतर पृथ्वी देशांतर्गत संघातूनही बाहेर होता. आता त्याला आयपीएलमधूनही बाहेर राहावे लागू शकते.
अजिंक्य रहाणे हादेखील बऱ्याच दिवसांपासून टीम इंडियातून बाहेर आहे. विल्यमसनही बराच काळ न्यूझीलंड संघाबाहेर होता. रहाणे यापूर्वी चेन्नई सुपर किंग्जकडून खेळला आहे. मात्र यावेळी लिलावात त्याला कोणीही विकत घेतले नाही.
विल्यमसनबद्दल बोलायचे तर तो गुजरात टायटन्सचा एक भाग होता. पण आता त्याला पहिल्यांदाच कोणत्याही संघाने विकत घेतले नाही. या दोन्ही खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट तसेच आयपीएलमध्येही चमक दाखवली आहे.
पृथ्वी बऱ्याच दिवसांपासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून बाहेर आहे. नुकतेच मुंबईनेही त्याला संघातून वगळले. मीडिया रिपोर्ट्सनुसार, पृथ्वीवर कारवाई करण्यात आली. मुंबई क्रिकेट संघटनाही त्याच्या फिटनेसबाबत नाराज होते.
पृथ्वी यापूर्वी दिल्ली कॅपिटल्सचा भाग होता. मात्र संघाने त्याला रिलीज केले होते. पृथ्वीने आतापर्यंत आयपीएलमध्ये ७९ सामने खेळले आहेत. या कालावधीत त्याने १८९२ धावा केल्या आहेत.
अजिंक्य रहाणे - भारत
पृथ्वी शॉ - भारत
शार्दुल ठाकूर - भारत
मयंक अग्रवाल - भारत
डॅरिल मिशेल - न्यूझीलंड
केन विल्यमसन - न्यूझीलंड
ग्लेन फिलिप्स - न्यूझीलंड