भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) मंगळवारी आयपीएल २०२५ च्या मेगा लिलावाच्या तारखा जाहीर केल्या आहेत. सौदी अरेबियाची राजधानी जेद्दा येथे २४ आणि २५ नोव्हेंबर रोजी हा लिलाव होणार आहे. लिलावासाठी एकूण १,५७४ खेळाडूंनी (१,१६५ भारतीय, ४०९ परदेशी) नोंदणी केली आहे. या यादीत ३२० कॅप्ड, १२२४ अनकॅप्ड आणि ३० असोसिएट नेशन्सच्या खेळाडूंचा समावेश आहे. या लिलावात ७० परदेशी खेळाडूंसह जास्तीत जास्त २०४ खेळाडूंचे नशीब चमकू शकते. १० फ्रँचायझींना ६४१.५ कोटी रुपये खर्च करावे लागतील. प्रत्येक फ्रँचायझीच्या संघात जास्तीत जास्त २५ खेळाडू असू शकतात.
अलीकडेच सर्व फ्रँचायझींनी एकूण ४६ खेळाडूंना ५५८.५ कोटी रुपयांना रिटेन केले होते. एका फ्रँचायझीची पर्स १२० कोटी रुपये आहे. दक्षिण आफ्रिकेचा हेनरिक क्लासेन सर्वात महागडा खेळाडू ठरला. त्याला सनरायझर्स हैदराबादने २३ कोटी रुपयांना संघात कायम ठेवले आहे. रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूने विराट कोहलीसाठी २१ कोटी रुपये खर्च केले. लखनौ सुपर जायंट्सने निकोलस पूरनला २१ कोटी रुपये दिले. कोहली आणि पूरन संयुक्तपणे दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात महागडे खेळाडू ठरले.
सर्व १० फ्रेंचायझींकडून रिटेन करण्यात आलेले प्लेयर्स -