LSG VS PBKS : संजीव गोएंका यांनी ऋषभ पंतला झापलं? सामन्यानंतरचे फोटो व्हायरल, चाहते काय म्हणाले? पाहा
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  LSG VS PBKS : संजीव गोएंका यांनी ऋषभ पंतला झापलं? सामन्यानंतरचे फोटो व्हायरल, चाहते काय म्हणाले? पाहा

LSG VS PBKS : संजीव गोएंका यांनी ऋषभ पंतला झापलं? सामन्यानंतरचे फोटो व्हायरल, चाहते काय म्हणाले? पाहा

Published Apr 02, 2025 10:57 AM IST

Sanjiv Goenka And Rishabh Pant : आयपीएलमध्ये मंगळवारी पंजाब किंग्जने लखनौ सुपर जायंट्सचा दारूण पराभव केला. या पराभवानंतर लखनऊ संघाचे मालक संजीव गोएंका आणि ऋषभ पंत यांचा एक फोटो व्हायरल होत आहे. या फोटोत गोएंका नाराज दिसत आहेत.

LSG VS PBKS : संजीव गोएंका यांनी ऋषभ पंतला झापलं? सामन्यानंतरचे फोटो व्हायरल, चाहते काय म्हणाले? पाहा
LSG VS PBKS : संजीव गोएंका यांनी ऋषभ पंतला झापलं? सामन्यानंतरचे फोटो व्हायरल, चाहते काय म्हणाले? पाहा

आयपीएल २०२४ मध्ये मंगळवारी (१ एप्रिल) लखनौ सुपर जायंट्सला त्यांच्या घरच्या मैदानावर पंजाब किंग्जकडून पराभव पत्करावा लागला. प्रथम फलंदाजी करताना लखनौ संघाने १७१ धावा केल्या होत्या, प्रत्युत्तरात पंजाबने १६.२ षटकांत लक्ष्य गाठले आणि ८ गडी राखून मोठा विजय नोंदवला. पंजाब किंग्जचा हंगामातील हा दुसरा पराभव आहे.

सामना संपल्यानंतर लखनौ सुपर जायंट्सचे संजीव गोयंका हे ऋषभ पंतसोबत मैदानात संवाद साधताना दिसले. यावेळी गोयंका निराश असल्याचे दिसत होते. ड्रेसिंग रूमचा एक फोटोही व्हायरल होत आहे, ज्यामध्ये गोयंका पंतला हात दाखवत काहीतरी बोलत आहेत आणि पंत खाली मान घालून ऐकत आहे. 

विशेष म्हणजे, ऋषभ पंत याचा फॉर्म लखनौ सुपर जायंट्ससाठी चिंतेची बाब आहे. पंजाब किंग्जविरुद्ध तो केवळ २ धावा करून बाद झाला. पहिल्या सामन्यातही १५ धावा करणाऱ्या पंतला दुसऱ्या सामन्यात खातेही उघडता आले नव्हते.

पंत आयपीएल २०२५ चा सर्वात महागडा खेळाडू

पंतला आयपीएल लिलावात विक्रमी रक्कम मिळाली होती, त्याला फ्रँचायझीने २७ कोटी रुपयांना विकत घेतले. तो आयपीएलमध्ये विकला जाणारा सर्वात महागडा खेळाडू आहे.

पराभवामुळे संजीव गोएंका संतापले?

सामना संपल्यानंतर संजीव गोयंका मैदानावर ऋषभ पंतशी बोलताना दिसले, हे दृश्य गेल्या वर्षी केएल राहुल याच्या सोबत घडलेल्या प्रकारासारखेच होते.

त्यावेळी संजीव गोयंका यांच्यावर बरीच टीका झाली होती. गोयंका मंगळवारी ऋषभ पंतला काय म्हणाले? याच माहिती समोर आली नाही, परंतु हे निश्चित आहे की ते पंत आणि संघाच्या कामगिरीवर अजिबात खूश नाहीत. सोशल मीडियावरही याबाबत लोकांकडून वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत.

लखनौ सुपर जायंट्सचे ३ सामन्यात २ पराभव

ऋषभ पंत याच्या नेतृत्वाखाली लखनौ सुपर जायंट्सने दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध पहिला सामना खेळला.  त्या सामन्यात संघाने १ विकेटने विजय मिळवला. यानंतर संघाने सनरायझर्स हैदराबादचा ५ गडी राखून पराभव केला. यानंतर तिसऱ्या सामन्यात श्रेयस अय्यर याच्या नेतृत्वाखालील पंजाब किंग्जने ८ गडी राखून पराभूत केले. लखनौचा पुढील सामना याच मैदानावर (एकना स्टेडियम) मुंबई इंडियन्सविरुद्ध होणार आहे.

Rohit Bibhishan Jetnavare

eMail

Whats_app_banner

संबंधित बातम्या