Virat Kohli Set To Create History: भारतातील सर्वात लोकप्रिय लीग आयपीएलच्या सतराव्या हंगामाला येत्या २२ मार्चपासून सुरुवात होत आहे. या स्पर्धेतील पहिल्या सामन्यात चेन्नई सुपरकिंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू एकमेकांशी भिडणार आहेत. या सामन्यात बंगळुरूचा माजी कर्णधार विराट कोहलीकडे खास विक्रमाला गवसणी घालण्याची संधी असेल. चेन्नई विरुद्धच्या सामन्यात ६ धावा करताच कोहली टी-२० क्रिकेटमध्ये १२ धावा करणारा पहिला भारतीय खेळाडू ठरणार आहे.
टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या भारतीय खेळाडूंमध्ये विराट कोहली अव्वल स्थानी आहे. विराट कोहलीच्या नावावर ११ हजार ९९४ टी- २० धावा आहेत. त्यानंतर रोहित शर्मा या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर, शिखर धवन तिसऱ्या, सुरेश रैना चौथ्या आणि रॉबिन उथप्पा पाचव्या स्थानावर आहे.
१) विराट कोहली: ११ हजार ९९४ धावा
२) रोहित शर्मा: ११ हजार १५६ धावा
३) शिखर धवन: ९ हजार ६४५ धावा
४) सुरेश रैना: ८ हजार ६५४ धावा
५) रॉबिन उथप्पा: ७ हजार २७२ धावा
टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदजांच्या यादीत विराट कोहली सहाव्या क्रमांकावर आहे. या यादित वेस्ट इंडीजचा तडाखेबाज फलंदाज ख्रिस गेल अव्वल स्थानी आहे. ख्रिस गेलच्या नावावर ११ हजार ५६२ धावा आहेत. त्यानंतर पाकिस्तानचा माजी क्रिकेटर शोएब मलिक १३ हजार ३६० धावांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. यानंतर कायरन पोलार्ड (१२ हजार ९०० धावा) तिसऱ्या क्रमांकावर, अॅलेक्स हेल्स (१२ हजार ३१९ धावा) चौथ्या क्रमांकावर आणि १२ हजार ६५ धावांसह डेव्हिड वॉर्नर पाचव्या स्थानावर आहे.