IPL 2024: आयपीएलच्या पहिल्याच सामन्यात विराट कोहलीनं इतिहास रचला, अशी कामगिरी करणारा पहिलाच भारतीय
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  IPL 2024: आयपीएलच्या पहिल्याच सामन्यात विराट कोहलीनं इतिहास रचला, अशी कामगिरी करणारा पहिलाच भारतीय

IPL 2024: आयपीएलच्या पहिल्याच सामन्यात विराट कोहलीनं इतिहास रचला, अशी कामगिरी करणारा पहिलाच भारतीय

Updated Mar 22, 2024 09:24 PM IST

CSK vs RCB: चेन्नई सुपरकिंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात आयपीएल २०२४ चा पहिलाच सामना खेळला जात आहे.

भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीने टी-२० क्रिकेटमध्ये नव्या विक्रमाला गवसणी घातली आहे.
भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीने टी-२० क्रिकेटमध्ये नव्या विक्रमाला गवसणी घातली आहे. (AP)

Virat Kohli creates history: भारतातील सर्वात लोकप्रिय लीग आयपीएलच्या सतराव्या हंगामाला आजपासून सुरुवात झाली . या स्पर्धेतील पहिल्या सामन्यात चेन्नई सुपरकिंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू एकमेकांशी भिडले. या सामन्यात बंगळुरुच्या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात उरतलेल्या आरसीबीचा माजी कर्णधार विराट कोहलीने नव्या विक्रमाला गवसणी घातली. या सामन्यात विराट कोहलीने टी-२० क्रिकेटमधील १२ हजार धावा पूर्ण केल्या आहेत. अशी कामगिरी करणारा तो पहिलाच भारतीय फलंदाज ठरला आहे.

टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या भारतीय खेळाडूंमध्ये विराट कोहली अव्वल स्थानी आहे. विराट कोहलीच्या नावावर १२ हजार १५ टी- २० धावा आहेत. त्यानंतर रोहित शर्मा या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर, शिखर धवन तिसऱ्या, सुरेश रैना चौथ्या आणि रॉबिन उथप्पा पाचव्या स्थानावर आहे.

टी-२० मध्ये सर्वाधिक धावा करणारे भारतीय

१) विराट कोहली: १२ हजार १५ धावा

२) रोहित शर्मा: ११ हजार १५६ धावा

३) शिखर धवन: ९ हजार ६४५ धावा

४) सुरेश रैना: ८ हजार ६५४ धावा

५) रॉबिन उथप्पा: ७ हजार २७२ धावा

 

टी-२० मध्ये सर्वाधिक धावा करणारे फलंदाज

टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदजांच्या यादीत विराट कोहली सहाव्या क्रमांकावर आहे. या यादित वेस्ट इंडीजचा तडाखेबाज फलंदाज ख्रिस गेल अव्वल स्थानी आहे. ख्रिस गेलच्या नावावर ११ हजार ५६२ धावा आहेत. त्यानंतर पाकिस्तानचा माजी क्रिकेटर शोएब मलिक १३ हजार ३६० धावांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. यानंतर कायरन पोलार्ड (१२ हजार ९०० धावा) तिसऱ्या क्रमांकावर, अॅलेक्स हेल्स (१२ हजार ३१९ धावा) चौथ्या क्रमांकावर आणि १२ हजार ६५ धावांसह डेव्हिड वॉर्नर पाचव्या स्थानावर आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग