मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  MI vs CSK : बाऊचर आणि पोलार्डचा चौथ्या अंपायरसोबत राडा, दोघेही थेट मैदानात घुसले, नेमकं काय घडलं? पाहा

MI vs CSK : बाऊचर आणि पोलार्डचा चौथ्या अंपायरसोबत राडा, दोघेही थेट मैदानात घुसले, नेमकं काय घडलं? पाहा

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Apr 15, 2024 03:38 PM IST

MI VS CSK IPL 2024 : मुंबई इंडियन्ससमोर विजयासाठी २०७ धावांचे लक्ष्य होते. १२व्या षटकापर्यंत मुंबईसाठी सर्व काही ठीक चालले होते. पण त्यानंतर चेन्नईच्या गोलंदाजांनी जोरदार पुनरागमन केले.

MI vs CSK : बाऊचर आणि पोलार्डचा चौथ्या अंपायरसोबत राडा, दोघेही थेट मैदानात घुसले, नेमकं काय घडलं? पाहा
MI vs CSK : बाऊचर आणि पोलार्डचा चौथ्या अंपायरसोबत राडा, दोघेही थेट मैदानात घुसले, नेमकं काय घडलं? पाहा

आयपीएल २०२४ मध्ये रविवारी (१४ एप्रिल) मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात चुरशीची लढत झाली. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात जवळपास ४०० धावा झाल्या आणि अखेरीस चेन्नईने २० धावांनी हा सामना जिंकला.

ट्रेंडिंग न्यूज

मुंबई इंडियन्ससमोर विजयासाठी २०७ धावांचे लक्ष्य होते. १२व्या षटकापर्यंत मुंबईसाठी सर्व काही ठीक चालले होते. पण त्यानंतर चेन्नईच्या गोलंदाजांनी जोरदार पुनरागमन केले आणि हळूहळू सामना मुंबईच्या पकडीतून निसटला.

बाउचर आणि टीम डेव्हिड अंपायरशी भिडले

या सामन्यादरम्यान मुंबई इंडियन्सचे मुख्य प्रशिक्षक मार्क बाउचर, किरोन पोलार्ड आणि टीम डेव्हिड यांची पंचांशी वाद झाला. फलंदाजी प्रशिक्षक किरॉन पोलार्ड यानेही पंचांशी वाद घातला. वास्तविक ही घटना मुंबई इंडियन्सच्या डावातील १५ व्या षटकानंतर घडली. ओव्हर संपताच तिघेही मैदानात शिरू लागले. मुंबई इंडियन्सला १५ व्या षटकानंतर टाइम आऊट हवा होता आणि म्हणून ते तिघेही मैदानात जायला लागले.

चौथ्या पंचांनी परत बोलावले

मार्क बाउचर, टिम डेव्हिड आणि किरॉन पोलार्ड मैदानात जात असल्याचे पाहताच चौथ्या पंचांनी त्यांना परत येण्यास सांगितले. पण त्यांना त्यावेळी टाईम आऊट हवा होता, असे त्यांच्याकडून सांगण्यात आले. मात्र अंपायरने त्यांचे म्हणणे न ऐकता त्यांना परत येण्यास सांगितले.

यानंतर बाउचर आणि डेव्हिडने चौथ्या पंचांशी वाद घालण्यास सुरुवात केली. पोलार्डने टीम डेव्हिडला वेगळे केले पण नंतर त्यानेही पंचांशी वाद घातला.

चेन्नईने २० धावांनी विजय मिळवला

चेन्नई सुपर किंग्जने मुंबई इंडियन्सवर २० धावांनी विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना चेन्नई सुपर किंग्ज संघाने २०६ धावा केल्या. प्रत्युत्तरात मुंबईचा संघ २० षटके खेळून केवळ १८६ धावाच करू शकला. रोहित शर्माने १२ वर्षांनंतर मुंबईसाठी आयपीएलमध्ये शतक झळकावले. पण तो आपल्या संघाला विजयापर्यंत नेऊ शकला नाही.

IPL_Entry_Point