
इंडियन प्रीमियर लीग २०२४ चा थरार २२ मार्चपासून रंगणार आहे. या मोसमातील पहिला सामना महेंद्रसिंह धोनी आणि विराट कोहली यांच्यात होणार आहे. चेन्नई सुपर किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यातील हा सामना चेपॉक स्टेडियमवर खेळला जाणार आहे.
दोन्ही संघ या महामुकाबल्यासाठी तयार आहेत. सोबतच या सामन्याची तिकिट विक्रीदेखील आता काही तासांतच सुरू होणार आहे. चेन्नई सुपर किंग्जच्या (CSK) अधिकृत वेबसाइटने ही माहिती दिली आहे.
आरसीबी आणि सीएसके यांच्यातील उद्घाटन सामन्याची ऑनलाइन तिकीट विक्री सोमवारपासून (१८ मार्च) सुरू होणार आहे. चाहते सकाळी ९.३० वाजल्यापासून तिकीट खरेदी करू शकतात.
चेन्नई सुपर किंग्जच्या अधिकृत वेबसाइटवर सांगण्यात आले आहे की चाहते www.insider.in आणि Paytm द्वारे सामन्याची तिकिटे खरेदी करू शकतात.
१७०० रुपये
४००० रुपये
४५०० रुपये
७००० रुपये
CSK आणि RCB सामन्याच्या तिकिटांच्या किमती चार स्लॉटमध्ये विभागल्या आहेत. सर्वात स्वस्तातले तिकिट १७०० रुपयांचे आहे. तर सर्वात महागडे तिकिट हे ७ हजार रुपयांचे असणार आहे.
विशेष म्हणजे, चाहते फक्त ई-तिकीट दाखवून स्टेडियममध्ये प्रवेश करू शकतात, त्यांना हार्ड कॉपी आणण्याची गरज नाही.
तसेच, सीएसकेच्या अधिकृत वेबसाइटने असेही स्पष्ट केले आहे की चाहत्यांनी पेटीएम आणि इनसाइडर व्यतिरिक्त कोठूनही तिकीट स्वतःच्या जबाबदारीवर खरेदी करावे.
न्यूझीलंडचे तीन स्टार खेळाडू मिचेल सँटनर, डॅरिल मिशेल आणि रचिन रवींद्र नुकतेच चेन्नईला पोहोचले आहेत. यानंतर त्यांनी चेपॉक स्टेडियमवर आयोजित सराव शिबिरात सहभाग घेतला. सीएसकेने डेरिल मिशेलला सर्वाधिक १४ कोटी रुपयांना विकत घेतले आहे. तर सीएसकेने रचिन रवींद्रला १.८ कोटी रुपयांना करारबद्ध केले आहे.
संबंधित बातम्या
