Suryakumar Yadav declared fit: आयपीएल २०२४ मध्ये हार्दिक पांड्याच्या नेतृत्त्वात अजूनही विजयी खाते उघडू न शकणाऱ्या मुंबईच्या संघासाठी आनंदाची बातमी आहे. मुंबईचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादवने दुखापतीवर मात केली असून तो लवकरच संघात परतणार असल्याची माहिती समोर आली. राष्ट्रीय क्रिकेट अकादमी एनसीएने त्याला तंदुरुस्त घोषित केले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सूर्याला एनसीएमध्ये तीन फिटनेस चाचण्या द्यावा लागल्या. यामुळे तो गेल्या ३ महिन्यापासून क्रिकेटपासून दूर होता. एनसीएच्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, "सूर्यकुमार आता पूर्णपणे तंदुरूस्त असून मैदानात पुनरागमन करण्यासाठी तयार आहे.सूर्यकुमार पूर्णपणे तंदुरुस्त झाल्यानंतरच मुंबईच्या संघात सामीव व्हावे, अशी आमची इच्छा होती. आयपीएलपूर्वी करण्यात आलेल्या फिटनेस चाचणीत तो पूर्णपणे तंदुरूस्त वाटत नव्हता. यामुळे त्याला तीन वेळा फिटनेस चाचणी द्यावी लागली."
गेल्या वर्षाच्या अखेरीस दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर सूर्यकुमार यादव टी- २० संघाचा कर्णधार होता. या दौऱ्यात त्याच्या घोट्याला दुखापत झाली, त्यानंतर त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. जवळपास तीन महिने तो क्रिकेटपासून दूर राहिला. आयपीएल २०२४ पूर्वी तो मुंबईच्या संघात पुनरागमन करेल, अशी अपेक्षा होती. पण त्याची फिटनेस चाचणी नकारात्मक आली.
सूर्यकुमार यादव टी-२० क्रिकेटमधील उत्कृष्ट फलंदाज आहे. टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतक झळकावण्याचा विक्रम त्याच्या नावावर आहे पहिल्या तीन सामन्यांमध्ये मुंबईला सूर्याची उणीव जाणवली. सूर्याच्या अनुवस्थितीत संघाची मधली फळी कमकुवत दिसत होती. परिणामी, मुंबईला वानखेडे मैदानावरही दारुण पराभवाला सामोरे जावे लागले.
मुंबई इंडियन्सचे कर्णधारपद हे आयपीएल २०२४ मधील सर्वाधिक चर्चेचा विषय ठरले आहे. मुंबई संघाने त्यांचा नियमित कर्णधार रोहित शर्माऐवजी हार्दिक पांड्याकडे संघाची जबाबदारी सोपवली. यामुळे सध्या मुंबई संघाला आणि पांड्याला टीकेला सामोरे जावे लागत आहे. हार्दिक पांड्याच्या नेतृत्त्वात मुंबई इंडियन्सला सलग तीन सामन्यात पराभव स्वीकारावा लागला आहे.
हार्दिक पांड्या (कर्णधार), रोहित शर्मा, डेवाल्ड ब्रेविस, सूर्यकुमार यादव, इशान किशन, एन. तिलक वर्मा, टीम डेव्हिड, विष्णू विनोद, अर्जुन तेंडुलकर, शम्स मुलानी, नेहल वढेरा, जसप्रीत बुमराह, कुमार कार्तिकेय, पियुष चावला, आकाश मधवाल, ल्यूक वुड, रोमॅरियो शेफर्ड, जेराल्ड कोएत्झी, श्रेयस गोपाल, नुवान तुषारा, नमन धीर, अंशुल कंबोज, मोहम्मद नबी, शिवालिक शर्मा, क्वेना माफाका.
संबंधित बातम्या