मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  Suryakumar Yadav: संभाळून राहा! सूर्यकुमार यादवनं रियान परागबद्दल इतर संघाला केलं सावध

Suryakumar Yadav: संभाळून राहा! सूर्यकुमार यादवनं रियान परागबद्दल इतर संघाला केलं सावध

Ashwjeet Rajendra Jagtap HT Marathi
Mar 28, 2024 10:41 PM IST

Suryakumar Yadav On Riyan Parag: रियान परागने केवळ ४५ चेंडूत ८४ धावांची नाबाद खेळी करत जयपूरच्या मैदानावर दिल्ली कॅपिटल्सच्या गोलंदाजांच्या डोळ्यात पाणी आणले.

सूर्यकुमार यादवने दिल्लीविरुद्ध आक्रमक फलंदाजी करणाऱ्या रियान परागचे कौतूक केले आहे.
सूर्यकुमार यादवने दिल्लीविरुद्ध आक्रमक फलंदाजी करणाऱ्या रियान परागचे कौतूक केले आहे. (AFP)

IPL 2024: राजस्थान रॉयल्सचा स्टार युवा खेळाडू रियान परागने आयपीएल २०२४ ची हंगामाची चमकदार सुरुवात केली. दिल्लीविरुद्ध गुरुवारी खेळण्यात आलेल्या सामन्यात त्याने अवघ्या ४५ चेंडूत नाबाद ८४ धावांची खेळी केली. रियान परागच्या खेळीमुळे राजस्थानच्या संघाला २० षटकात ५ विकेट्स गमावून १८५ धावांपर्यंत मजल मारता आली.  एकेकाळी राजस्थानचा संघ १५० धावांचा टप्पा गाठेल की नाही, असे वाटत असताना रियान परागने संघासाठी महत्त्वाची खेळी केली. रियान परागची खेळी पाहून मुंबई इंडियन्सचा स्टार फंलदाज सूर्यकुमार यादवने रियान परागबद्दल इतर संघाला सावध केले आहे.

पॉवरप्लेमध्ये यशस्वी जयस्वाल आणि संजू सॅमसन बाद झाल्यामुळे राजस्थानचा संघ अडचणीत आला. जोस बटलर देखील स्वस्तात माघारी परतला. राजस्थानची धावसंख्या ७.२ षटकांत ३६ धावा असताना रियान परागने संयमी खेळी दाखवत मधल्या फळीत महत्त्वाची भागिदारी रचली. त्यानंतर त्याने फलंदाजीचा गिअर बदलत आक्रमक फलंदाजीला सुरुवात केली. रियान परागने ४५ चेंडूत सहा चौकार आणि सात षटकार ठोकले. 

रियान परागची फलंदाजी पाहून सूर्यकुमार म्हणाला की, “गेल्या काही आठवड्यापूर्वी मी एनसीएमध्ये एका तरुणाला भेटलो. तो काहीसा तणावात असल्याचे दिसून आले. त्याने पूर्णपणे पुनर्प्राप्तीवर लक्ष केंद्रित केले. त्यावेळी मी तिथल्या एका प्रशिक्षकाला या खेळाडूमध्ये बदल झाला असे बोलणे चुकीचे ठरले नाही. रियान पराग २.०, संभाळून राहा."

पराग देशांतर्गत हंगामाच्या जोरावर आरआरमध्ये सामील झाला.  देशातील प्रमुख देशांतर्गत टी-२० स्पर्धा सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीत परागने आसामसाठी केवळ १० डावात ५१० धावा केल्या.  गेल्या आठवड्यात आयपीएल २०२४ मध्ये रॉयल्सकडून झालेल्या पहिल्या सामन्यात परागने जयस्वाल आणि बटलरच्या सुरुवातीच्या विकेटनंतर संजू सॅमसनसोबत महत्त्वपूर्ण भागीदारी रचली होती.  त्याने २९ चेंडूत ४३ धावा केल्या होत्या.

WhatsApp channel